wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


लूक धडा 17
  • 1 येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी लोकांना देवापासून दूर नेतात त्या येणे निश्चित आहे, परंतु ज्याच्यामुळे त्या येणार त्याची वाईट दशा होवो!
  • 2 त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकणे हे त्याच्यासाठी अधिक बरे होईल.
  • 3 स्वत:कडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्याला धमकावा. आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्याची क्षमा करा.
  • 4 जर तो तुझ्याविरुद्ध दिवसातून सात वेळा पाप करतो आणि सात वेळा तुमच्याकडे येतो व म्हणतो, “मी पश्चात्ताप करतो,’ त्याला क्षमा करा.”
  • 5 मग शिष्य प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”
  • 6 प्रभु म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, “मुळासकट उपटून समुद्रात लावले जा.’ आणि ते तुमची आज्ञा पाळील.”
  • 7 समजा, तुमच्यापैकी एकाला एक सेवक आहे. व तो शेत नांगरीत आहे किंवा मेंढरे राखीत आहे. जेव्हा तो शेतातून परत येतो, तुम्ही त्याला “ताबडतोब ये आणि जेवायला बैस” असे म्हणाला का?
  • 8 उलट तुम्ही असे म्हणणार नाही का, “माझे भोजन तयार कर. आणि कामाचे कपडे घालून माझे खाणेपिणे चालू असताना माझी सेवा कर. त्यानंतर तू खाऊ पिऊ शकतोस?
  • 9 ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला आज्ञा करता ते केल्याबद्दल त्याचे आभार तुम्ही मानता काय?
  • 10 तुमच्या बाबतीतही हे तसेच आहे: जेव्हा तुम्हांला करण्यास सांगितलेली सर्व कामे तुम्ही केल्यावर असे म्हटले पाहिजे, “आम्ही कोणत्याही मानास पात्र नसलेले सेवक आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”‘
  • 11 येशू यरुशलेमाला जात असताना त्याने शोमरोन व गालील यांच्या सीमेवरुन प्रवास केला.
  • 12 तो एका खेड्यात जात असताना, कुष्ठरोग झालेले दहा पुरुष त्याला भेटले, ते दूर उभे राहीले.
  • 13 ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “येशू, गुरुजी आम्हांवर दया करा!”
  • 14 जेव्हा त्याने त्यांना पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “जा, आणि स्वत:ला याजकांना दाखवा.”ते जात असतानाच बरे झाले,
  • 15 जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की, आपण बरे झालो आहोत, तेव्हा तो परत आला व त्याने मोठ्या स्वरात देवाची स्तुति केली.
  • 16 तो येशूच्या पायाजवळ उपडा पडला. आणि त्याने त्याचे उपकार मानले. तो शोमरोनी होता.
  • 17 येशू त्याला म्हणाला, “दहाजण बरे झाले नव्हते काय? नऊजण कोठे आहेत?
  • 18 या विदेशी माणासाशिवाय कोणीही देवाची स्तुति करण्यासाठी परत आला नाही काय?”
  • 19 येशू त्याला म्हणाला, “ऊठ, आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
  • 20 एकदा, परुश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच राज्य दृद्दय स्वरुपात येत नाही. लोक असे म्हणणार नाहीत की
  • 21 ते येथे आहे! किंवा ते तेथे आहे! कारण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
  • 22 पण शिष्यांना तो म्हणाला, “असे दिवस येतील की जेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या गौरवाने येण्याच्या एका दिवसाची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहाल. परंतु तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही.
  • 23 आणि लोक तुम्हांला म्हणतील, “तेथे पाहा! तेथे जाऊ नका. किंवा त्यांच्यामागे जाऊ नका.
  • 24 “कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत चमकते आणि प्रकाशते तसेच मनुष्याच्या पुत्राचे त्याच्या दिवसात होईल.
  • 25 पण पहिल्यांदा त्याने पुष्कळ गोष्टीविषयी दु:ख भोगले पाहिजे. व या पिढीने त्याला नाकारले पाहिजे.
  • 26 जसे नोहाच्या दिवसांत झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसातदेखील होईल. ते खात होते, पीत होते, लग्न करीत होते. लग्न करुन देत होते.
  • 27 नोहा तारवात जाईपर्यंत असे चालले होते. मग पूर आला. व त्या सर्वांचा नाश झाला.
  • 28 त्याचप्रकारे लोटाच्या दिवसात झाले तसे होईल: ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते.
  • 29 परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून बाहेर पडला त्या दिवशी आकाशातून अग्नि व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला.
  • 30 मनुष्याचा पुत्र प्रगट होईल तेव्हा असेच होईल.
  • 31 “त्या दिवशी जर एखादा छपरावर असेल व त्याचे सामान घरात असेल, त्याने ते घेण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.
  • 32 लोटाच्या पत्नीची आठवण करा.
  • 33 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला गमावील आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्याला राखील.
  • 34 मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यापैकी एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.
  • 35 दोन स्त्रिया धान्य दळत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.
  • 36 शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्यायाला ठेविले जाईल.”
  • 37 शिष्यांनी त्याला विचारले, “कोठे प्रभु?” येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”