wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


गलतीकरांस धडा 5
  • 1 आम्ही स्वातंत्र्यात राहावे म्हणून ख्रिस्ताने आम्हांला मुक्त केले, म्हणून स्थिर राहा. आणि नियमशास्त्राच्या जुवाच्यागुलामगिरीचे ओझे पुन्हा लादून घेऊ नका.
  • 2 ऐका! मी पौल, तुम्हांला सांगत आहे की, जर सुंता करुन घेऊन तुम्हीनियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही.
  • 3 सुंता करुन घेणाऱ्या प्रत्येक माणसाल मी पुन्हाएकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे,
  • 4 तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरुपाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात.
  • 5 आम्ही तर आत्म्यानेविश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत.
  • 6 कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांनाकाही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.
  • 7 तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला?
  • 8 सत्यापासूनमन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हांला बोलाविले त्या देवापासून येत नाही.
  • 9 “थोडेसे खमीर कणकेचा गोळाफुगवून टाकते.”
  • 10 प्रभूमध्ये मला तुमच्याविषयी खात्री आहे की, जे मी तुम्हांला शिकविले त्याच्याशिवाय इतर विचारतुम्ही करणार नाही. परंतु जो तुम्हांला त्रास देत आहे, तो कोणी का असेना, दंड भोगील.
  • 11 बंधूजनहो, काही जण असा आरोप करतात की, अजूनही सुंतेची गरज आहे असा उपदेश मी करतो. जर तसे आहे तरअजूनही माझा छळ का होत आहे? आणि जर मी सुंतेच्या आवश्यकतेविषयी उपदेश करीत असतो तर वधस्तंभाविषयीचीतत्वे राहिली नसती.
  • 12 माझी इच्छा आहे की, जे तुम्हामध्ये अस्थिरता उत्पन्र करतात त्यांनी सुंतेबरोबर स्वत:ला नामर्द करुन घ्यावे.
  • 13 परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एकसबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा).
  • 14 कारणसंपूर्णनियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते, “जसे आपणांवर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेमकरा.”
  • 15 पण जर तुम्ही एकमेकांना चावत राहिला व खाऊन टाकीत असला, तर एकमेकांना गिळून टाकणार नाही, याविषयी सावध राहा.
  • 16 पण मी म्हणतो: तुम्ही आत्म्यात चाला, आणि तुम्ही देहाच्या पापी इच्छा पूर्ण करणार नाही.
  • 17 कारण आपला देहज्याची इच्छा करतो ते आत्म्याविरुद्ध आहे, आणि आत्मा जी इच्छा करतो, ती देहाविरुद्ध आहेत. परिणाम म्हणून तुम्हांलाजे करावयास पाहिजे ते करता येत नाही.
  • 18 पण जर तुम्ही आत्म्याकडून चालविले जाता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
  • 19 देहाची कर्मे तर उघड आहेत, ती म्हणजे, जारकर्म, अशुद्धता, कामातुरपणा,
  • 20 मूर्तिपूजा, चेटूक, द्वेष, मारामारी,मत्सर, राग, स्वार्थी हेवेदावे, पक्षभेद,
  • 21 दारुबाजी, रंगेलपणा, अशासारख्या दुसऱ्या सर्व गोष्टी. या गोष्टीविषयी मीतुम्हांला सूचना देत आहे. ज्याप्रमाणे मी पूर्वी तुम्हांला सूचना केल्या होत्या. जे लोक अशा गोष्टी करतात त्यांना देवाच्याराज्यात वाटा मिळणार नाही.
  • 22 पण आत्मा या गोष्टी निर्माण करतो: प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, दयाळूपणा,चांगुलपणा, विश्वास,
  • 23 सौम्यता व आत्मसंयमन. अशा गोष्टीविरुद्ध नियमशास्त्र नाही.
  • 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनीदेहस्वभावला त्यांच्या वासना व इच्छांसह वधस्तंभावर खिळले आहे.
  • 25 जर आम्ही आत्म्याने जगतो, तर तो जसाचालवितो तसे आम्हीसुद्धा त्याच्यामागे चालू या.
  • 26 आम्ही पोकळ बढाई मारणारे, एकमेकांना चीड आणणारे, एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.