wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


मत्तय धडा 23
  • 1 मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला,
  • 2 “नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत.
  • 3 म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा. पण ते जसे करतात तसे करू नका. मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाहीत.
  • 4 वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वत: ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत.
  • 5 ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात. ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्यामोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पाहावे म्हणून लांब झगे घालतात.
  • 6 मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते.
  • 7 बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते.
  • 8 “परंतु तुम्ही स्वत:ला गुरूजी म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे.
  • 9 आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका. कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे.
  • 10 तुम्ही स्वत:ला ‘मालाक’ म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे.
  • 11 तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय.
  • 12 जो स्वत:ला मोठा समजेल त्याला कमी लेखले जाईल. स्वत:ला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल.
  • 13 अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वत: तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.
  • 14
  • 15 “परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनी, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहाता आणि तुम्हांला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नरकपुत्रासारखे करून टाकता.
  • 16 “तुम्हांला दु:ख होईल. आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही, पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो, तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे.
  • 17 तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्त्वाचे? मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते.
  • 18 आणि तुम्ही असे म्हणता. जर एखादा वेदीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही. पण जर एखादा वेदीवरील अर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पहिजे.
  • 19 तुम्ही आंधळे आहात. तुम्हांला काही दिसत नाही व कळत नाही! अर्पण मोठे की वेदी मोठी? वेदीमुळे अर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी.
  • 20 म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदीबरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो.
  • 21 तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो.
  • 22 जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो.
  • 23 परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता- पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दंशाश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे- न्यायाने वागणे, दया दाखविणे व प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही. या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत.
  • 24 तुम्ही आंधळे वाटाडे आहात. जो पाण्याने भरलेल्या प्याल्यातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो त्याच्यासारखे तुम्ही चष्टी तुमह् तु्ापण
  • 25 निमअहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताटवाट्या बाहेरून घासता पुसता पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम यानी त्या आतून भरल्या आहेत.
  • 26 अहो परुश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.
  • 27 अहो परुश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्या वरून चांगल्या दिसतात पण आतून मेलेल्या माणसांच्या हाडांनी भरल्या आहेत.
  • 28 तुमचेही तसेच आहे. लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते. पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला आहात.
  • 29 अहो, परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांसाठी कबरा बांधता. आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता.
  • 30 आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्ट्यांना जिवे मारण्यास मदत केली नसती.
  • 31 पण ज्यांनी ज्यानी त्यांना जिवे मारले. त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता.
  • 32 पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा.
  • 33 तुम्ही साप आहात. विषारी सापाची पिल्ले आहात! तुम्ही देवाच्या हातून सुटू शकणार नाही. तुम्हा सर्वांना दोषी ठरविण्यात येईल. तुम्ही नरकात जाल.
  • 34 मी तुम्हांला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात मारहाण कराल. त्यांचा नगरानगरातून पाठलाग कराल.
  • 35 म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्याकाळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल.
  • 36 मी तुम्हांला खरे सांगतो; तुम्ही लोक जिवंत असेपर्यंत या गोष्टी घडतील.
  • 37 अगे, यरूशलेमे, यरूशलेमे, तू संदेष्ट्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस.
  • 38 आता तुझे घर उजाड होईलमी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.
  • 39 असे म्हणेपर्यत तू मला पाहणार नाहीस.”