wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


निर्गम धडा 26
  • 1 परमेश्वर मोशेला म्हणाला, “पवित्र निवास मंडप कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या दहा पडद्यांपासून व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावा. एखाद्या शिवणकाम करणाऱ्या कुशल कारागिराकडून त्या पडद्यांवर, पसरलेल्या पंखाच्या करुब देवदूतांची चित्रे शिवावीत.
  • 2 प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे तो चौदा वार किंवा चौदा गज लांब व दोन वार किंवा दोन गज रूंद असावा;
  • 3 त्यापैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसज्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;
  • 4 त्या दोन्हीही भागांच्या शेवटाच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी करावीत.
  • 5 पहिल्या भागाच्या शेवटच्या कडेला पन्नास बिरडी असावीत व दुसऱ्या भागातही ती तशीच असावीत;
  • 6 पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या सहाय्याने ते दोन भाग एकत्र जोडावेत म्हणजे त्या दोन्ही भागांचे मिळून एकच सलग कापड होईल आणि मग त्यापासून पवित्र निवास मंडप तयार करता येईल.
  • 7 “त्यानंतर ह्या पवित्र निवास मंडपाला झाकून टाकणारा असा दुसरा मंडप बकऱ्याच्या केसापासून तयार केलेल्या अकरा पडद्यांच्या सहाय्याने तयार करावा.
  • 8 हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रूंद अशा मापाचे बनवावेत.
  • 9 त्यातून पाच पडदे एकत्र जोडून दुसरा भाग करावा; मग दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग करावा; मंडपाच्या पुढच्या बाजूला सहाव्या पडद्याचा अर्धा भाग मागे दुमडावा.
  • 10 पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तसेच करावे;
  • 11 नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबूसाठी सलग एकच भाग होईल.
  • 12 ह्या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धाभाग पवित्र निवास मंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील.
  • 13 त्या तंबूच्या बाजूचे पडदे पवित्र निवास मंडपाच्या खालच्या कडेच्या खाली अठरा इंच लोंबत राहतील; त्यामुळे पवित्र निवास मंडपाला पूर्ण आच्छादान मिळेल.
  • 14 बाहेरचा तंबू झाकण्याकरिता दोन आच्छादने करावीत; एक मेंढ्याच्या लाल रंगविलेल्या कातड्याचे व दुसरे तहशाच्या एका प्रकारच्या जनावराच्या कातड्याचे करावे.
  • 15 “पवित्र निवास मंडपाला बाभळीच्या लाकडापासून केलेल्या फव्व्यांचा आधार द्यावा.
  • 16 ह्या फव्व्या पंधरा फूट उंच व सत्तावीस इंच रूंद असाव्यात.
  • 17 प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे करावीत; दोन फव्व्या उभ्या आडव्या तुकड्यांनी जोडाव्यात. पवित्र निवासमंडपाच्या सर्व फव्व्या एक सारख्याच असाव्यात.
  • 18 पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात.
  • 19 फळ्यासाठी चांदीच्या चाळीस बैठका - खुर्या-कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे दोन, चांदीच्या बैठका असाव्यात.
  • 20 पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फव्व्या कराव्यात;
  • 21 आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका-खुर्च्या कराव्यात.
  • 22 पवित्र निवास मंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फव्व्या कराव्यात;
  • 23 आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फव्व्या कराव्यात.
  • 24 कोपऱ्याच्या फव्व्या खालच्या बाजूस जोडाव्यात; त्यांच्या वरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.
  • 25 पवित्र निवास मंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठफव्व्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे सोळा, चांदीच्या बैठका असतील.
  • 26 त्यांच्या फव्व्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व
  • 27 दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत.
  • 28 मध्यभागावरील अडसर लाकडांच्या फव्व्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.
  • 29 “फव्व्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.
  • 30 मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे पवित्र निवास मंडप बांधावा.
  • 31 “तलम सणाच्या कापडाचा व निळया जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा मिळून पवित्र निवास मंडपाच्या आतील विशेष पडदा-अंतरपट बनवावा आणि त्यावर करूब दूतांची चित्रे कारागिराकडून काढून घ्यावीत.
  • 32 बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि चांदीच्या चार खुर्च्या त्या खांबाखाली ठेवाव्यात; मग तो पडदा खांबाच्या आकड्यावर लटकत ठेवावा.
  • 33 सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;
  • 34 परमपवित्र स्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.
  • 35 “अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला विशेष मेज ठेवावा; तो पवित्र निवास मंडपाच्या उत्तर बाजूस असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.
  • 36 “पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करावा व त्यावर भरतकाम करावे.
  • 37 हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्या साठी पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”