wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


2 इतिहास धडा 8
  • 1 मंदिर आणि आपले घर बांधायला शलमोनाला वीस वर्षे लागली.
  • 2 मग हिरामने दिलेली नगरे शलमोनाने वसवली. त्या नगरांमध्ये काही इस्राएल लोकांना वसती करण्यास मुभा दिली.
  • 3 पुढे शलमोनाने हमाथ सोबा हे नगर जिंकून घेतले.
  • 4 वाळवंटातील तमदोर हे नगरही त्याने वसवले. कोठारांसाठी म्हणून त्याने हमाथमधली नगरे बांधली.
  • 5 वरचे बेथ - होरोन आणि खालचे बेथ - होरोन यांची उभारणीही शलमोनाने केली. ती त्याने भक्कम तटबंदीची नगरे केली. त्यांना मजबूत कोट, वेशी आणि अडसर करवले.
  • 6 बालाथ आणि अन्य कोठारे असलेली गावे यांची शलमोनाने पुनर्रचना केली. रथ ठेवण्यासाठी तसेच घोडेस्वारांच्या वस्तीसाठीही त्याने गावे वसवली. यरुशलेम, लबानोनसकट आपल्या आधिपत्याखालील सर्व प्रदेशात शलमोनाने आपल्या गरजेनुसार बांधकामे केली.
  • 7 इस्राएल लोक राहात असलेल्या प्रदेशात अनेक परकी लोकही होते. ते म्हणजे हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी. त्यांना शलमोनाने वेठबिगार केले. हे लोक मूळचे इस्राएल नव्हते. या प्रदेशात राहून गेलेल्या लोकांचे ते वंशज होते आणि इस्राएल लोकांनी त्यांना अजून नष्ट केले नव्हते. ते अजूनही आहेत.
  • 8
  • 9 इस्राएल लोकांपैकी कोणालाही शलमोनाने वेठबिगारीसाठी सक्ती केली नाही. ते त्याचे योध्दे होते. ते सैन्याधिकारी, रथाधिपती, स्वारांचे अधिकारी असे होते.
  • 10 काही इस्राएलीजण तर शलमोनाच्या अधिकाऱ्यांवर अंमल गाजवणारे होते. असे प्रमुख अधिकारी 250 होते.
  • 11 शलमोनाने फारोच्या मुलीला, तिच्यासाठी बांधलेल्या महालात दावीद नगराहून आणले. शलमोन म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा करारकोश ठेवण्यात आला, ती सर्व स्थाने पवित्र आहेत. तेव्हा माझ्या बायकोने दावीद नगरात राहू नेये.”
  • 12 मग शलमोनाने वेदीवर परमेश्वराला होमार्पणे वाहिली. मंदिराच्या प्रवेशमंडपासमोरच शलमोनाने ती वेदी बांधली होती.
  • 13 मोशेच्या आज्ञेप्रमाणे शलमोन रोज होमार्पणे करी. शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शनीला, वर्षभरातल्या तीन सणांना होमार्पणे करायची असत. बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण, आणि मंडपांचा सण हे तीन वार्षिक सण होत.
  • 14 आपल्या वडलांच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या. परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या. लेवीना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवींची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वराला मानणाऱ्या दावीदाने अशाच सूचना दिल्या होत्या.
  • 15 याजक आणि लेवी यांना शलमोनाने ज्या सूचना दिल्या त्यात इस्राएल लोकांनी बदल केला नाही की आज्ञाभंग केला नाही. मौल्यवान वस्तू जतन करण्याविषयीच्या आज्ञांचाही त्यांनी बदल केला नाही.
  • 16 शलमोनाची सगळी कामे सिध्दीला गेली. मंदिराच्या कामाला सुरुवात केल्यापासून ते संपेपर्यंत त्यांचे व्यवस्थित नियोजन केले होते. अशा रीतीने मंदिराचे काम तडीला गेले.
  • 17 यानंतर शलमोन लाल समुद्रानजीकच्या अदोम देशातील एस्योन - गेबेर आणि एलोथ या नगरांना गेला.
  • 18 हिरामने त्याच्याकडे आपली गलबते पाठवली. समुद्रपर्यटनात दरबेज अशा हिरामच्या सेवकांनीच ती नेली. शलमोनाच्या चाकरीतील लोकांबरोबर हे सेवक ओफिर येथे गेले आणि तेथून 17 टन सोने आणून त्यांनी ते शलमोनाला दिले.