wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 पेत्र धडा 1
  • 1 ख्रिस्त येशूचा दास व प्रेषित असलेल्या शिमोन पेत्राकडून,देवाकडून, ज्यांना तारणारा येशू ख्रिस्त याच्या द्वारे, मौल्यावान विश्वास आमच्या बरोबरीनेच मिळाला आहे अशांना,
  • 2 देवआणि आपला प्रभु येशू याच्या ओळखीमुळे तुम्हाला देवाची कृपा व शांति विपुल प्रमाणात लाभो.
  • 3 जे काही जीवनासंबंधी व देवाच्या भक्तीसंबंधी आहे ते सर्व आम्हाला येशूच्या दैवी सामर्थ्याने दिले आहे. कारण ज्यानेआम्हाला त्याच्या स्वत:च्या गौरवाने व चांगुलपणाने बोलविले आहे त्याला आम्ही ओळखतो.
  • 4 या गोष्टींच्या म्हणजे गौरव वचांगुलपण यांच्याद्वारे देवाने आपल्याला फार महान आणि मौल्यावान असे आशीर्वादाचे अभिवचन दिले आहे यासाठी की,त्याच्याद्वारे आम्ही देवासारखे व्हावे आणि जगातील दुष्ट लोकांच्या वासनांमुळे नाशापासून सुटका करुन घ्यावी.
  • 5 म्हणून याकारणासाठी आपल्या कडून होता होईल ते प्रयत्न करुन देण्यात उदारपणाची, विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची,
  • 6 ज्ञानात आत्मसंयमनाची, आत्मसंयमात धीराची आणि धीरात देवाच्या प्रामाणिक सेवेची भर घाला.
  • 7 आणि देवाच्याप्रामाणिक सेवेस बंधूप्रीतीची व बंधुप्रीतीस प्रीतीची जोड द्या.
  • 8 जर या सर्व गोष्टी तुमच्यात असतील व या गोष्टी वाढतअसतील तर त्या तुम्हाला क्रियाशील व फळ देणारे लोक करुन आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात परिपूर्ण करतील.
  • 9 पणज्याच्या अंगी हे गुण नसतील तो पायापुरते पाहणारा व आंधळा ठरेल. आणि त्याच्या गतकाळतील पापापासून त्याला शुद्धकेल्याचा विसर त्याला पडला आहे.
  • 10 म्हणून बंधूंनो, तुम्हाला देवाने खरोखरच पाचारण केले आहे आणि निवडले आहे, हेदाखविण्यासाठी अधिक उत्सुक असा. कारण जर तुम्ही या गोष्टी करता तर तुम्ही कधीही अडखळणार नाही आणि पडणारनाही.
  • 11 आणि अशा प्रकारे आपला प्रभु व तारणारा येशू ख्रिस्त याच्या अनंतकाळच्या राज्यात उदारपणे तुमचे स्वागतकरण्यात येईल.
  • 12 या कारणासाठी, या गोष्टींची मी तुम्हांला सतत आठवण करुन देत राहीन. जरी तुम्हांला त्या माहीत असल्या आणितुमच्याप्रत आलेल्या सत्यात तुम्ही चांगले स्थिरावलेले असला,
  • 13 तरी हे सांगणे मी अगदी योग्य समजतो की, जोपर्यंत याशरीराने मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण करुन देऊन जागे ठेवणे योग्य आहे.
  • 14 कारण मला माहीत आहे कीआपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला हे स्पष्ट केले आहे की, लवकरच मला हे शरीर सोडावे लागणार आहे.
  • 15 म्हणून याजीवनातून गेल्यानंतर या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी मी सर्व प्रंसगी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.
  • 16 कारण आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्ययुक्त आगमनाविषयी जेव्हा आम्ही तुम्हांला सांगितले, तेव्हा अक्क लहुशारीनेबनवलेल्या भाखडकथांवर आम्ही विसंबून राहिलो नाही. उलट आम्ही आमच्या डोळ्यांनी त्याची महानता पाहिली.
  • 17 कारण त्याला सन्मान व गौरव ही देवपित्याकडून प्राप्त झालीत, तेव्हा उदात्त गौरवाने अशी वाणी त्याच्याकडे आली: “हा माझा प्रिय पुत्र आहे याजविषयी मी संतुष्ट आहे.”
  • 18 आणि त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असतानाही वाणी स्वर्गातून येत असताना आम्ही स्वत: ऐकली.
  • 19 आम्ही संदेष्ट्यांचे भविष्यवचन अती विश्वासनीय असे समजून त्यास मान देतो. त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगलेकरता, कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंत:करणातप्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल.
  • 20 प्रथम तुम्ही हे समजले पाहिजे की, पवित्र शास्त्रातील कोणतेही भविष्यवचन कोणाही मनुष्याच्या बुद्धीने उकलत नाही.
  • 21 कारण एखाद्या मनुष्याला पाहिजे म्हणून भविष्यवाणी झालेली नाही, तर जे लोक पवित्र आत्म्याने प्रेरित झालेले होते,त्यांनीच ती लोकांपर्यंत पोहचविलेली आहे.