wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


याकोब धडा 2
  • 1 माझ्या बंधूंनो, गौरवी प्रभु येसू ख्रिस्तावरील विश्वासाची व पक्षपातीपणाची सांगड घालू नका.
  • 2 समजा एक मनुष्य सोन्याची अंगठी व सुंदर कपडे घालून तुमच्या सभेला आला व एक गरीब मनुष्य अव्यवस्थित कपडे घालून आला.
  • 3 आणि समजा चांगला पोशाख घालून आलेल्या मनुष्याला तुम्ही विशेष मानसन्मान दाखवूत त्याला म्हणाला, “येथे ज्या चांगल्या खुर्च्या आहेत त्यापैकी एखाद्या खुर्चीवर बसा.” आणि समजा तुम्ही त्या गरीब माणासाला म्हणाला, “तिकडे उभा राहा.” किंवा “माझ्या पायाजवळ बस.”
  • 4 तर या बाबतीत तुम्ही दोघांत पक्षपातीपणा दाखविलात की नाही? आणि तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना बाळगणारे न्यायाधीश ठरलात की नाही?
  • 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका! देवानेच जगाच्या दृष्टिकोनातून गरीब असले त्यांना विस्वासात श्रीमंत होण्यासाठी निवडले नाही काय, आणि जे त्याच्यावर प्रीति करतात त्यांना देवरोज्याचे वारस म्हणून निवडण्याचे अभिवचन दिले नाही का?
  • 6 पण तुम्ही तर गरीब मनुष्याला तुच्छ लेखिले! तुमची पिळवणूक करणारे श्रीमंत लोकच नाहीत काय आणि तुम्हाला न्यायालयात नेणारे तेच लोक नाहीत काय?
  • 7 ख्रिस्ताच्या उत्तम नावाची, जे नाव तुम्हाला देण्यात आले त्याची निंदा हेच श्रीमंत लोक करीत नाहीत का?
  • 8 जर तुम्ही पवित्र शास्त्रातील महान आज्ञा “आपल्या शेजाऱ्ावर आपल्यासारखीच प्रीति करा” पाळता तर तुम्ही योग्य करता.
  • 9 पण जर तुम्ही पक्षपात करता, तर तुम्ही पाप करता आणि नियम मोडण्याचा दोष तुमच्यावर येतो.
  • 10 कारण जर कोणी संपूर्ण नियमशास्त्राचे पालन करतो पण एका नियमाबाबतीत चुकतो, तर तो संपूर्ण नियमशास्त्राबाबतीत दोषी ठरतो.
  • 11 कारण “व्यभिचार करू नको” असे जो म्हणाला, “तो असे सुद्धा म्हणाला की, “खून करू नको.” म्हणून जर तुम्ही व्यभिचार करीत नाही पण खून करतो तर तुम्ही नियमशास्त्र मोडता.
  • 12 अशा लोकांसारखे बोला व वागा की, ज्यांचा न्याय अशा नियमांमुळे होणार आहे की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळेल.
  • 13 जो दयाळूपणे वागला नसेल त्याचा न्यायही देव त्याच्यावर दया न दाखविताच करील. पण दया न्यायावर विजय मिळविते!
  • 14 माझ्या बंधूंनो, जर एखादा म्हणतो की, मी विश्वास धरतो पण तशी कृती करीत नाही तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याला तारू शकणार नाही. शकेल का?
  • 15 जर एखादा बंधु किंवा भगिनी यांना कपड्यांची आवश्यकता असेल व त्यांना रोजचे अन्रसुद्धा मिळत नसेल
  • 16 आणि तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो, “देवबाप तुम्हांला आशीर्वाद देवो! उबदार कपडे घाला आणि चांगले खा.” पण तुम्ही त्यांच्या शरीराला जे आवश्यक ते देत नाही, तर तो काय चांगले करतो?
  • 17 त्याचप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृतीची जोड नसेल तर तो केवळ एक मृत असाच विश्वास असेल.
  • 18 पण एखादा म्हणेल, “तुझ्याकडे विश्वास आहे तर माझ्याकडे काम आहे.” कृतीशिवाय तुझा विश्वास दाखव, आणि माझा विश्वास मी माझ्या कृतीने दाखवीन.
  • 19 तुम्ही असा विश्वास धरता का की, फक्त एकच देव आहे? उत्तम! भुतेदेखील असा विश्वास धरतात व थरथर कापतात.
  • 20 अरे मूढ माणास, कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे काय?
  • 21 आपला पूर्वज अब्राहाम याने त्याचा पुत्र इसहाक याला वेदीवर परमेश्वराला अर्पण करण्याची तयारी दर्शविली, तेव्हा त्याच्या या कामामुळे तो देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरला नाही काय?
  • 22 तू पाहतोस की त्याच्या कृतीमध्ये विश्वाससुद्धा बरोबरीने कार्यरत होता व त्याचा विश्वास त्याच्या कृतीमुळे पूर्ण झाला.
  • 23 आणि अशा रीतीने पवित्र शास्त्र जे सांगते, ते परिपूणे झाले की, “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास हा त्याचे नीतिमत्त्व मोजला गेला.”आणि त्या कारणामुळे त्याला “देवाचा मित्र” असे म्हटले गेले.
  • 24 केवळ विश्वासामुळे नव्हे, तर त्याच्या कृतीमुळे मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला जातो, हे तुम्ही पाहता.
  • 25 त्याचप्रमाणे राहाब वेश्येने इस्राएली हेरांना आसरा देऊन, काही वेळानंतर निराळया वाटेने तेथून निसटून जाण्यासाठी मदत केली. तेव्हा ही कृती तिचे नीतिमत्त्व मानले गेले नाही काय?
  • 26 म्हणून, ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय मेलेले आहे, त्याचप्रमाणे विश्वास हा कृत्यांवाचून मेलेला असा आहे.