wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


प्रेषितांचीं कृत्यें धडा 28
  • 1 जेव्हा आमचे पाय सुखरुपपणे तेथील जमीनीला लागले. तेव्हा आम्हांना कळले की, त्या बेटाचे नाव माल्ता असे आहे.
  • 2 तेथील रहिवाश्यांनी आम्हांला अतिशय ममतेने वागविले. त्यांनी एक शेकोटी पेटविली आणि आमचे स्वागत केले. कारण पाऊस पडू लागाला होता. व थंडीही होती.
  • 3 पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला. उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला. आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला.
  • 4 ते पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे. समुद्रातून जरी हा वाचला असला तरी देवाच्या न्यायामुळे याचे आयुष्य संपुष्टातच आले आहे!”
  • 5 परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला. आणि पौलाला काही अपाय झाला नाही.
  • 6 त्या बेटावरील लोकांना पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरुन पडेल असे वाटत होते. बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले, आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.
  • 7 तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती. पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता. त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला.
  • 8 पुब्ल्याचे वडील तापाने व हगवणीने आजारी होते. त्यामुळे अंथरुणाला खिळून होते. पौल त्या आजारी व्याक्तिला भेटायला गेला प्रार्थना करुन पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्याला बरे केले.
  • 9 हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.
  • 10 त्यांनी आम्हांला सन्मानपूर्वक पुष्कळ वस्तू भेटीदाखल दिल्या. आणि जेव्हा आम्ही परत प्रवासाला निघालो तेव्हा आम्हांला लागणाऱ्या अनेक गोष्टी पुरविल्या.
  • 11 आम्ही तेथे हिवाळ्यात राहिल्यावर आलेक्सांद्रा शहरातील एका जहाजातून पुढील प्रवासाला निघालो. ते जहाज त्या बेटावर हिवाळाभर मुक्कामाला होते. त्या जहाजाच्या समोरील बाजूस ‘जुळ्या देवाचे’चिन्ह होते.
  • 12 मग आम्ही सुराकूस येथे जाऊन पोहोंचलो आणि तेथे तीन दिवास राहिलो.
  • 13 तेथून शिडे उभारुन आम्ही निघालो, आणि रेगियोन नगराला गेला. तेथे एक दिवस मुक्काम केला. नंतर दक्षिणेकडील वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुत्युलास गेलो.
  • 14 त्या शहरात आम्हांला काही बंधु (विश्वासणारे) आढळले. त्या बंधूंच्या सांगण्यावरुन आम्ही तेथे सात दिवस राहिलो. मग आम्ही रोम येथे जाऊन पोहोंचलो.
  • 15 तेथील बंधुनी आमच्याबद्दलची वार्ता ऐकली होती. ते आमच्या भेटीसाठी अप्पीयाच्या बाजारपेठेपर्यंत आणि तीन धर्मशाळेपर्यंत आले. पौलाची त्यांची भेट झाल्यावर त्याने देवाचे उपकार मानले, व त्याला धीर आला.
  • 16 आम्ही रोम येथे पोहोंचल्यावर पौलाला एकटे राहायला परवानगी मिळाली. परंतु त्याच्यावर देखरेख करण्यासाठी एक शिपाई ठेवण्यात आला.
  • 17 तीन दिवसांनंतर पौलाने सर्व यहूदी पुढाऱ्यांना एकत्र बोलावले. जेव्हा सर्व जण जमा झाले तेव्हा पौल त्यांना म्हणाला, “बंधूंनो, आपल्या बांधवांविरुद्ध मी काहीही केलेले नाही. तरी मला यरुशलेम येथे पकडून रोमी लोकांच्या हाती कैदी म्हणून देण्यात आले. आणि
  • 18 त्यांनी माझी चौकशी केली. तेव्हा त्यांची मला सोडून देण्याची इच्छा होती. कारण मरणदंडाला योग्य असा कोणताही गुन्हा मी केला नव्हता.
  • 19 परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले. याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे.
  • 20 या कारणासाठी तुम्हाला भेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची मी इच्छा दाखविली. कारण इस्राएलाच्या आशेच्या निष्ठेमुळेच मी या साखळदंडानी जखडलो गेलो आहे.”
  • 21 यहूदी पुढारी पौलाला म्हणाले, “आम्हांला तुमच्या बाबत यहूदीयाहून कसलेही पत्र आलेले नाही, अगर तिकडून येणाऱ्या बंधुजनांपैकी एकाही भावाने तुमच्याविषयी वाईट कळविले अथवा बोललेले नाही.
  • 22 परंतु तुमची मते काय आहेत हे समजून घेण्याची आमची इच्छा आहे. कारण या गटाविरुद्ध (ख्रिस्ती गटाविरुद्ध) सगळीकडे लोक बोलतात हे आम्हांना माहीत आहे.”
  • 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरविला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्यविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करुन येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
  • 24 त्याने फोड करुन सांगितलेल्या गोष्टीविषयी काही जणांची खात्री पटली, तर काहींनी तो बोलत असलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही.
  • 25 पौल पुढील एक गोष्ट बोलला, त्यावरुन मतभेद होऊन त्यांच्यापैकी काही जण उठले आणि तेथून जाऊ लागले, पौल म्हणाला, “यशया संदेष्टयांच्या द्वारे पवित्र आत्मा आपल्या वाडवडिलांशी जे बोलला, ते खरोखरच किती खरे आहे! यशया म्हणाला होता:
  • 26 ‘या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा, आणि त्यांना सांगा: तुम्ही ऐकाल तर खरे पण तुम्हांला समजणार नाही. तुम्ही पहाल तुम्हाला दिसेल पण तुम्ही काय पाहात ते तुम्हाला कळणार नाही
  • 27 कारण या लोकांचे विचार मंद झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही. आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाहीतर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळाले असते आणि मी त्यांना बरे केले असते.’
  • 28 “म्हणून देवाचे हे तारण यहूदीतर विदेशी लोकांकडे पाठविण्यात आले आहे. हे तुम्हा यहूदी लोकांना कळावे. ते ऐकतील.”
  • 29
  • 30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला. जे त्याला भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी.
  • 31 त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला. त्याने प्रभु येशूविषयी शिक्षण दिले. तो हे काम फार धैर्याने करीत असे. आणि कोणीही त्याला बोलण्यात अडवू शकले नाही.