wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 29
  • 1 नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालून ठेवला. तो पूर्वेकडील प्रदेशात गेला.
  • 2 त्याने समोर पाहिले तेव्हा त्याला एका शेतात एक विहीर दिसली; त्या विहिरी जवळ शेरडामेंढराचे तीन कळप बसलेले होते; ही विहीर त्यांची पाणी पिण्याची जागा होती. या विहिरीचे तोंड एका मोठया दगडाने झाकलेले होते;
  • 3 जेव्हा सर्व कळप तेथे जमत तेव्हा मेंढपाळ विहिरीच्या तोंडावरील मोठा दगड ढकलून बाजूला सारीत मग सर्व कळपांचे पाणी पिऊन झाल्यावर ते तो दगड परत त्याच जागेवर ठेवीत.
  • 4 याकोब त्या मेंढपाळांना म्हणाला, “माझ्या बंधूंनो, तुम्ही कोठून आलात?”ते म्हणाले, “आम्ही हारानाहून आलो आहोत.”
  • 5 मग याकोब म्हणाला, “नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता का?”ते म्हणाले, “होय, आम्ही त्याला ओळखतो.”
  • 6 याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?”त्यानी उत्तर दिले, “तो बरा व खुशाल आहे आणि त्याचे सर्वकाही चांगले आहे. ती पाहा त्याची मुलगी राहेल, त्याची मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”
  • 7 याकोब म्हणाला, “हे पाहा, अद्याप दिवस बराच आहे आणि सूर्य मावळण्यास अजून बराच वेळ आहे; तसेच रात्रीसाठी कळपांना गोळा करण्यास अजून बराच अवकाश आहे; तेव्हा त्यांना पाणी पाजा, आणि चरण्यासाठी त्यांना परत शेतात जाऊद्या.”
  • 8 परंतु ते म्हणाले, “आम्हाला तसे करता येत नाही, कारण सर्व कळप एकत्र आल्यावरच आम्ही विहिरीवरील दगड बाजूला सारतो व मग सर्व कळपांना पाणी पाजतो.”
  • 9 याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे व त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.)
  • 10 राहेल ही याकोबाच्या मामाची म्हणजेच याकोबाची आई रिबका हिचा भाऊ लाबान याची मुलगी होती. याकोबाने जेव्हा राहेलीस पाहिले तेव्हा त्याने जाऊन विहिरीच्या तोंडावरील दगड लोटला आणि आपल्या मामच्या मेंढरास पाणी पाजले.
  • 11 नंतर त्याने राहेलीचे चुंबन घेतले आणि तो खूप रडला;
  • 12 आपण तिच्या बापाच्या आप्तातील असल्याचे म्हणजे तिच्या बापाची धाकटी बहीण रिबका हिचा मुलगा असल्याचे त्याने राहेलीस सांगितले; तेव्हा राहेल धावत घरी गेली आणि या गोष्टी तिने आपल्या बापाला सांगितल्या.
  • 13 आपला भाचा याकोब आल्याचे वर्तमान लाबानाने ऐकले तेव्हा लाबान धावत त्याला भेटावयास गेला; त्याने याकोबला मिठी मारली व त्याची चुंबने घेतली आणि त्याला आपल्या घरी आणले; मग याकाबाने घडलेल्या सर्व गोष्टी आपला मामा लाबान याला सांगितल्या.
  • 14 मग लाबान म्हणाला, “हे आश्चर्य आहे की आपले रक्ताचे नाते आहे;” तेव्हा त्यानंतर याकोब एक महिनाभर लाबानापाशी राहिला.
  • 15 5एके दिवशी लाबान याकोबाला म्हणाला, “तू माझ्या घरी, काही मोबदला न घेता गुलामासारखे काम करीत राहावेस हे योग्य नाही; तू माझा नातलग आहेस; तर तुला मी काय वेतन द्यावे ते सांग.”
  • 16 लाबानाला दोन मुली होत्या; थोरल्या मुलीचे नाव होते लेआ आणि धाकटीचे राहेल.
  • 17 लेआचे डोळे अधू आणि निस्तेज होते. परंतु राहेल सुडौल बांध्याची व दिसावयास सुंदर होती;
  • 18 याकोबाचे राहेलीवर प्रेम जडले होते; म्हणून याकोब लाबानमामास म्हणाला, “तुम्ही मला तुमच्या धाकट्या मुलीशी राहेलीशी लग्न करण्याची परवानगी देणार असाल तर मी तुमच्या घरी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”
  • 19 लाबान म्हणाला, “परक्या कोणापेक्षा तिने तुझ्याशी लग्न करावे हे तिच्यासाठी चांगले आहे; म्हणून तू आता माझ्यापाशी राहा.”
  • 20 म्हणून मग याकोब आपल्या मामापाशी राहिला आणि त्याने सात वर्षे त्याची सेवाचाकरी केली; परंतु राहेलीवरील गाढ प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसासारखी वाटली.
  • 21 सात वर्षेनंतर याकोब लाबानाला म्हणाला, “आता मला राहेल द्या म्हणजे मी तिच्याशी लग्न करीन कारण तुमच्या सेवा चाकरीचा माझा वेळ संपलेला आहे.”
  • 22 तेव्हा लाबानाने तेथील सर्वलोकांस मेजवानी दिली;
  • 23 त्या रात्री लाबानाने आपली थोरली मुलगी लेआ याकोबाच्या स्वाधीन केली; त्या रात्री याकोब व त्याची बायको लेआ यांनी एकत्र निजून विवाहाच्या जीवनाचा आनंद उपभोगला;
  • 24 (लाबानाने आपली दासी जिल्या आपल्या मुलीची दासी म्हणून तिला दिली.)
  • 25 दुसऱ्या दिवशी सकाळी याकोबाने लेआला पाहिले तेव्हा आपण रात्री लेआबरोबर एकत्र निजलो असे त्याला समजले; मग याकोब लाबानाला म्हणाला, “तुम्ही मला फसवले; मला राहेलीशी लग्न करता यावे म्हणून मी अतिशय काबाडकष्ट केले; तुम्ही मला असे का फसवले?”
  • 26 लाबान म्हणाला, “आमच्या देशातील रीतीरिवाजा प्रमाणे आधी थोरल्या मुलीचे लग्न झाल्या शिवाय आम्ही धाकटया मुलीचे लग्न करुन देत नाहीं;
  • 27 तरी परंतु हा लग्न विधी सप्ताह सोहळा साजरा करण्यात सहभागी हो म्हणजे मग मी तुला लग्न करण्यासाठी राहेलही देतो; परंतु त्यासाठी तू आणखी सात वर्षे माझी सेवाचाकरी केली पाहिजेस.”
  • 28 त्याप्रमाणे याकोबाने आठवडाभर तो सर्व लग्न सोहळा पूर्ण केला; मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्याला बायको करुन दिली;
  • 29 (लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.)
  • 30 तेव्हा मग याकोब राहेलीशीही एकत्र निजला; आणि याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम होते, म्हणून लाबानाकडे याकोबाने राहेलीसाठी आणखी सात वर्षे सेवा चाकरी केली.
  • 31 परमेश्वराने पाहिले की याकोबाचे लेआपेक्षा राहेलीवर अधिक प्रेम आहे, म्हणून परमेश्वराने लेआला मुले होऊ दिली परंतु राहेलीस मूलबाळ दिले नाही;
  • 32 लेआला मुलगा झाला; तिने त्याचे नाव रऊबेन ठेवले; कारण ती म्हणाली, “परमेश्वराने माझे दु:ख पाहिले आहे; कारण माझा नवरा माझ्यावर प्रेम करीत नाही; परंतु आता कदाचित तो माझ्यावर प्रेम करील.”
  • 33 लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला; ह्या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले, कारण ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे म्हणून त्याने मला हा मुलगा दिला आहे.”
  • 34 लेआ आणखी गर्भवती झाली व तिला मुलगा झाला; तेव्हा तिने त्याचे नाव लेवी असे ठेवले; कारण ती म्हणाली, “आता मात्र माझा नवरा माझ्यावर नक्की प्रेम करील कारण मी त्यांना तीन मुलगे दिले आहेत.”
  • 35 त्यानंतर लेआला आणखी एक मुलगा झाला; तिने त्याचे नाव यहूदा ठेवले; करण ती म्हणाली, “आता मी परमेश्वराची स्तुति करीन.” नंतर तिचे जनन थांबले.