wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यहेज्केल धडा 27
  • 1 मला पुन्हा परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
  • 2 “मानवपुत्रा, सोरसाठी शोकगीत गा.
  • 3 तिच्याबद्दल पुढील गोष्टी सांग“सोर, तू समुद्रावरचे प्रवेशद्वार आहेस. तू खूप राष्ट्रांची जणू व्यापारी आहेस. समुद्रकाठाने तू पुष्कळ देशांत प्रवास करतेस. ‘प्रभू, माझा परमेश्वर, पुढील गोष्टी सांगतो.
  • 4 “सोर, तू स्वत:ला इतकी सुंदर समजतेस, की जणू काही सौंदर्यांची खाणच! तुझ्या शहराच्या सीमेवर भूमध्य समुद्र आहे. तुझ्या जहाजाप्रमाणे, तुझ्या कर्त्यांनी, तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.
  • 5 तुझ्या तक्तपोशीसाठी त्यांनी सनीरच्या सरुंचा उपयोग केला. तुझ्या डोलकाठीसाठी त्यांनी लबानोनचे गंधसरु वापरले.
  • 6 त्यांनी तुझी वल्ही बाशानमधील अल्लोन वृक्षापासून बनविली. त्यांनी तुझ्या डेकवरील खोली कित्ती बेटावरच्या बावस लाकडाची बनविली व ती हस्तिदंताने सजविली.
  • 7 तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
  • 8 सीदोन व अर्वद येथील लोक तुझ्या नावा वल्हवीत असत. सोर, तुझे सुज्ञ लोक तुझे नावाडी होते.
  • 9 गबालची वडील व कुशाल माणसे तुझ्या जहाजावर डांबराने भेगा बुजविण्यासाठी होते. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे नावाडी व्यवसायासाठी तुझ्याकडे येत आणि तुझ्याशी व्यापार करीत.’
  • 10 “पारसी, लूदी व पूटी लोक तुझ्या सैन्यात होते. तेच तुझे लढवय्ये वीर होते. आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्या तटबंदीवर टांगीत त्यांनी तुझ्या शहराला मान व वैभव प्राप्त करुन दिले.
  • 11 अर्वाद येथील पहारेकरी तुझ्या वेशीवर पहारा करीत. गम्मादचे लोक बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर टांगीत त्यांनी तुझे सौंदर्य पूर्णत्वाला नेले.
  • 12 “तार्शीश तुझा सर्वांत उत्तम ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तमोत्तम वस्तूंच्या मोबदल्यात तो चांदी, लोखंड, कथील व शिसे देत असे.
  • 13 यावान, तुबाल आणि काळ्या समुद्राजवळचे लोक तुझ्याबरोबर व्यापार करीत. तुझ्याजवळील वस्तूंच्या मोबदल्यात ते गुलाम व कास्य देत.
  • 14 तोगार्मा राष्ट्रातीललोक तुझ्याबरोबर घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे ह्यांचा व्यापार करीत.
  • 15 ददानी लोकसुद्धा तुझ्याशी व्यापार करीत. तू पुष्कळ ठिकाणी तुझ्या वस्तू विकत होतीस. त्या बदल्यात लोक तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड देत.
  • 16 तुझ्याजवळ पुष्कळ चांगल्या वस्तू असल्याने अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला. ते तुझ्या मालाच्या मोबदल्यात पाचू. जांभळे कापड, सुंदर वीणकाम, तागाचे उत्तम कापड, पोवळे आणि माणके देत.
  • 17 “यहूदा व इस्राएल ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या वस्तूंच्या मोबदल्यात गहू. आँलिव्ह, अंजिराचा पहिला बहर, मध, तेल आणि उपशामक औषध देत.
  • 18 दिमिष्क तुझा चांगला ग्राहक होता. तुझ्याकडील उत्तम वस्तूंसाठी त्याने तुझ्याबरोबर व्यापार केला. तुझ्या मालाच्या मोबदल्यात तो तुला हेल्बोनचा द्राक्षरस व पांढरी लोकर देत.
  • 19 दिमिष्क तुझ्याबरोबर उसालच्या द्राक्षरसाचा व्यापार करी. त्या मोबदल्यात ते पोलाद, एक प्रकारची दालचिनी, ऊस देत.
  • 20 ददानचा तुझ्याबरोबर खोगीराच्या कापडाचा व रपेट करावयास लागणाऱ्या घोड्यांचा मोठा व्यापार होता.
  • 21 अरबस्तानचा व केदारच्या सर्व नेत्यांचा तुझ्याबरोबर कोकरे, एडके आणि बोकड्यांचा मोठा व्यापार होता.
  • 22 “शबा व रामा येथील व्यापारी तुझ्याबरोबर उत्तम मसाले सर्व प्रकारचे जवाहीर आणि सोने यांचा व्यापार करीत.
  • 23 हारान, कन्रे एदेन, शबा, अश्शूर व किल्मद
  • 24 येथील व्यापारी उंची वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, निळ्या रंगाची वीणकाम केलेली वस्त्रे, वेगवेगळ्या रंगाचे गालिचे, घट्ट विणीचे दोर व गंधसरुच्या लाकडापासून बनविलेल्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत.
  • 25 तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत.“सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस. संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.
  • 26 तुझ्या नविकांनी तुला खोल समुद्रात नेले. पण पूर्वेचा जोरदार वारा तुझा समुद्रातील जहाजाचा नाश करील.
  • 27 “आणि तुझी सर्व संपत्ती समुद्रात सांडले. तुझी संपत्ती, विकायचा व विकत घेतलेला माल सर्व समुद्रात पडेल. तुझी सर्व माणसे. नावाडी, खलाशी आणि डांबराने भेगा बुजविणारे कारागीर समुद्रात पडतील. तुझ्या शहरातील सर्व व्यापारी आणि सैनिक समुद्रात बुडतील. तुझ्या नाशाच्या दिवशीच हे घडले.
  • 28 “तू, तुझ्या व्यापाऱ्यांना दुरवरच्या ठिकाणी पाठवितेस तुझ्या खलाशाचे रडणे ऐकून ती ठिकाणे भीतीने थरथर कापतील.
  • 29 जहाजावरील सर्व कामगार नावाडी, खलाशी, जहाजावरुन समुद्रात उड्या घेतील व पोहून किनाऱ्याला लागतील.
  • 30 त्यांना तुझ्या स्थितीमुळे दु:ख वाटेल ते रडतील. ते डोक्यांत माती टाकतील, व राखेत लोळतील.
  • 31 ते तुझ्यासाठी डोक्यावरचे सर्व केस कापतील. शोकप्रदर्शक कपडे घालतील. मृतासाठी करतात तसे ते तुझ्यासाठी शोक करतील.
  • 32 “ते तुझ्यासाठी रडतील आणि ओक्साबोक्सी रडताना तुझ्याबद्दलचे पुढील शोकगीत गातील:“सोरसारखे कुणी नाही. सोरचा भर समुद्रात नाश झाला.
  • 33 तुझे व्यापारी समुद्रापर करुन गेले. तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि तुझ्या मालाने तू अनेकांना तुप्त केलेस. तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.
  • 34 “पण आता तू समुद्र व त्याचे खोल पाणी यामुळे फुटलीस. तुझा माल व माणसे समुद्रात पडली.
  • 35 समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना तुझ्याबाबत धक्का बसला. त्यांचे राजे फारच घाबरले. त्यांच्या चेहऱ्यावरुनच, त्यांना केवढा धक्का बसला आहे, ते कळते.
  • 36 दुसऱ्या राष्ट्रांतील व्यापारी धक्का बसल्यामुळे आपापासात कुजबुज करत आहेत. तुझ्या बाबतीत जे काही घडले, त्यामुळे लोक भयभीत होतील. का? कारण तुझा शेवट झाला. तुझा शेवट झाला”