wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यशया धडा 22
  • 1 दृष्टान्ताच्या दरीविषयी शोक संदेश.लोकहो, तुमचे काय बिघडले आहे? तुम्ही घराच्या छपरावर का लपला आहात?
  • 2 पूर्वी हे शहर फार गजबजलेले होते. येथे गलबलाट होता आणि शहर सुखी होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. तुझे लोक मारले गेले पण तलवारीच्या वाराने नव्हे. तुझे लोक मेले हे खरे, पण लढताना नव्हे.
  • 3 तुझे नेते एकत्र होऊन खूप लांब जरी पळून गेले, तरी ते पकडले गेले. ते पकडले गेले ते धनुष्याचा उपयोग न करता. ते सर्व नेते एकत्रितपणे पळून गेले पण पकडले गेलेच.
  • 4 म्हणून मी म्हणतो, “माझ्याकडे बघू नका, मला रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशाबद्दल माझे सांत्वन करू नका.”
  • 5 परमेश्वराने एक विशेष दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी तेथे दंगली व गोंधळ होईल. दृष्टांन्ताच्या दरीत लोकांची तुडवातुडवी होईल. शहराची तटबंदी पाडली जाईल. दरीतील लोक डोंगर माथ्यावर असलेल्या शहरातील लोकांकडे बघून आरडाओरडा करतील.
  • 6 एलामचे घोडदळ भाते अडकवून लढाईसाठी दौड करील. कीरवासीयांच्या ढालींचा खणखणाट होईल.
  • 7 तुझ्या खास दरीत सैन्यांची गाठ पडेल. रथांनी दरी भरून जाईल. घोडदळ शहराच्या वेशीपाशी ठेवले जाईल.
  • 8 तेव्हा यहुदी लोक रानातील राजवाड्यात ठेवलेल्या शस्त्रांचा उपयोग करू पाहतील.शत्रू यहुदाचे तट पाडतील.
  • 9 दावीदाच्या शहरांच्या भितींना भगदाडे पडायला सुरवात होईल. आणि तुम्हाला ती स्पष्टपणे दिसतील. मग तुम्ही घरांची मोजदाद कराल आणि तुम्ही घरांचे दगड तटाची भगदाडे बुजवायला वापराल. पाणी साठविण्यासाठी दोन भिंतीत जागा करून तुम्ही जुन्या झऱ्याचे पाणी सोडाल.तुमच्या बचावासाठी तुम्ही हे सर्व कराल पण ज्याने हे सर्व केले त्या देवावर तुम्ही श्रध्दा ठेवणार नाही. ज्याने फार पूर्वीच या गोष्टी करून ठेवल्या त्या देवाकडे तुमचे लक्षच जाणार नाही.
  • 10
  • 11
  • 12 म्हणून माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर तुमच्या मृत मित्रांसाठी शोक करण्यास व रडण्यास सांगेल. लोक मुंडन करून शोकप्रदर्शक वस्त्रे घालतील.
  • 13 पण पाहा! आता लोक आनंदात आहेत. ते आनंदोत्सव साजरा करत आहेत. ते म्हणत आहेत,गुरे, मेंढ्या मारा. आपण उत्सव साजरा करू. आपण जेवण करू, मद्यपान करू कारण उद्या आपल्याला मरायचे आहे.
  • 14 सर्वशक्तिमान परमेश्वराने सांगितलेल्या ह्या गोष्टी मी स्वत: माझ्या कानाने ऐकल्या. “तुमच्या दुष्कृत्यांबद्दल तुम्ही अपराधी आहात. या अपराधांबद्दल क्षमा करण्यापूर्वीच तुम्ही मराल याची मला खात्री आहे.” माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला हे सांगितले.
  • 15 माझ्या प्रभूने, सर्वशक्तिमान परमेश्वराने मला सांगितले, ‘राजप्रासादातील कारभारी शेबना याच्याकडे जा. तो राजवाड्याचा कारभार पाहतो.
  • 16 राजप्रासादातील त्या नोकराला जाब विचार, ‘येथे काय करीत आहेस? तुझ्या कुटुंबातील कोणाचे येथे दफन केले आहे का? तू येथे थडगे का खणीत आहेस?”यशया म्हणाला, “हा माणूस पाहा, हा स्वत:चे थडगे महत्वाच्या जागी खणत आहे. खडक फोडून तो स्वत:चे थडगे खणत आहे.”
  • 17 “हे माणसा, परमेश्वर तुला चिरडून टाकील. परमेश्वर तुझा लहानसा चेंडू करून तुला दुसऱ्या मोठ्या देशात भिरकावून देईल. तेथेच तू मरशील.”परमेश्वर म्हणाला, “तुला तुझ्या रथांचा फार गर्व आहे पण त्या दूरदेशातील तुझ्या नवीन राजाचे रथ तुझ्यापेक्षा चांगले असतील. त्याच्या राजवाड्यात तुझे रथ शोभणार नाहीत.
  • 18
  • 19 येथल्या महत्वाच्या पदावरून तुला कमी करायला मी भाग पाडीन. तुझा नवा राजा तुला महत्वाच्या पदावरून दूर करील.
  • 20 त्या वेळी मी माझा सेवक आणि हिल्कीयाचा मुलगा एल्याकीम ह्याला बोलावीन.
  • 21 “मी तुझी वस्त्रे व राजदंड काढून एल्याकीमला देईन. तुझे महत्वाचे पद त्याला देईन. तो सेवक यरूशलेमच्या लोकांना व यहुद्याच्या कुटुंबीयांना पित्याप्रमाणे असेल.
  • 22 “दावीदाच्या घराची किल्ली मी एल्याकीमच्या ताब्यात देईन. त्याने उघडलेले दार उघडेच राहील. कोणीही ते बंद करू शकणार नाही. त्याने बंद केलेले दार बंदच राहील. ते कोणीही उघडू शकणार नाही. त्याच्या वडिलांच्या घरात त्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल.
  • 23 अतिशय कठीण पृष्ठ भागावर ठोकून बसवलेल्या खिळ्याप्रमाणे मी त्याला मजबूत करीन.
  • 24 त्याच्या वडिलांच्या घरातील महत्वाच्या व पूज्य वस्तू त्याच्या ताब्यात जातील. आबालवृद्ध त्याच्यावर अवलंबून असतील. हे अवलंबून राहणेभक्कम खिळ्याला अडकविलेल्या छोट्या ताटल्या व मोठ्या पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे असेल.
  • 25 “आता, कठीण पृष्ठभागावर ठोकून बसविलेला खिळा (शेबना) त्या वेळी कमकुवत होऊन तुटून पडेल. तो खिळा जमिनीवर तुटून पडल्याने त्याला अडकविलेल्या वस्तूंचा नाश होईल. नंतर मी दृष्टांन्तात सांगितल्याप्रमाणे सर्व होईल.” (परमेश्वराने सांगितले असल्यामुळे ह्या गोष्टी घडतील)