wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


रोमकरांस धडा 15
  • 1 आपण जे आत्मिकरीत्या सशक्त आहोत त्या आपण आपणाला सुखी न करता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.
  • 2 आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याला त्यांच्याकरिता व त्यांची उन्रती व्हावी या हेतूने सुखी करावे.
  • 3 ख्रिस्ताने सुद्धा स्वत:ला सुखी केले नाही. याउलट पवित्र शास्त्रात लिहिले आहे. “तुझी निंदा करणान्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.”
  • 4 आता पवित्र शास्त्रत पूर्वी जे लिहिले होते ते आपल्या शिक्षणाकरिता लिहिले होते यासाठी की, शास्त्रापासून मिळणारे उतेजन आणि धीर यांची आपण आशा धरावी म्हणून शिकवितो.
  • 5 आणि देव जो धीराचा आणि उतेजनाचा उगम आहे, तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे.
  • 6 म्हणजे तुम्ही सर्व जण एक मुखाने देव जो आपला प्रभु येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे.
  • 7 म्हणून ख्रिस्ताने देवाच्य गौरवासाठी तुम्हाल स्वीकारले. तसे तुम्ही एकमेकांचा स्वीकार व स्वागत करा.
  • 8 मी तुम्हांस सांगतो देवाच्या सत्यतेसाठी ख्रिस्त सुंती लोकांचा, यहूदी लोकांचा सेवक झाला यासाठी की पूर्वजांना दिलेली वचने निश्चित व्हावीत.
  • 9 यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.” स्तोत्र. 18:49
  • 10 आणि पुन्हा शाश्त्र असे म्हणते,“विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.” अनुवाद 32:43
  • 11 आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते. “अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.” स्तोत्र. 117:1
  • 12 यशयासुद्धा असे म्हणतो,“इशायाचे मूळ प्रगट होईल, ते राष्ट्रावर राज्य करावयास उत्पन्र होईल. ती राष्ट्रे त्याच्यावर आपला विश्वास ठेवतील.” यशया 11:10
  • 13 देव जो सर्व आशेचा उगम, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की, तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे.
  • 14 माझ्या बंधूंनो, मी तुम्हांविषयी निश्चित आहे की, तुम्ही चांगुलपणाने, ज्ञानाने पूर्ण भरलेले व एकमेकांस बोध करावयास समर्थ आहात.
  • 15 परंतु तुम्हांला धीटपणे काही गोष्टींची आठवण देण्यासाठी लिहिले आहे. मी हे देवाने दिलेल्या देणगीमुळे असे केले.
  • 16 ते हे की, विदेशी लोकांची सेवा करण्यासाठी मी ख्रिस्त येशूचा सेवक व्हावे व देवाच्या सुवार्तेचे याजकपण करावे, अशासाठी परराष्ट्रीय हे देवाला मान्य, पवित्र आत्म्याचे समर्पित असे व्हावे.
  • 17 तर मग मी जो आता खिस्त येशूमध्ये आहे तो देवाशी संबंधित असलेल्या गोष्टीत अभिमान बाळगतो.
  • 18 कारण माझ्या शब्दांनी आणि कृत्यांनी विदेशी लोकांनी आज्ञापालन करावे अशा ज्या गोष्टी ख्रिस्ताने माझ्या करवी घडविल्या नाहीत, त्या सांगणयाचे धैर्य मी करणार नाही.
  • 19 अदभुते, चमत्काराच्या व देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने मी यरुशलेमेपासून इल्लूरिकमाच्या सभोवती ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्याचे पूर्ण केले आहे.
  • 20 जेथे ख्रिस्ताचे नाव सांगितले जात नाही अशा ठिकाणी सुवार्ता सांगण्याची माझी आकांक्षा आहे. यासाठी की मी दुसऱ्याच्या पायावर बांधु नये.
  • 21 परंतु असे लिहिले आहे,“ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील आणि ऐकले नाही ते समजतील.” यशया 52:15
  • 22 या कारणांमुळे मला तुमच्याकडे येण्यास पुष्कळ वेळा अडथळा झाला.
  • 23 परंतु ज्या अर्थी मला या प्रांतात एकही ठिकाण राहीले नाही, व पुष्कळ वर्षांपासून तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा आहे.
  • 24 जेव्हा मी स्पेनला जाईल तेव्हा तुम्हांला भेटण्याचा विचार करीत आहे व तुमच्याविषयी माझे मन भरल्यावर माझ्या त्या प्रवासात तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे.
  • 25 पण मी यरुशलेमातील संतांच्या सेवेसाठी जात आहे.
  • 26 कारण मासेदोनिया आणि अखिया येथील मंडळ्यांनी यरुशलेमेतील गरीब संत जनांना मदत करण्याचे ठरविले आहे.
  • 27 ते त्यांचे ऋणी आहेत. व त्यांनी हे करण्याचे ठरविले आहे, कारण जर यहूदीतरांना इस्राएलाच्या आशीर्वादात भागी मिळाली आहे, तर त्यांनी त्यांच्या ऐहिक गरजा भागवून त्यांची सेवा करावी.
  • 28 मग हे काम संपवून त्याचे फळ सुरक्षितपणे त्याच्या हाती सोपविल्यावर जेव्हा मी स्पेनला जाण्यासाठी निघेन, तेव्हा मी त्या मार्गाने जात असता तुमच्या शहरातून जाईन.
  • 29 आणि मला माहीत आहे की, मी जेव्हा तुमच्याकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या पूर्ण आशीर्वादाने भरलेला असा येईन.
  • 30 बंधूंनो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामुळे आणि आत्म्याकडून जे प्रेम आपणांकडे येते त्यामुळे माझ्या वतीने, माझ्याबरोबर देवाजवळ आग्रहाने प्रार्थना करण्याची विनंति करतो.
  • 31 यासाठी की यहूदीयात जे अविश्वासू आहेत त्यांच्यापासून माझी सुटका व्हावी आणि यरुशलेमेतील मंडळीतील माझी सेवा संताना मान्या व्हावी.
  • 32 यासाठी की, देवाच्या इच्छेने मी तुम्हांकडे आनंदाने यावे आणि तुम्हांबरोबर ताजेतवाने व्हावे.
  • 33 शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.