wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यहेज्केल धडा 10
  • 1 मग मी करुब दूतांवर असलेल्या वाडग्याकडे पाहिले. तो इंद्रनीलाप्रमाणे नितळ निळा दिसत होता. आणि त्यावर सिंहासनासारखे काहीतरी होते.
  • 2 नंतर सिंहासनावर जो बसलेला होता तो तागाचे कपडे घातलेल्याला देव म्हणाला, “करुब दूताच्या खाली असलेल्या चाकांच्या मधल्या जागेतपाऊल टाक. त्यांच्या मधून थोडे निखारे घे. व ते यरुशलेमवर भिरकावून दे.”तो माणूस माझ्या जवळून पुढे गेला.
  • 3 तो करुबाकडे गेला तेव्हा करुब मंदिराच्या दक्षिणेकडील भागात उभे होते. ढगाने आतले अंगण व्यापले.
  • 4 मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले.
  • 5 मग करुबांच्या पंखाचा आवाज ऐकला. सर्वशक्तिमान देव बोलू लागताच होणाऱ्या गडगडाटी आवाजासारखा तोही आवाज प्रचंड होता. बाहेरच्या अंगणापर्यंत तो सहज ऐकू येऊ शकत होता.
  • 6 करुबांच्या मध्ये असलेल्या चाकातल्या दरम्यान जाऊन निखारे आणण्याची आज्ञा देवाने तागाचे कपडे घातलेल्या माणसाला दिली. मग तो त्या ढगात शिरला व एका चाकाजवळ उभा राहिला.
  • 7 मग एका करुबाने हात लांब करुन, त्यांच्यामधील काही धगधगते निखारे उचलले आणि त्या माणसाच्या हाती दिले. मग तो माणूस निघून गेला.
  • 8 (करुबांच्या पंखाखाली माणसाच्या हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.)
  • 9 मग तेथे चार चाके असल्याचे माझ्या लक्षात आले. प्रत्येक करुबाजवळ एक चाक होते. ती चाके नितळ तृणमण्याप्रमाणे दिसत होती.
  • 10 ती चारही चाके सारखीच होती. चाकात चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती.
  • 11 ती चालताना कोठत्याही दिशेने जात. पण करुब चालताना कोणत्याही बाजूला वळत नसत. ज्या बाजूस त्यांचे डोके होते, त्या बाजूसच ते जात. ते इकडे तिकडे वळत नसत.
  • 12 त्यांच्या सर्वांगावर म्हणजेच पाठींवर, हातांवर, पंखांवर डोळे होतेच पण त्याशिवाय चाकांवरही डोळे होते.
  • 13 “चाकांच्या मधली जागा” असे त्या चाकांना म्हटलेले मी ऐकले.
  • 14 प्रत्येक करुब दूताला चार तोंडे होती. पहिले करुबाचे तोंड, दुसरे माणसाचे तोंड, तिसरे सिंहाचे तोंड व चवथे गरुडाचे तोंड खबार कालव्याजवळच्या दृष्टान्तात मी पाहिलेले प्राणी म्हणजे करुब दूतच होते.मग करुब हवेत उडाले.
  • 15
  • 16 आणि चाकेही त्यांच्याबरोबर वर गेली. जेव्हा करुब पंख पसरुन हवेत उडत, तेव्हा चाके दिशा बदलत नसत.
  • 17 करुब हवेत उडाले, तर चाकेही उडत. ते स्थिर उभे राहिले, तर चाकेही स्थिर राहात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) त्यांच्यात होता.
  • 18 मग परमेश्वराची प्रभा मंदिराच्या उंबरठ्यावरुन करुबांच्या वर जाऊन थांबली.
  • 19 मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.
  • 20 मग मी खबार कालव्याजवळ इस्राएलच्या देवाच्या प्रभेखाली पाहिलेल्या प्राण्याला ओळखले आणि माझ्या लक्षात आले की ते प्राणी म्हणजे करुब दूतच होते.
  • 21 प्रत्येक प्राण्याला चार तोंड व चार पंख होते. पंखाखाली मानवी हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.
  • 22 खबार कालव्याजवळ पाहिलेल्या चार तोंडाप्रमाणेच करुब दूतांची तोंडे होती. ते जात असलेल्या दिशेकडेच सरळ पाहात होते.