wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 2
  • 1 याप्रमाणे पृथ्वी, आकाश आणि त्यांतील सर्वकाही पूर्ण करुन झाले.
  • 2 देवाने आपण करीत असलेले काम संपवले म्हणून सातव्या दिवशी त्याने काम करण्यापासून विसावा घेतला.
  • 3 देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला व विशेष ठरविला कारण त्या दिवशी जग निर्माण करताना त्याने केलेल्या सर्व कामापासून विसावा घेतला.
  • 4 हा आकाश व पृथ्वी निर्माण केल्याचा इतिहास आहे. देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली त्या वेळी जे जे घडले त्यांच्या उत्पत्ति क्रमाविषयीचा हा वृत्तान्त आहे.
  • 5 त्यापूर्वी पृथ्वीवर वनस्पती नव्हती, शेतात काही उगवले नव्हते. कारण परमेश्वराने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता.
  • 6 पृथ्वीवरुन धुके वर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे.
  • 7 नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.
  • 8 मग परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेन नावाच्या जागेत एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्याला ठेवले.
  • 9 परमेश्वर देवाने सुदंर दिसणारी अन्नासाठी उत्तम अशी सर्व जातीची झाडे बागेमध्ये उगवली आणि बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड अशी झाडे लावली.
  • 10 एदेन बागेत एक नदी उगम पावली व तिने सर्व बागेला पाणी पुरवले. नंतर ती नदी विभागून तिच्या चार वेगळया नद्या झाल्या.
  • 11 पहिल्या नदिचे नाव पीशोन होते. ही सर्व हवीला देशाला वेढा घालून वाहाते
  • 12 त्या देशात चांगल्या प्रतीचे सोने सांपडते. तेथे मोती व गोमेद ही रत्ने सापडतात
  • 13 दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे, ही सगळ्या कूश म्हणजे इथिओपिया देशाभोवती वाहते.
  • 14 तिसऱ्या नदिचे नाव हिद्दकेल. ही अश्शूर म्हणजे असीरिया देशाच्या पूर्वेस वहात जाते. चौथ्या नदीचे नाव फरात म्हणजे युफ्रेटीस असे आहे.
  • 15 परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले.
  • 16 परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो.
  • 17 परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.”
  • 18 नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.”
  • 19 परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली.
  • 20 आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही.
  • 21 तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली.
  • 22 परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले.
  • 23 2तेव्हा आदाम म्हणाला,“आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
  • 24 म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
  • 25 एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.