wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उपदेशक धडा 12
  • 1 तरुणपणीच वृध्दापकाळाचे वाईट दिवस येण्याआधी, “मी माझे आयुष्य वाया घालवले”असे तुम्ही म्हणण्याचे दिवस येण्याआधी आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा.
  • 2 सूर्य, चंद्र आणि तारे तुमच्या नजरेला दिसणाल नाहीत अशी वेळ येण्याआधी. तरुणपणीच आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा. संकटे तर पाठोपाठ येणाऱ्या वादळाप्रमाणे पुन्हा पुन्हा येत राहतात.
  • 3 त्या वेळी तुमच्या बाहूतील शक्ती निधून गेलेली असेल. तुमचे पाय अशक्त होतील आणि ते वाकतील. तुमचे दात पडतील. आणि तुम्हाला खाता येणार नाही. तुमचे डोळे स्पष्टपणे बघू शकणार नाहीत.
  • 4 तुम्हाला नीट ऐकूही येणार नाही. तुम्हाला रस्त्यावरचा गोंधळ ऐकू येणार नाही. धान्य दळताना येणारा जात्याचा आवाज देखील तुम्हाला शांत वाटेल. बायकांची गणी तुम्ही ऐकू शकणार नाही. पण साध्या पक्ष्याच्या गाण्याचा आवाजसुध्दा तुम्हाला सकाळी जाग आणील. कारण तुम्ही झोपू शकणार नाहीत.
  • 5 तुम्हाला उंचावरच्या ठिकाणांची भीती वाटेल. तुमच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहान वस्तूला अडखळून तुम्ही पडाल अशी तुम्हाला भीती वाटेल. बदामाच्या झाडांवरील फुलासारखे तुमचे केस पांढरे होतील. तुम्ही चालताना नाकतोडयासारखे स्वत:ला ओढाल. तुमची जगण्याची इच्छानाहीशी होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या कायमच्या घरी (कबरेत) जाल. शोक करणारे लोकअत्यसंस्कारासाठी रस्त्यावर जमा होतील आणि तुमचे प्रेत स्मशानात नेतील.
  • 6 तरुण असेपर्यंत तुमच्या निर्मात्याची आठवण ठेवा. चंदेरी दोर तुटण्याआधीआणि सोनेरी भांडे फुटण्याआधी, तळाशी फुटलेल्या काचेच्या भांडचासारखे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी, विहिरीवर ठेवलेले दगडी झाकण फुटून आत पडून निरुपयोगी होते तसे तुमचे आयुष्य निरुपयोगी होण्याआधी.
  • 7 तुमचे शरीर मातीपासून निमाण झाले आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचे शरीर परत मातीला मिळेल. पण तुमचा आत्मा देवाकडून आला आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचा आत्मा परत देवाकडे जाईल.
  • 8 सगव्व्या गोष्टी इतक्या निरर्थक आहेत. गुरू म्हणतात की हे सगळे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
  • 9 गूरू अतिशय शहाणे होते. त्यांनी त्यांचे शहाणपण लोकांना शिकवायला वापरले. गुरूनी शहाणपणाच्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांची नीट रचना केली.
  • 10 त्यांनी योग्य शब्द शोधण्याचा खूप प्रयत्न केला. आणि त्यांनी खऱ्या आणि विसंबण्याजोग्या शिकवणुकी लिहिल्या.
  • 11 विद्वान माणसाचे शब्द हे प्राण्यांना योग्य मार्गाने नेणाऱ्या चाबकासारखे असतात. ती शिकवण न तुटणाऱ्या खुंट्यासारखी असते. तुम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखविण्यासाठी तुम्ही त्या शिकवणुकीवर विश्वास ठेवू शकता. शहाणपणाच्या त्या सर्व गोष्टी त्या एकाच मेंढपाळाकडून (देवाकडून)येतात.
  • 12 म्हणून मुला. त्या शिकवणुकींचा अभ्यास कर पण इतर पुस्तकांविषयी सावध रहा. लोक नेहमी पुस्तके लिहीत असतात. आणि खूप अभ्यास तुम्हाला कंटाळा आणेल.
  • 13 आता या पुस्तकांतलिहिलेल्या सर्व गोष्टींकडून तुम्ही काय शिकणार आहात? माणसाला करता येण्यासारखी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला मान देणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे. का? कारण देवाला लोक करतात त्या सर्व गुप्त गोष्टी सुध्दा माहीत असतात. त्याला सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टीं विषयी माहिती असते. लोकांनी केलेल्या गोष्टींचा तो न्यायनिवाडा करील.
  • 14