wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 शमुवेल 1धडा 25
  • 1 शमुवेल मरण पावला. तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून दुखवटा व्यक्त केला. शमुवेलचे दफन त्यांनी रामा येथील त्याच्या घराजवळ केले. नंतर दावीद पारानच्या वाळवंटाकडे गेला.
  • 2 मावोन येथे तेव्हा एक धनाढ्य माणूस राहात असे. त्याच्याकडे तीन हजार मेंढरे आणि हजार बकऱ्या होत्या. हा एकदा आपल्या मेंढरांची लोकर कातरायला कर्मेल येथे गेला.
  • 3 हा कालेब वंशातला असून त्याचे नाव नाबाल होते. त्याची बायको अबीगाईल. ती हुशार तसेच सुंदर होती. पण नाबाल मात्र नीच आणि दुष्ट होता.
  • 4 नाबाल त्याचे लोकर कातरण्याचे काम करत होता तेव्हा दावीद वाळवंटात होता. त्याला काही नाबालची गोष्टी कळली.
  • 5 तेव्हा दावीदाने दहा तरुणांना त्याच्याशी बोलायला पाठवले. तो म्हणाला, “कर्मेलला जा. नाबालला भेटा आणि माझ्यातर्फे त्याला नमस्कार सांगा.”
  • 6 दावीदाने याखेरीज नाबालसाठी निरोपही दिला. तो असा, “तुझे आणि तुझ्या कुटुंबियांचे कुशल आहेना? तुझे सर्व व्यवस्थित चालले आहेना?
  • 7 तुझ्याकडे लोकर कातरण्याचे काम चालले आहे असे मी ऐकले. तुझ्याकडचे धनगर तुकतेच इथे आले होते. त्यांना आमच्याकडून काहीही उपद्रव झालेला नाही. कर्मेल येथे ते असताना त्यांच्याकडून आम्ही काही घेतलेले नाही.
  • 8 तू त्यांनाही विचार तेही हेच सांगतील. मी पाठवलेल्या या तरुणांवर लोभ असू दे. तुझ्या या भरभराटीच्या काळात आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तेव्हा या तरुणांना तू तथाशक्ती काही तरी द्यावेस. माझ्यासाठी, तुझा या मित्र दावीदासाठी म्हणून एवढे कर.”
  • 9 दावीदाच्या सांगण्याप्रमाणे ते तरुण नाबाल कडे गेले. त्यांनी दावीदचा निरोप नाबालला सांगितला.
  • 10 पण नाबाल त्यांच्याशी अतिशय क्षुद्रपणे वागला. तो म्हणाला, “कोण हा दावीद? हा इशायचा मुलगा कोण? आजकाल बरेच दास आपल्या मालकांकडून पळून जातात.
  • 11 भाकर आणि पाणी माझ्याकडे आहे. तसेच या लोकर कातरणाऱ्या माझ्या नोकरांसाठी काही मांस आहे. पण असल्या अनोळखी लोकांना मी काहीही देणार नाही.”
  • 12 हे एकून ते सगळे दावीदकडे परत आले आणि नाबाल बोलला ते सर्व त्यांनी त्याला सांगितले.
  • 13 तेव्हा दावीद त्यांना म्हणाला, “आता तलवारी हाती घ्या” आणि दावीदसकट या सर्वांनी शस्त्र उचलले. जवळजवळ चारशे जण दावीद बरोबर होते. दोनशे माणसे तेथेच सामानसुमानाजवळ राहिली.
  • 14 नाबालच्या एका सेवकाने अबीगईलला ही खबर दिली. तो म्हणाला, “दावीदाने आपल्या धन्याकडे काही तरुणांना भेटायला पाठवले होते. पण नाबाल त्यांच्याशी क्षुद्रपणे वागला.
  • 15 त्या माणसांची वागणूक मात्र चांगली होती. मेंढरांबरोबर आम्ही उघड्यावर होतो. दावीदची माणसेही तेथेच वावरत होती. पण त्यांनी आमचे काहीही वाकडे केले नाही. आमची कुठलीही गोष्ट चोरीला गेली नाही.
  • 16 दावीदाच्या लोकांनी आमचे दिवस रात्र रक्षण केले. जणू त्यांनी आमच्या भोवती तटच उभारला होता. आम्ही मेंढरांमागे असतांना त्यांचे आम्हाला संरक्षण होते.
  • 17 आता तुम्हीच विचार करून काया ते ठरव. नाबालचे कृत्य अविचारीपणाचे आहे. त्या मुळे आमच्या धन्यावर आणि त्याचा कुटुंबावर संकट ओढवणार आहे.“
  • 18 अबीगईलने तेव्या वेळ न गमावता दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे धान्य, द्रक्षचे शंभर घड, आणि सुक्या अंजिराच्य दोनसे ढेपा एवढे सामान गाढवांवर लादले।
  • 19 आपल्या नोकारांना तिने संगितले,“तुम्ही हे घेउन पुढे व्हा. मी आनेच.“नवर्याला तिने ही गोष्ट सांगितली नाही.
  • 20 आल्पा गाढवावर बसून ती डोंगराच्य दुसर्या बाजूकडून जायगा लागली . तेव्हा तिला समोरून दावीद आणि त्याचा बरोबरचि माणसे येताना दिसली.
  • 21 ती भेटायच्या आधी दावीद म्हणत होता, बाल बंटातमी नाबालच्या माल मत्तेचे रक्षण केले. त्याची मेंढरे चुकू देली नाहीत. मी काहीही अपेक्षा न ठेवता हे केले. त्याच्याशी चांगले वागूनही तो आता असे वाईट वागत आहे.
  • 22 आता मात्र त्याच्या कुटुंबातील एकजण जरी उद्यापर्पंत शिल्लक राहिला तरी देव मला शिक्षा करील.”
  • 23 तेवढ्यात अबीगईल तेथे पोचली. दावीदला पाहताच ती लगबगीने गाढवावरुन उतरली. दावीदला तिने वाकून आभिवादन केले.
  • 24 त्याच्या पायाशी लोळण घेत ती त्याला म्हणाली, “कृपया मला बोलू द्या. मी काय म्हणते ते ऐकून घ्या. जे झाले त्याबद्दल दोष माझा आहे.
  • 25 तुमच्या माणसांना मी पाहिले नाही. त्या नीच नाबालकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे. त्याच्या नावाचा अर्थच नीच असा आहे आणि तो खरोखर तसाच आहे.
  • 26 निर्दोष लोकांची हत्या तुमच्याहातून होण्यापासून परमेश्वराने तुम्हाला वाचवले आहे. परमेश्वर जिवंत असेपर्यंत तुम्ही येथे असेपर्यंत, तुमच्या वाईटावर असलेले लोक, तुमचे शत्रु यांची गत नाबाल प्रमाणेच होईल असे वाटते.
  • 27 मी आत्ता तुमच्यासाठी हे भेट म्हणून आणले आहे. तुमच्या बरोबरच्या लोकांना हे सर्व द्या.
  • 28 माझ्याहातून घडलेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा. परमेश्वर तुमच्या घराण्यावर कृपादृष्टी ठेवील. तुमच्या घराण्यातील खुप लोक राज्य करतील. तुम्ही परमेश्वराच्या वतीने युद्ध करता म्हणून परमेश्वर हे घडवून आणील. तुमच्या हयातीत तुमच्या बद्दल लोकांच्या मनात कधीही किंतू उदभवणार नाही.
  • 29 कोणी तुमच्या जिवावर उठले तर परमेश्वर तुमचे रक्षण करील. पण गोफणीतीले धोंड्याप्रमाणे त्या मारेकऱ्याचा मात्र जीव घेईल.
  • 30 परमेश्वराने तुमच्या भल्याचे आश्वासन दिले आहे आणि त्याचे वचन तो प्रत्यक्षात आणेल. परमेश्वर तुम्हाला इस्राएलचा प्रमुख म्हणून नेमेल.
  • 31 निर्दोष लोकांच्या हत्येचे पाप तुम्हाला लागणार नाही. तुम्ही असा सूड उगवणार नाही. तुमची भरभराट होईल तेव्हा माझी आठवण असू द्या.”
  • 32 तेव्हा दावीद अबीगईलला म्हणाला, “परमेश्वराचे, इस्राएलच्या परमेश्वराचे आभार मान. मला भेटायला पाठवल्या बद्दल परमेश्वराची स्तुतीकर.
  • 33 तुझ्या निर्णयाबद्दल देव तुझे भले करो. आज निरपराध लोकांच्या हत्येपासून तू मला वाचवलेस.
  • 34 खरोखर परमेश्वराची शपथ, तू लगबगीने आत्ता मला भेटायला आली नसतीस तर उद्या सकाळपर्यंत नाबालच्या कुटुंबातील एकही जण वाचला नसता.”
  • 35 दावीदाने मग तिच्या भेटी स्वीकारल्या. तो तिला म्हणाला, “तू आता निर्धास्तपणे जा. तुझी विनंती मी ऐकली आहे. मी त्या प्रमाणे वागीन.”
  • 36 अबीगईल नाबालकडे गेली. तो घरीच होता. राजाच्या इतमामात खात पीत होता. मद्याच्या नशेत झिंगला होता व मजेत होता. तेव्हा दुसऱ्या दिवशीपर्यंत ती त्याच्याशी या विषयावर काहीच बोलली नाही.
  • 37 सकाळी नशा उतरल्यावर तो पूर्ण भानावर आला. तेव्हा त्याच्या बायकोने त्याला सर्व काही सांगितले. हे ऐकून त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो दगडासारखा कड़क बनला.
  • 38 जवळपास दहा दिवसानंतर परमेश्वराने त्याला मृत्युमुखी लोटले.
  • 39 नाबालच्या मृत्युची बातमी दावीदाने ऐकली. तेव्हा तो म्हणाला, परमेश्वर धन्य होय. नाबालने माझा अपमान करायचा प्रयत्न केला. पण परमेश्वानेच मला वाचवले. माझ्या हातून अपराध घडणार होता. पण नाबालच्या चुकीबद्दल परमेश्वराने त्याला मृत्युदंड दिला.”दावीदाने मग अबीगईलकडे निरोप पाठवला. तिला आपली पत्नी होण्याविषयी विनंती केली.
  • 40 दावीदाचे सेवक कर्मेल येथे गेले आणि तिला म्हणाले, “दावीदाने आम्हाला पाठवले आहे. तू त्याच्याशी लग्न करवेस अशी त्याची इच्छा आहे.”
  • 41 तिने नतमस्तक होऊन अभिवादन केले. ती म्हणाली, “मी तुमची दासी आहे. तुमच्या सेवेला तत्पर आहे. माझ्या धन्याच्या सेवकांचेही चरण धुण्यास माझी तयारी आहे.”
  • 42 मग ती तात्काळ गाढवावर बसून, त्या सेवकांबरोबर दावीदकडे निघाली. आल्याबरोबर तिने पाच दासी घेतल्या. दावीदची ती पत्नी झाली.
  • 43 इज्रेल येथील अहीनवाम ही सुध्दा दावीदची बायको होती. तेव्हा अबीगईल आणि अहीनवाम अशा त्याच्या दोन बायका झाल्या.
  • 44 शौलची मुलगी मीखल हिच्याशीही त्याचे लग्न्न झाले होते, पण शौलने आपल्या मुलीला माहेरी आणून तिचे पालती याच्याशी लग्न्न लावले. हा पालती गल्लीम येथील असून लइश याचा मुलगा होता.