wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


उत्पत्ति धडा 49
  • 1 मग याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले. तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्या जवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल हे मी तुम्हास सांगतो.”
  • 2 “याकोबाच्या मुलांनो! तुम्ही सर्व एकत्र या आणि तुमचा बाप इस्राएल याचे ऐका.”रऊबेन
  • 3 “रऊबेना! तू माझा पाहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस: पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पाहिला पुरावा आहेस. तू सर्वापेक्षा अधिक शक्तीवान व सर्वापेक्षा अधिक अभिमान वाटावा असा आहेस;
  • 4 परंतु तुझ्या भावना पुराच्या अनावर व बेबंद लाटांप्रमाणे आहे; तू माझा मुलांमध्ये श्रेष्ठ किंवा सर्वात अधिक महत्वाचा मुलगा होणार नाहीस कारण तू आपल्या बापाच्या एका बायकोपाशी जाऊन निजलास; तू आपल्या बापाच्या अंथरुणाचा आदर करुन मान राखला नाहीस.”
  • 5 “हे भाऊ आहेत; या दोन भावांना तरवारींने लढण्याची आवड आहे.
  • 6 त्यांनी गुपचूप वाईट गोष्टी करण्याचे ठरवले; त्यांचे हे बेत माझ्या जीवाला मान्य नाहीत; तसेच त्यांच्या गुप्त बैठका मला मान्य नाहीत; त्यांनी रागाच्या भरात माणसांची कत्तल केली; गंमत म्हणून त्यांनी पशूंना जखमी केले;
  • 7 त्यांचा राग शाप आहे; ते अति रागाने वेडे होतात तेव्हा अतिशय क्रूर बनतात; याकोबाच्या जमिनीत त्यांना वाटा मिळणार नाही. ते सर्व इस्राएल देशभर पसरतील.”
  • 8 “यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील; तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील; तुझे भाऊ तुला लवून नमन करतील.
  • 9 यहूदा, तू आपली शिकार मारलेल्या सिंहासारखा आहेस; माझ्या मुला, आपल्या शिकारीचा पशू मारुन त्याच्यावर उभा असलेल्या सिंहासारखा तू आहेस;यहूदा विसावा घेणाऱ्या सिंहासारखा आहेआणि त्याला त्रास देण्याइतका शूर दूसरा कोणीही नाही.
  • 10 यहूदाचे कुटुंबीय राजे होतीलआणि योग्य राजा येईपर्यंत त्याच्या कुळातील राजवेत्र जाणार नाही मग बहुतेक जण त्याच्या आज्ञेत राहतील व त्याची सेवा करतील.
  • 11 तो आपले गाढव अगदी चांगल्याद्राक्षवेलीस बांधून ठेवील; तो उंची द्राक्षारसाने आपले कपडे धुईल;
  • 12 द्राक्षमद्य घेतल्याने त्याचे डोळे त्या द्राक्षमद्यापेक्षा अधिक लालबुंद होतील; त्याचे दात दूधपिण्यामुळे दूधापेक्षा अधिक सफेद होतील.”
  • 13 “जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल; त्याचा समुद्र किनारा जहाजासाठी सुरक्षित बंदर असेल. त्याच्या जमिनीची हद्द सिदोन नगरपर्यंत असेल.”
  • 14 “इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल; जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
  • 15 आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे, आपला देश आनंददायक आहे असे तो पाहिल आणि मग जड बोजा वाहून नेण्यास व अगदी गुलामाप्रमाणे काम करण्यास तो तयार होईल.”
  • 16 “दान इस्राएलाच्या इतर वंशाप्रामाणे आपल्या लोकांचा न्याय करील.
  • 17 तो रस्ताच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे, वाटेच्या कडेला पडून असलेल्या भयंकर नागाप्रमाणे होईल; तो घोड्याच्या टाचेला दंश करील; त्यामुळे घोडेस्वार घोड्यावरुन खाली कोसळेल;
  • 18 “हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.”
  • 19 “लुटारुंची टोळी” गाद वर हल्ला करेल, परंतु तो त्यांना पळवून लावील.”
  • 20 “आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील; राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.”
  • 21 “नफताली मोकळ्या सुटलेल्या बागडणाऱ्या हरिणीप्रमाणे होईल; त्याचे शब्द म्हणजे त्याचे बोलणे हरिणींच्या पाडसाप्रमाणे गोड व सुंदर असेल.”
  • 22 “योसेफ अतिशय यशस्वी झाला आहे; तो ओढ्याकाठी वाढणाऱ्या द्राक्षवेलीसारखा आहे; ती कुंपणावरही पसरते.
  • 23 पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध झाले व त्याच्याशी लढले; धनुर्धारी लोकांनी त्याचा द्धेष केला;
  • 24 परंतु आपल्या वळकट धनुष्याच्या आणि कुशल बाहुंच्या जोरावर त्याने युद्व जिंकिले. त्याला याकोबाचा सामर्थ्यवान देव, मेंढपाळ, इस्राएलाचा खडक व तुमच्या बापाचा देव याजकडून तुम्हाला शक्ती मिळते.
  • 25 सर्वशक्तिमान देव तुला वर आकाशातून व खाली खोल दरीतून आशीर्वाद देवो तसेच स्तनांचा व गर्भाचा आशीर्वाद तो तुला देवो.
  • 26 माझ्या आईबापाच्या जीवनात अनेक चांगल्या घटना घडल्या व अनेक चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या; आणि मी तुझा बाप, मला त्यांच्यापेक्षा अधिक आशीर्वाद मिळाला; तुझ्या भावांनी तुला काही ठेवले नाही. परंतु माझे सर्व आशीर्वाद तुझ्यावर पर्वता एवढे होतील.’
  • 27 “बन्यामीन एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारुन खाईल व राहिलेले संध्याकाळी वाटून टाकील.”
  • 28 हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत; आणि हया गोष्टी त्यांचा बाप त्यांच्याशी बोलला; त्याने प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या योग्यातेप्रमाणे आशीर्वाद दिला.
  • 29 मग इस्राएलाने त्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “मी मरेन तेव्हा तुम्ही मला माझ्या लोकात नेऊन ठेवावे. एफ्राम हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे.
  • 30 ती गुहा कनान देशात मम्रेच्या राईजवळील मकपेला येथील शेतात आहे. आपल्या घराण्याला कबरस्तान असावे म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रामकडून विकत घेतले.
  • 31 अब्राहाम व त्याची बायको सारा, यांना त्या गुहेह पुरले आहे. इसहाक आणि त्याची बायको रिबेका यांनाही तेथेच पुरले आहे. आणि माझी बायको लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.
  • 32 ती गुहा हेथी लोकाकडून विकत घेतलेल्या शेतात आहे.”
  • 33 आपल्या मुलांशी हे बोलणे संपवल्यानंतर इस्राएल आपले पाय पलंगावर घेऊन झोपला व मरण पावला.