wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


एज्रा / Ezraधडा 9
  • 1 हे सर्व आटोपल्यावर मग इस्राएलींमधली नेते मंडळी माझ्याकडे आली. ती मला म्हणाली, “एज्रा, इस्राएल लोकांनी आपल्या अवतीभवती राहणाऱ्या इतर लोकांपासून स्वत:ला वेगळे ठेवलेले नाही. याजक आणि लेवी सुध्दा वेगळे राहात नाहीत. कनानी, हित्ती, परिज्जी, यहूसी, अम्मोनी, मवाबी, मिसरी आणि अमोरी लोक ज्या अमंगळ गोष्टी करतात त्यांचा प्रभाव इस्राएलांवर पडतो.
  • 2 इस्राएल लोकांनी या इतर लोकांशी विवाहसंबंध ठेवले आहेत. इस्राएल लोकांनी आपले वेगळेपण टिकवले पाहिजे. पण त्यांचे यहुदी नसलेल्या लोकांचे नेते आणि आधिकारी यांनीच या बाबतीत वाईट उदारहण घालून दिले आहे.”
  • 3 हे ऐकून मी उद्विग्र झालो. माझी मन:स्थिती प्रकट करायला मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. माझ्या मनाला धक्का बसल्यामुळे अस्वस्थ होऊन मी खाली बसलो.
  • 4 तेव्हा देवाच्या आज्ञा मानणाऱ्या सर्व लोकांचा भीतीने थरकाप झाला. बंदिवासातून आलेले इस्राएली लोक देवावर निष्ठा असणारे नव्हते म्हणून ते घाबरले; मला ही धक्का बसला; संध्याकाळच्या होमार्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे बसून राहिलो; सर्वजण माझ्याभोवती जमले.
  • 5 होमार्पणांची वेळ झाली तेव्हा मी उठलो; अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा स्थितीत मी गुडघे टेकून हात पसरुन देवापुढे बसलो. मी अतिशय लज्जित अशा अवस्थेत होतो.
  • 6 तेव्हा मी ही प्रार्थना केली:हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत.
  • 7 आमच्या वाडवडीलांच्या वेळे पासून आतापर्यंत आम्ही अनेक पापांचे दोषी आहोत. आमच्या पापांची शिक्षा आमचे राजे आणि याजक यांना भोगावी लागली. परकी राजांनी आमच्यावर आक्रमण करुन आमच्या लोकांना पकडून नेले. आमची संपत्ती लुटून त्या राजांनी आम्हाला लज्जित केले आजही तेच चालले आहे.
  • 8 पण आता तू अखेर आमच्यावर दया केली आहेस. बंदिवासातून सुटका करुन तू आमच्यापैकी काही जणांना या पवित्रस्थानी पारतून येऊ दिलेस. आम्हाला दास्यमुक्त करुन तू आम्हाला जीवदान दिलेस.
  • 9 आम्ही गुलामच आहोत. पण तू आम्हाला आमच्या गुलामगीरीत आम्हाला सोडून गेला नाहीस. तू आमच्यावर दया केलीस. पारसाच्या राजांना तू आमच्याबाबतीत दयाळू केलेस. तुझे मंदिर उद्ध्वस्त झाले होते, पण त्याचा जीर्णोध्दार आमच्या हातून व्हावा म्हणून तू आम्हाला जीवदान दिलेस. यहूदा आणि यरुशलेमच्या संरक्षणासाठी भिंत बांधावी म्हणून तू साह्याकारी झालास.
  • 10 पण, देवा, आता आम्ही काय बोलावे,? आम्ही पुन्हा तुझ्या मार्गापासून दूर चाललो आहेत.
  • 11 देवा, तुझे सेवक, संदेष्टे यांच्यामार्फत तू आम्हाला त्या आज्ञा दिल्यास; तू म्हणालास, “तुम्ही जो प्रदेश ताब्यात घेऊन त्यात वास्तव्य करणार आहात तो वाया गेलेला देश आहे. तिथे राहणाऱ्या लोकांच्या अमंगळ कृत्यांनी तो अशुध्द झाला आहे; हा सर्वच प्रदेश त्या लोकांनी विटाळून टाकला आहे. आपल्या पापांनी ही भूमी त्यांनी अमंगळ केली आहे.
  • 12 तेव्हा इस्राएल लोकांनो, तुमच्या मुलांशी त्यांच्या ऐश्वर्याची इच्छा करु नका. माझ्या आदेशांचे पालन करा म्हणजे तुम्ही बलशाली व्हाल आणि या भूमीवर चांगल्या गोष्टी भोगाल. हा प्रदेश आपल्या मुलाबाळांना सुपूर्द कराल.”
  • 13 आमच्यावर जी संकटे आली त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही दुर्वर्तन केले आणि त्याची आम्हाला खंत आहे. पण, परमेश्वरा, आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हाला केलेले शासन कमीच आहे. आम्ही जे भयंकर गुन्हे केले त्यांची जबरदस्त शिक्षा आम्हाला व्हायला हवी होती. आणि तू तर आमच्यापैकी काही जणांना बंदिवासातूनही सोडवलेस.
  • 14 तेव्हा तुझ्या आदेशांचा भंग करता कामा नये हे आम्हाला कळले आहे. आम्ही त्या लोकांशी लग्नव्यावहार करता कामा नयेत. त्या लोकांमध्ये दुर्वर्तन फार आहे. आम्ही त्यांच्याशी लग्ने जुळवणे चालूच ठेवले तर तू आमचा नायनाट करशील मग मात्र इस्राएलंपैकी एकही माणूस जिवंत राहणार नाही.
  • 15 देवा, इस्राएलच्या परमेश्वरा, तू फार चांगला आहेस. तू आमच्यापैकी काहींना अजून जिवंत ठेवले आहेस. आम्ही अपराधी आहोत हे आम्हाला मान्य आहे. आमच्या पापाचारणामुळे आम्हाला तुझ्यापुढे उभे राहता येत नाही.