wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 राजे 1धडा 15
  • 1 नबाटाचा मुलगा यराबाम इस्राएलवर राज्य करत होता. त्याच्या राजेपणाच्या कारकिर्दीचे अठरावे वर्ष चालू असताना, त्याचा (रहबामचा) मुलगा अबीया यहूदाचा पुढचा राजा झाला.
  • 2 अबीयाने तीन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव माका ही अबीशालोमची मुलगी.
  • 3 आपल्या वडीलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ट नव्हता.
  • 4 दावीदावर परमेश्वराचे प्रेम होते. त्याखातर त्याने अबीयाला यरुशलेमचे राज्य दिले. परमेश्वराच्या कृपेने त्याला मुलगाही झाला यरुशलेमला परमेश्वर दयेने सुरक्षितताही लाभली. हे सर्व दावीदासाठीच परमेश्वराने केले.
  • 5 दावीदाचे वर्तन परमेश्वराच्या इच्छेनुसार, योग्य असेच होते. त्याने परमेश्वराच्या आज्ञांचे नेहमीच पालन केले. उरीया हित्तीबद्दल घडलेले चुकीचे वर्तन एवढाच काय तो अपवाद.
  • 6 रहबाम आणि यराबाम नेहमीच एकमेकांविरुध्द लढत असत.
  • 7 अबीयाने आणखी जे काही केले त्याची नोंद ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.अहीयाच्या संपूर्ण कारकिर्दींत अहीया आणि यराबाम यांच्यात लढाई चालू असे.
  • 8 अबीयाला त्याच्या मृत्यूनंतर दावीद नगरात पुरले. त्याचा मुलगा आसा राज्य करु लगला.
  • 9 यराबामच्या इस्राएलवरील राज्याच्या विसाव्या वर्षी आसा यहूदाचा राजा झाला
  • 10 आसाने यरुशलेमवर एक्के चाळीस वर्षे राज्य केले. त्याच्या आजीचे नाव माका. ती अबीशालोमची मुलगी.
  • 11 आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच परमेश्वराच्या मते जे योग्य तेच आसाने केले.
  • 12 त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडीलांनी केलेल्या मूर्तीही हलवल्या.
  • 13 आपली आजी माका हिला आसाने राणी, होण्यापासून दूर केले. अंमगळ दैवत अशेरा हिची एक मूर्ती या आजीनेही केली होती. आसाने त्या मूर्तीची मोडतोड केली. किद्रोन खोऱ्यात ती जाळून टाकली.
  • 14 उंचवट्यावरील पूजास्थळांची त्याने नासधूस केली नाही, मात्र आयुष्यभर तो परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.
  • 15 आसा आणि त्याचे वडील यांनी परमेश्वरासाठी काही वस्तू करुन घेतल्या होत्या. सोन्याचांदीच्या वस्तू आणि आणखी काही गोष्टी त्यात होत्या. त्या सर्व त्याने व्यवस्थित मंदिरात जमा केल्या.
  • 16 आसा यहूदावर राज्य करीत असेपर्यंत इस्राएलचा राजा बाशा याच्याशी त्याच्या लढाया चालत.
  • 17 बाशाने यहूदावर चढाया केल्या. आसाच्या प्रदेशातील लोकांचे येणेजाणे त्याला थांबवायचे होते. त्यामुळे रामा नगर त्याने चांगले मजबूत केले.
  • 18 आसाने मग परमेश्वराच्या मंदिराच्या खजिन्यातले आणि महालातले सोनेनाणे काढून घेतले. आपल्या सेवकांच्या हाती ते सोपवून त्यांना त्याने अरामचा राजा बेन हदाद यांच्याकडे पाठवले. बेनहदाद हा तब्रिम्मोनचा मुलगा आणि तब्रिम्मोन हेज्योनचा. बेनहदादची राजधानी दिमिष्क होती.
  • 19 आसाने आपल्या संदेशात म्हटले होते, “माझे वडील आणि तुझे वडील यांच्यात शांततेचा करार झाला होता. आता मला तुझ्याशी करार करायचा आहे. तुला मी हा सोन्यारुप्याचा नजराणा पाठवत आहे. इस्राएलचा राजा बाशा याच्याशी झालेल्या कराराचा तू भंग कर म्हणजे तो माझ्या प्रदेशातून निघून झाईल.”
  • 20 राजा बेनहदाद याने आसाशी करार केला आणि इयोन, दान, आबेल - बेथ माका, गालिल सरेवरालगतची गावे आणि नफतालीचा प्रांत यांच्यावर चढाई करायला आपले सैन्य पाठवले.
  • 21 या हल्ल्याची बातमी बाशाच्या कानावर गेली. तेव्हा त्याने रामा नगराच्या मजबुतीचे काम सोडले, ते गाव सोडले आणि तिरसा या ठिकाणी तो परतला.
  • 22 मग आसा राजाने यहूदातील सर्व प्रजेला मदतीसाठी पाचारण केले एकही जण त्यातून सुटला नाही. ते सर्व रामा येथे गेले. तिथून त्यांनी बाशाची दगड, लाकूड वगैरे सर्व बांधकामसामग्री आणली. बन्यामीनमधील मेबा आणि मिस्पा येथे हे सर्व सामान त्यांनी वाहून नेले. आसाने ही नगरे चांगली भक्कम केली.
  • 23 आसाबद्दलच्या इतर गोष्टी, त्याचे पराक्रम, त्याने बांधलेली नगरे या सगळ्यांची माहिती ‘यहूदाच्या राजांच्या इतिहास’ या पुस्तकात लिहिलेली आहे. म्हातारपणी आसा पायाच्या दुखण्याने बेजार झाला.
  • 24 त्याचे निधन झाल्यावर त्याच्या पूर्वजांच्या दावीदनगरात त्याचे दफन झाले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा यहोशाफाट राज्य करु लागला.
  • 25 यहूदाचा राजा म्हणून आसाचे दुसरे वर्ष चालू असताना यराबामचा मुलगा नादाब इस्राएलचा राजा झाला. त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.
  • 26 नादाबने परमेश्वरविरोधी कृत्ये केली. आपले वडील यराबाम यांच्यासारखीच दुष्कृत्ये केली यराबामने इस्राएल लोकांनाही पाप करायला लावले होते.
  • 27 बाशा हा अहीयाचा मुलगा. हे इस्साखारच्या वंशातले. बाशाने नादाब राजाला मारायचा कट केला. नादाब आणि इस्राएल लोक गिब्बथोन या पलिष्ट्यांच्या नगराला वेढा घालत होते तेव्हाची ही गोष्ट आहे. बाशाने या ठिकाणी नादाबला ठार केले.
  • 28 आसाचे हे यहूदाचा राजा म्हणून तिसरे वर्ष होते. मग बाशा इस्राएलचा राजा झाला.
  • 29 बाशा राजा झाल्यावर त्याने यराबामच्या कुळातील सर्वांना ठार केले. कोणाचीही त्याने गय केली नाही. शिलोचा संदेष्टा अहीया याच्यामार्फन परमेश्वराने जी भविष्यवाणी केली होती तसेच हे झाले.
  • 30 राजा यराबामने बरीच पापे केली होती, तसेच इस्राएल लोकांनाही ती करायला लावली म्हणून हे घडले. इस्राएलचा परमेश्वर देव याचा यराबामवर कोप झाला.
  • 31 ‘इस्राएलच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात नादाबचे इतर पराक्रम नोंदलेले आहेत.
  • 32 बाशा इस्राएलवर राज्य करत असताना यहूदाचा राजा आसा याच्याशी त्याचे सर्वकाळ युध्द चालले होते.
  • 33 आसाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी अहीयाचा मुलगा बाशा हा इस्राएलचा राजा झाला. तिरसामध्ये राहून त्याने चोवीस वर्षे राज्य केले.
  • 34 पण परमेश्वराच्या मते जे गैर ते त्याने केले. आपले वडील यराबाम यांनी केली तीच पातके बाशानेही केली. यराबामने इस्राएल लोकांनाही पापे करायला लावली होती.