wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 9
  • 1 इस्राएलच्या सर्व लोकांची नोंद वंशावळ्यांमध्ये केलेली आहे. इस्राएलच्या राजाचा इतिहास या पुस्तकात ती ग्रंथित केलेली आहे.देवाशी एकनिष्ठ न राहिल्याने यहूदाच्या लोकांना बाबेल येथे कैद करुन नेण्यात आले.
  • 2 त्यापैकी जे सगळ्यात आधी आपल्या, गावात येऊन राहिले ते म्हणजे इस्राएल लोक याजक, लेवी आणि मंदिरातील कामकरी वर्ग.
  • 3 यरुशलेममध्ये राहणाऱ्या यहूदा, बन्यामीन, एफ्राईम आणि मनश्शे घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे:
  • 4 ऊथय हा अम्मीहूदचा मुलगा. अम्मीहूद हा अम्रीचा मुलगा. अम्री इम्रीचा मुलगा. इम्री बानीचा मुलगा. बानी पेरेसच्या वंशजांपैकी. पेरेस हा यहूदाचा मुलगा.
  • 5 यरुशलेममध्ये राहणारे शिलोनी लोक असे: ज्येष्ठ पुत्र असाया आणि त्याचे मुलगे.
  • 6 यरुशलेममधील जेरह चे वंशज म्हणजे यऊवेल आणि त्याचे एकंदर 690 भाऊबंद.
  • 7 यरुशलेममधील बन्यामीन घराण्यातील लोक पुढीलप्रमाणे: सल्लू हा मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम होदव्याचा मुलगा. होदवा हस्सनुवाचा मुलगा.
  • 8 इबनया हा यरहोरामचा मुलगा. एला उज्जीचा मुलगा. उज्जी मिख्रीचा मुलगा. मशुल्लाम शफाटयाचा मुलगा. शफाटया रगुवेलचा मुलगा रगुवेल इबनीया याचा मुलगा.
  • 9 बन्यामीनच्या वंशावळीवरुन असे दिसते की यरुशलेममध्ये हे एकंदर 256होते. हे सर्व आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते.
  • 10 यरुशलेममधील याजक पुढीलप्रमाणे: यदया, यहोयारीब, याखीन,
  • 11 अजऱ्या. अजऱ्या हा हिल्कीयाचा मुलगा. हिल्कीया मशुल्लामचा मुलगा. मशुल्लाम सादोकचा. सादोक मरायोथचा आणि मरायोथ अहीटूबचा मुलगा. अहीटूब हा देवाच्या मंदिरावरील प्रमुख अधिकाही होता.
  • 12 यहोरामचा मुलगा अदाया होता. यहोराम हा पशहूरचा मुलगा. पशहूर मल्कीयाचा, आणि अदीएलचा मुलगा मसय. अदीएल यहजेराचा मुलगा, यहजेरा मशुल्लामचा मुलगा, मशुल्लेम मशिल्लेमीथचा, मशिल्लेमीथ इम्मेराचा मुलगा.
  • 13 असे एकंदर 1,760 याजक होते. ते आपापल्या घराण्यांचे मुख्य होते. देवाच्या मंदिरातील सेवेच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
  • 14 यरुशलेममधील लेवी घराण्यातले लोक याप्रमाणे: हश्शूबचा मुलगा शमाया. हश्शूब अज्रीकामचा मुलगा. अज्रीकाम हशब्याचा मुलगा. हशब्या हा मरारीच्या वंशातला.
  • 15 याखेरीज बकूबकर, हेरेश, गालाल आणि मतन्या हे ही यरुशलेममध्ये राहत होते. मतन्या मीखाचा मुलगा. मीखा जिख्रीचा मुलगा. जिख्री आसाफचा मुलगा.
  • 16 ओबद्या शमाया याचा मुलगा. शमाया गालालचा मुलगा. गालाल यदूथूनचा मुलगा. याखेरीज आसा याचा मुलगा बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एल्कानाचा मुलगा. एल्काना हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.
  • 17 यरुशलेममधील द्वाररक्षक पुढीलप्रमाणे: शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहीमान आणि त्यांचे नातलग. शल्लूम हा त्यांच्यावरचा मुख्य.
  • 18 हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते.
  • 19 शल्लूम हा कोरे याचा मुलगा. कोरे हा एब्यासाफचा मुलगा. एब्यासाफ कोरहचा मुलगा. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहच्या वंशातले होते. पवित्र निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते हे काम पार पाडत होते. त्यांच्या पूर्वजांकडेही हीच जबाबदारी होती.
  • 20 पूर्वी फिनहास द्वारपालाचा प्रमुख होता. फिनहास हा एलाजारचा मुलगा. परमेश्वर फिनहासचा पाठीराखा होता.
  • 21 जखऱ्या पवित्र निवासमंडपाचा द्वारपाल होता.
  • 22 पवित्र निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर 292निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती
  • 23 परमेश्वराच्या मंदिराच्या, पवित्र निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती.
  • 24 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती.
  • 25 आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत.
  • 26 या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.
  • 27 देवाच्या मंदिरावर पहारा करत ते रात्रभर जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
  • 28 मंदिरात वापरायच्या पात्रांची देखभाल काही द्वारपाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत.
  • 29 लाकडी सामान, विशेष उपकरणे यांच्यावर इतर काही द्वारपाल नेमलेले होते. पीठ, द्राक्षारस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य यांच्यावरही
  • 30 त्यांचीच देखरेख होती. हे सुवासिक द्रव्य सिध्द करण्याचे काम याजकांचे होते.
  • 31 अर्पणाच्या भाकरी भाजण्याच्या कामगिरीवर मत्तिथ्या नावाचा लेवी होता. मत्तिथ्या हा शल्लूमचा थोरला मुलगा. शल्लूम कोरा कुटुंबातील होता.
  • 32 कोरा कुटुंबातील काही द्वार रक्षकांना शब्बाथच्या दिवशी मेजावर मांडायचा पाव तयार करण्याचे काम सोपवलेले होते.
  • 33 लेर्वीपैकी जे घराण्यांचे प्रमुख आणि गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत असत. मंदिरातील कामाची जबाबदारी रात्रंदिवस त्यांच्यावर असल्याने अमुकच असे काम त्यांच्यावर सोपवलेले नव्हते.
  • 34 हे सर्व लेवी आपापल्या घराण्यांचे प्रमुख होते. तशी वंशावळ्यांमध्ये नोंद आहे. ते यरुशलेममध्ये राहत असत.
  • 35 ईयेल म्हणजे गिबोनचे वडील. ईयेल गिबोन मध्येच राहत होता. त्याच्या बायकोचे नाव माका.
  • 36 ईयेल्या ज्येष्ठ मुलाचे नाव अब्दोन. सूर, कीश, बाल, नेर आणि नादाब त्याची आणखी मुले.
  • 37 शिवाय गदोर, अह्यो, जखऱ्या आणि मिकलोथ ही त्याचीच मुले.
  • 38 मिकलोथने शिमामला जन्म दिला. ईयेलचे कुटुंब यरुशलेममध्ये आपल्या भाऊबंदाजवळच राहत होते.
  • 39 नेर हे कीशाचे वडील. कीश शौलाचे वडील. योनातान, मलकी शुवा, अबीनादाब आणि एश्बाल ही शौलची मुले.
  • 40 मरीब्बाल हा योनाथानचा मुलगा. मीखा हा मरीब्बालाचा मुलगा.
  • 41 पीथोन, मेलेख आणि तरहेया हे मीखाचे मुलगे.
  • 42 आहाजने यारा याला जन्म दिला.आलेमेथ, अजमावेथ आणि जिम्रीयांना याराने जन्म दिला. जिम्रीने मोसा याला जन्म दिला.
  • 43 मोसाचा मुलगा बिना. बिनाचा मुलगा रफाया. रफायाचा मुलगा एलासा आणि एलासाचा मुलगा आसेल.
  • 44 आसेलला सहा मुलगे झाले. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखरु, इश्माएल, शाऱ्या, ओबद्या आणि हानान. ही झाली आसेलची मुले.