wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यशया धडा 24
  • 1 पाहा! परमेश्वर ह्या देशाचा नाश करील. ही भूमी पूर्णपणे स्वच्छ करील. परमेश्वर लोकांना बळजबरीने दूर जायला लावील.
  • 2 त्या वेळेला सामान्य लोक आणि याजक यांना एकाच मापाने मोजले जाईल. गुलाम व मालक हे सारखेच समजले जातील. दासी आणि मालकीण यांच्यात फरक केला जाणार नाही. खरीददार व विक्रेते, कर्ज घेणारे व कर्ज देणारे आणि धनको व ऋणको ह्यांत भेद केला जाणार नाही.
  • 3 सर्व लोकांना देशातून बळजबरीने हाकलून दिले जाईल. सर्व संपत्ती लुटली जाईल. परमेश्वराच्या आज्ञेवरून हे घडेल.
  • 4 देश ओस पडून त्याच्यावर शोककळा पसरेल. जग ओसाड व दु:खी होईल. ह्या देशातील महान नेते दुबळे होतील.
  • 5 ह्या देशातील लोकांनी देशाला ओंगळ केले. हे कसे झाले? देवाच्या शिकवणुकी विरूध्द जाऊन त्यांनी चुकीचे आचरण केले. देवाचे नियम त्यांनी मानले नाहीत. पूर्वी लोकांनी देवाबरोबर करार केला पण ती त्यांनीच मोडला.
  • 6 ह्या देशात राहणारे लोक दुष्कृत्यांचे धनी आहेत. म्हणून देवाने हा देश नष्ट करायचा पण केला. लोकांना शिक्षा होईल. फारच थोडे वाचतील.
  • 7 द्राक्षवेली सुकत चालल्या आहेत. नवीन मद्य खराब आहे. पूर्वी लोक सुखी होते. पण आता तेच लोक दु:खी झाले आहेत.
  • 8 लोकांचे आनंदप्रदर्शन थांबले आहे. सगळे आनंददात थांबले आहेत. सांरगीतून आणि डफातून उठणारे आनंदसंगीत बंद पडले आहे.
  • 9 लोक मद्य पिताना आनंदगीते म्हणत नाहीत. मद्याची चव कडू झाली आहे.
  • 10 “संपूर्ण गोंधळ” हेच नाव या शहराला शोभेल. शहराचा नाश झाला आहे. लोक घरात प्रवेश करू शकत नाहीत. दारांना अडसर घातले आहेत.
  • 11 बाजारात लोक अजूनही मद्याची मागणी करतात पण त्यात पूर्वीचा आनंद नाही. सगळीच मजा गेली आहे.
  • 12 सर्वत्र पडझड झाली आहे. वेशीसुध्दा कोलमडून पडल्या आहेत.
  • 13 सुगीच्या काळात, लोक जैतूनची फळे झाडावरून पाडतात. पण काही झाडावर राहतातच. अनेक देशांमध्ये असलेल्या ह्या देशाचे देखील असेच होईल.
  • 14 वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील. त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल. परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील.
  • 15 ते लोक म्हणतील, “पूर्वेकडच्या लोकांनो, परमेश्वराचे स्तवन करा. दूरच्या देशांतील लोकांनो, इस्राएलच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा.”
  • 16 जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील. ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल. पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले. मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत. लोकांच्या विरूध्द विश्वासघातकी उठले आहेत. व त्यांना त्रास देत आहेत.
  • 17 ह्या देशात राहणाऱ्या लोकांवर येणारे संकट मला दिसत आहे. त्यांची भीती, त्यांच्या पुढे असलेले खाचखळगे व सापळे मला दिसतात.
  • 18 लोकांना संकटाची चाहूल लागून ते घाबरून जातील. काही लोक सैरावैरा पळतील. पण ते खाचखळग्यात पडतील आणि सापळ्यात अडकतील. त्यातील काही खड्ड्यातून चढून बाहेर येतील. पण ते दुसऱ्या सापळ्यात अडकतील,” आकाश फाटेल आणि प्रलय होईल. पृथ्वीचा पाय कापू लागेल.
  • 19 धरणीकंप होऊन जमीन दुभंगेल.
  • 20 पृथ्वीला पापांचा भार झाला आहे. म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल. पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल. एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल आणि पुन्हा उठणार नाही.
  • 21 त्या वेळी, परमेश्वर, स्वर्गातील सैन्यांचा स्वर्गात व पृथ्वीवरील राजांचा पृथ्वीवर, न्यायानिवाडा करील.
  • 22 खूप राजे एकत्र जमतील आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल. पण शेवटी, बऱ्याच काळानंतर, त्यांना न्याय दिला जाईल.
  • 23 यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल. त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल. त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल आणि सूर्याला लाज वाटेल.