wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


प्रकटीकरण धडा 20
  • 1 आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठासाखळदंड होता.
  • 2 त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि एक हजार वर्षासाठी साखळदंडानेबांधून ठेवले.
  • 3 त्याने एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत राष्ट्रांना आणखी फसवू नये. म्हणून त्या देवदूताने त्याला खोल बोगद्यातटाकून दिले. आणि त्या दाराला कुलूप लावून शिक्का मारला. त्या काळांनंतर पुन्हा थोडा काळ त्याला मोकळे सोडण्यातयेणार होते.
  • 4 नंतर ज्यांच्यावर लोक बसलेले आहेत, अशी काही सिंहासने मी पाहिली. या लोकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकारदेण्यात आला होता आणि येशूबाबतच्या सत्याविषयी साक्ष दिल्यामुळे व प्रभु देवाच्या संदेशामुळे ज्या लोकांना जिवे मारण्यातआले, त्यांचे आत्मे मी पाहिले. त्या लोकांनी श्र्वापदाची अथवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती, आणि त्यांच्याकपाळावर किंवा हातावर त्या जनावराचा शिक्का मारलेला नव्हता. ते परत जिवंत झाले. आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एकहजार वर्षे राज्य केले.
  • 5 (इतर जे मेले होते, ते एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही) जे पाहिले पुनरुत्थानते हेच होय.
  • 6 ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य! त्या लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही;उलट ते लोक देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील; आणि ते त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
  • 7 नंतर, जेव्हा एक हजार वर्षे संपतील, तेव्हा सैतानाला त्याच्या तुरुंगवासातून सोडण्यात येईल.
  • 8 आणि जगाच्या चारहीकोपऱ्यात पसरलेल्या राष्ट्रांना फसविण्यासाठी सैतान बंदीवासातून बाहेर पडेल. त्याने फसवून गोग व मागेग यांना लढाईसाठीएकत्र आणले. त्यांची संख्या सागराच्या वाळूच्या संख्येइतकी आहे.
  • 9 ते सैतानाचे सैनिक जगाच्या एका टोकापासून दुसऱ्याटोकापर्यंत चाल करुन आले आणि त्यांनी देवाच्या लोकांच्या छावणीला व प्रिय नगराला वेढा दिला. परंतु स्वर्गातून अग्निखाली उतरला आणि त्यांना जाळून त्यांची राख केली.
  • 10 मग ज्याने त्यांना फसविले होते, त्याला त्या धगधगत्यासरोवरामध्ये, श्र्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल. आणि त्यांनाअनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील.
  • 11 नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मीपाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.
  • 12 नंतर मेलेलेलहानथोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले. अनेक पुस्तके उघडलेली होती. आणि आणखी एक. म्हणजे जीवनीपुस्तक उघडले होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करण्यातआला.
  • 13 सागराने आपल्यामधील मेलेले लोक बाहेर सोडून दिले. तसेच मरण आणि अधोलोक यांनी आपल्यामधील मेलेलेलोक सोडून दिले. आणि प्रत्येक मनुष्याचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार करण्यात आला.
  • 14 नंतर मरण व अधोलोकयांना अग्नीच्या तळ्यात टाकण्यात आले. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण होय.
  • 15 आणि जर कोणाचे नाव जीवनीपुस्तकात सापडले नाही, तर त्याला अग्नीच्या तळ्यात टाकण्यात येत होते.