wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यहेज्केल धडा 4
  • 1 “मानवपुत्रा, एक वीट घे. त्यावर यरुशलेमचे चित्र कोर
  • 2 मग तू म्हणजे नगरीला वेढा घातलेले सैन्य आहेस असे मान. नगरीभोवती मातीची भिंत बांध. म्हणजे नगरीवर हल्ला करणे सोपे होईल. त्या भिंतीपर्यंत जाणारे कच्चे रस्ते तयार कर. भिंती फोडण्यासाठी मोठे ओंडके आण आणि नगरीभोवती सैन्याचा तळ ठोक.
  • 3 एक लोखंडी कढई तुझ्या व नगरीच्या मध्ये ठेव. ही कढई म्हणजे तुला व नगरीला विभागणारी भिंतच होय, ह्या रीतीने तू त्या नगरीच्या विरुद्व आहेस हे दाखव. तू त्या नगरीला वेढा घालून हल्ला करशील. का? कारण हे इस्राएलच्या लोकांसाठी प्रतीक वा खूण असेल. ह्यावरुन मी (देव) यरुशलेमवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट होईल.
  • 4 “तू तुझ्या डाव्या कुशीवर निजले पाहिजेस आणि इस्राएल लोकांची पापे तू तुझ्या शिरावर घेतलीस असे दाखविणाऱ्या गोष्टी तू केल्या पाहिजेस. तू जितके दिवस डाव्या कुशीवर झोपशील, तितके दिवस तुला त्यांच्या अपराधांचा बोजा वाहावा लागेल.
  • 5 तू 390 दिवसइस्राएलच्या अपराधांचा बोजा वाहिला पाहिजेस एक दिवस एक वर्षाबरोबर असेल. अशा प्रकारे, इस्राएलला किती काळ शिक्षा होईल ते मी तुला सांगत आहे.
  • 6 “त्यानंतर तू 40 दिवस तुझ्या उजव्या कुशीवर झोपशील. ह्या वेळी, 40 दिवस तू यहूदाच्या अपराधांचा भार वाहशील. एक दिवस एक वर्षाबरोबर असेल. अशा रीतीने मी तुला यहुदाच्या शिक्षेचा काळ सांगत आहे.”
  • 7 देव पुन्हा बोलला तो म्हणाला, “आता अस्तन्या सावर आणि विटेवर हात उगार. तू यरुशलेमवर हल्ला करण्याचे नाटक कर. तू माझा दूत म्हणून लोकांशी बोलत आहेस हे दाखविण्यासाठी असे कर.
  • 8 आता पाहा, मी तुला दोरीने बांधतो म्हणजे नगरीवरचा हल्ला पूर्ण होईपर्यंततू एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर वळू शकणार नाहीस.”
  • 9 देव असेही म्हणाला, “तू भाकरीसाठी थोडे धान्य मिळविले पाहिजे. गहू, सातू, कडधान्य, मसूर, मक्का व खपल्या गहू घे. तो एका भांड्यात एकत्र करुन दळ. भाकरी करण्यासाठी तू हे पीठ वापरशील. तू एका कुशीवर 390 दिवस झोपला असताना फक्त ह्याच पिठाच्या भाकरी खाशील.
  • 10 रोजच्या भाकरीसाठी तुला फक्त 1 पेलापीठ वापरता येईल. ह्या पिठापासून केलेली भाकरी दिवसभर पुरवून तू खाशील.
  • 11 तुला रोज थोडेच म्हणजे 3 पेलेपाणी पिता येईल. दिवसभर पुरवून तुला ते प्यावे लागेल.
  • 12 रोज तुला तुझी भाकरी केलीच पाहिजे. वाळलेल्या मानवी विष्ठेची शेणी घेऊन तुला ती जाळली पाहिजे. ती भाकरी त्या मानवी विष्ठेवर भाजून लोकांसमक्ष खाल्ली पाहिजे.”
  • 13 नंतर परमेश्वर म्हणाला, “तुझे हे खाणे, परदेशांत इस्राएल लोकांना अमंगळ भाकरी खावी लागेल, हेच दाखवून देईल. मी त्या लोकांना सक्तीने इस्राएल सोडून परदेशांत जाण्यास भाग पाडले.”
  • 14 मग मी (यहेज्केल) म्हणालो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, पण मी कधीच अमंगळ अन्न खाल्लेले नाही. एखाद्या रोगाने मेलेल्या प्राण्याचे अथवा हिंस्त्र प्राण्याने मारलेल्या जनावराचे मांस मी कधीच खाल्लेले नाही. बालपणापासून आजपर्यंत मी कधीच अमंगळ मांस खाल्लेले नाही. असे काहीही मी कधीच तोंडात घातलेले नाही.”
  • 15 मग देवा मला म्हणाला, “ठीक आहे! मी तुला भाकरी भाजण्यासाठी मानवी विष्ठेऐवजी शेण वापरु देईन. तुला मानवी विष्ठा वापरावी लागणार नाही.”
  • 16 पुढे देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे. लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल. धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल. त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल. ते पाणी पिताना घाबरतील.
  • 17 का? कारण लोकांना पुरेसे अन्न व पाणी मिळणार नाही. लोक एकमेकांना भयंकर घाबरतील. त्यांच्या पापांमुळे ते क्षीण होत चाललेले एकमेकांना दिसतील.”