wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 करिंथकरांस धडा 12
  • 1 मी प्रौढी मिरविलीच पाहिजे. जरी त्यापासून कोणताही लाभ नाही. मी आता प्रभूचे दृष्टान्त व प्रकटीकरण याकडे वळतो
  • 2 ख्रिस्तामधील एक माणूस मला माहीत आहे जो चौदा वर्षा पूवी तिसऱ्या स्वर्गात घेतला गेला. तो शरीरात किंवा शरीराबाहेर घेतला गेला हे मला माहीत नाही, देव जाणतो.
  • 3 आणि मला माहीत आहे, हा मनुष्य शरीरात किंवा शरीराबाहेर मला माहीत नाही पण देव जाणतो.
  • 4 तो सुखलोकात घेतला गेला, त्याने व्यक्त न करता येण्यासारख्या गोष्टी ऐकल्या. अशा गोष्टी, ज्या माणसांना सांगण्याची परवानगी नाही.
  • 5 मी अशा माणसाविषयी प्रौढी बाळगीन. परंतु माइया अशक्तपणाशिवाय मी स्वत:विषयी अभिमान बाळगणार नाही.
  • 6 जरी मी ख्रिस्ताचा अभिमान बाळगण्याचे निवडले. तरी मी मूर्ख असणार नाही. कारण मी सत्य बोलत असेन पण मी स्वत:ला आवरतो. यासाठी की कोणी माझ्या मागे जे काही पाहतो किंवा माइयापासून जे काही ऐकतो त्यापेक्षा कोणीही मला अधिक मानू नये.
  • 7 आणि माझ्या प्रकटीकरणाच्या अतिशय मोठेपणामुळे मी खूप जास्त चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात रुतणारा काटा, (सैतानाचा दूत) मला ठोसे मारण्यासाठी ठेवण्यात आला.
  • 8 तीन वेळा मी प्रभूला विनंति केली की, तो माइयातून काढून टाक.
  • 9 पण तो मला म्हणाला, “माझी कृपा तुला पुरे, कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” म्हणून मी माझ्या अशक्तपणाबद्दल आनंदाने प्रौढी मिरवीन. यासाठी की ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहावे.
  • 10 या कारणासाठी ख्रिस्ताकरिता अशक्तपणात आनंद करतो. अपमानात, कठीण परिस्थितित, छळात, अडचणीच्या वेळी, कारण जेव्हा मी अशक्त, तेव्हा मी सशक्त असतो.
  • 11 मी स्वत:च मूर्ख झालो पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हावयाची होती. जरी मी काही नसलो तरी अतिश्रष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो.
  • 12 प्रेषितांची चिन्हे ही आहेत: चिन्हे, चमत्कार, अदभुत कृत्ये ही खरोखरच सर्व सहनशीलतेने मी तुम्हांमध्ये केली.
  • 13 कारण मी तुम्हांला भार झालो नाही, ही गोष्ट सोडली तर, इतर मंडळ्यापेक्षा ही गोष्ट सोडली तर तुम्ही कशात उणे आहात? या चुकीबद्दल मला क्षमा करा.
  • 14 पाहा, आता तिसन्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे. आणि मी तुम्हांला भार होणार नाही. कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही. तर तुम्हांला मिळवण्यासाठी येणार आहे. शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते.
  • 15 म्हणून मी फार आनंदाने माइयाकडे जे काही आहे, ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वत:देखील खर्ची पडेन. जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल?
  • 16 तर असो, मी चतुर असल्याने, मी तुमच्यासाठी ओझे झालो नाही, तर मी तुम्हांला चकविले व पकडले, असे खुशाल म्हणा.
  • 17 ज्यांना मी तुमच्याकडे पाठविले त्यांच्यातील कोणाकडून तरी मी तुम्हांपासून काही फायदा घेतला आहे का?
  • 18 मी तीताला तुमच्याकडे जाण्यास विनंति केली आणि मी त्याच्याबरोबर भावाला पाठविले. तीताने तुम्हांपासून काही फायदा करुन घेतला काय? आम्ही एकाच आत्म्याने जगत नाही काय? एका आत्म्याने एकाच मार्गाने चाललो नाही काय?
  • 19 तुम्ही असा विचार करीत आहा काय की आम्ही आमचे समर्थन तुमच्यासमोर करीत आहोत? ख्रिस्तामध्ये असल्याप्रमाणे आम्ही देवासमोर बोलत आहोत. आणि प्रिय मित्रांनो, जे काही आम्ही करतो ते तुम्हांला बळकट करण्यासाठी.
  • 20 कारण मला भय वाटते की, मी आल्यावर कदाचित जसे मी इच्छितो तसे तुम्ही मला आढळणार नाही. आणि जसे तुम्ही इच्छित नाही तसा असलेला मी तुम्हांस आढळेन. म्हणजे कदाचित भांडणे, मत्सर, राग, कलह, चहाड्या, कुजबूज रुसणे, अव्यवस्था ही दिसून येतील.
  • 21 म्हणजे मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हाजवळ नीच करील. आणि ज्यांनी पूर्वी पाप केले होते आणि आपण केलेल्या जारकर्माचा, अशुद्धपणाचा, व कामातुरपणाचा त्याग केला नाही, व त्यांच्याबद्दल पश्र्चात्ताप केला नाही, अशा अनेकांसाठी मला शोक करावा लागेल.