- 1 “चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
- 2 दोन दिवसांनी तो आपल्याला जिवंत करील. आणि तिसऱ्या दिवशी उठवील मग आपण त्यांच्याजवळ पाहू शकू.
- 3 आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ या परमेश्वराला समजून घ्यायचा कसून प्रयत्न करू या. पहाट येते हे जसे आपल्याला माहीत आहे, हेही आपल्याला माहीत आहे. जमिनीला पाणी पुरविणाव्या वसंतातील पावसाप्रमाणे परमेश्वर येईल.”
- 4 “एफ्राईम व यहूदा, मी तुमचे काय करावे बरे? तुमची निष्ठा सकाळच्या धूक्याप्रमाणे आहे. प्रात:काळीच नाहीशा होणाऱ्या दवाप्रमाणे तुमची निष्ठा आहे.
- 5 मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन लोकांसाठी नियम केले. माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले. त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.
- 6 का? कारण मला निष्ठावंत प्रेम पाहिजे, बळी नको. लोकांनी होमार्पणे आणण्यापेक्षा, परमेश्वराला जाणून घ्यावे असे मला वाटते.
- 7 पण लोकांनी आदामासारखाच करार मोडला त्यांच्या देशातच त्यांनी माझा विश्वासघात केला.
- 8 गिलाद दुष्कर्मे करणाव्यांची नगरी आहे. लोकांनी दुसऱ्यांना फसविले व ठार मारले.
- 9 लुटारू ज्याप्रमाणे कोणावर तरी हल्ला करण्यासाठी वाट बघत लपून बसतात, त्याचप्रमाणे धर्मगुरु शेखमला जाणाव्या रस्त्यावर वाटसंरूची वाट बघतात. त्यांनी दुष्कृर्त्ये केली आहेत.
- 10 इस्राएलमध्ये भयंकर गोष्ट मी पाहीली आहे. एफ्राईम परमेश्वाशी निष्ठावान नाही इस्राएल पापाने बरबटली आहे.
- 11 यहूदा, तुझ्यासाठी सुगीची वेळ ठेवलेली आहे. माझ्या लोकांना मी कैदेतून परत आणीन, तेव्हा ती वेळ येईल.”
Hosea 06
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Hosea
होशेय धडा 6