wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 17
  • 1 अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा.
  • 2 तू असे करशील तर मी आपणामध्ये एक करार करीन; मी तुला अगणित पटीत वाढवीन असे अभिवचन देतो.”
  • 3 मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला,
  • 4 “आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन;
  • 5 मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील.
  • 6 मी तुला भरपूर संतती देईन; तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास येतील, आणि राजे उत्पन्न होतील.
  • 7 आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन.
  • 8 ज्या प्रदेशामधून तू जात आहेस तो म्हणजे कनान देश मी तुला व तुझ्या वंशजाला कायमचा देईन आणि मी तुमचा देव होईन.”
  • 9 आणि देव अब्राहामाला पुढे म्हणाला, “आता ह्या करारतील तुझा भाग हा असा: तू व तुझ्या वंशजांनी पाळावयाचा माझा करार हा
  • 10 की तुझ्या वंशजात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करुन घ्यावी.
  • 11 तू हा करार पाळीत असल्याची खूण म्हणून आपली सुंता करुन घ्यावीस.
  • 12 जन्मलेल लहान मुलगा आठ वर्षांचा होईल तेव्हा तू त्याची सुंता करावी; तुझ्या कुटुंबात जन्मलेल्या तसेच दुझ्या दासाच्या किंवा गुलामांच्या कुटुंबात जन्मलेल्या हरएक पुरुषाची सुंता करावी;
  • 13 अशा रीतीने तुझ्या राष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक पुरुषांची सुंता करावी, मग तो तुझ्या कुटुंबातील असो किंवा विकत घेतलेल्या गुलामाच्या कुटुंबात जन्मलेला असो; तुझ्या व माझ्यामध्ये केलेला करार या खुणेवरुन कायम राहील;
  • 14 ज्या कोणाची सुंता झाली नाही त्याला समाजातून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.”
  • 15 देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय हिला मी नवीन नाव देतो, तिचे नाव सारा असे होईल.
  • 16 मी तिला आशीर्वादीत करीन; मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल राष्ट्रांचे राजे तिच्या पासून निपजतील.”
  • 17 अब्राहामाने देवाला लवून नमन केले, परंतु स्वत:शीच हसून तो म्हणाला, “मी शंभर वर्षांचा आहे; मला मुलगा होणे शक्य नाहीं; आणि सारा नव्वद वर्षांची आहे; तिला मूल होऊ शकणार नाहीं.”
  • 18 मग अब्राहाम देवाला म्हणाला, “इश्माएल जगेल व तुझी सेवा करील अशी मला आशा वाटते.”
  • 19 देव म्हणाला, “नाही, मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल; त्याचे नाव तू इसहाक ठेव; मी त्याच्याशी करार करीन; तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंनतर असेल.
  • 20 “तू मला इश्माएल विषयी विचारलेस ते मी ऐकले; मी त्याला आशीर्वाद देईन; त्याला भरपूर संतती होईल; बारा महान सरदारांचा तो पिता होईल; त्याचे कुटुंब म्हणजे एक मोठे राष्ट्र होईल;
  • 21 पण मी इसहाका बरोबर माझा करार करीन, साराला मुलगा होईल तो इसहाक असेल; तो मुलगा पुढल्या वर्षी याचवेळी जन्मेल.”
  • 22 देवाचे अब्राहामाशी बोलणे संपल्यावर देव अब्राहामाला सोडून वर (स्वर्गात) गेला, व अब्राहाम तेथे एकटाच राहीला;
  • 23 तेव्हा अब्राहामाने आपला मुलगा इश्माएल व आपल्या घरी जन्मलेल्या गुलामांना व मोल देऊन विकत घेतलेल्या मुलानां एकत्र केले, आणि देवाने सांगितल्याप्रमाणेच त्याच्या घरातले सर्वपुरुष व मुलगे यांची त्याच दिवशी सुंता करण्यात आली.
  • 24 अब्राहाम नव्याण्णव वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली;
  • 25 आणि त्याचा मुलगा इश्माएल तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची सुंता झाली.
  • 26 सगळ्या गुलामांची एकाच दिवशी सुंता झाली;
  • 27 आणि त्याच्या घरी जन्मलेले व त्याने विकत घेतलेले असे त्याच्या घरचे सगळे पुरुष यांचीही त्याच्या बरोबर सुंता झाली.