wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यशया धडा 54
  • 1 स्त्रिये, सुखी हो. तुला मुले नाहीत. पण तू सुखी असावेस. परमेश्वर म्हणतो, “एकट्या असणाऱ्या बाईला.नवरा असणाऱ्या बाईपेक्षा जास्त मुले होतील.”
  • 2 तुझा तंबू मोठा कर. तुझी दारे सताड उघड. तुझ्या घराचा आकार वाढव तुझा तंबू मोठा आणि मजबूत कर.
  • 3 का? कारण तुझा पसारा खूप वाढणार आहे. खूप राष्ट्रातील लोक तुझ्या मुलांना येऊन मिळणार आहेत. तुझे वंशज राष्ट्रांची व्यवस्था लावतील आणि नाश झालेल्या शहरातून पुन्हा तुझी मुले वस्ती करतील.
  • 4 घाबरू नकोस. तुझी निराशा होणार नाही. लोक तुझी निंदा करणार नाहीत. तुला ओशाळवाणे व्हावे लागणार नाही. तू तरूण असताना तुला लज्जित व्हावे लागले. पण आता तू ते विसरशील. पती गेल्यावर तुझी झालेली अप्रतिष्ठा तुला आठवणार नाही.
  • 5 कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे. त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे. आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल.
  • 6 तू परित्यक्ता स्त्रीप्रमाणे होतीस. तू मनातून फार दु:खी होतीस. पण देवाने तुला आपली मानले. पतीने तरूणपणीच सोडून दिलेल्या स्त्रीप्रमाणे तुझी अवस्था होती. पण परमेश्वराने तुला आपली मानले.
  • 7 देव म्हणतो, “मी तुला सोडले ते थोड्या वेळापुरतेच. मी तुला माझ्यात सामावून घेईन आणि तुझ्यावर कृपा करीन.
  • 8 मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो. पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दु:ख हलके करीन.” परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला.
  • 9 देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव. पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते. त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.”
  • 10 परमेश्वर म्हणतो, “एकवेळ डोंगर नाहीसे होतील, टेकड्यांचे रूपांतर धुळीत होईल. पण माझी तुझ्यावरची कृपा कधीही नाहीशी होणार नाही. मी स्थापन केलेली शांती चिरंतन राहील.” तुझ्यावर कृपा करणारा परमेश्वरच हे सगळे सांगत आहे.
  • 11 “बिचाऱ्या नगरी, वादळाप्रमाणे शत्रू तुझ्यावर चालून आले आणि कोणीही तुझे सांत्वन केले नाही. पण मी तुला पुन्हा उभारीन. तुझ्या वेशीच्या पायासाठी मी अतिशय चांगला चुना वापरीन. मी पाया घालताना इंद्रनील वापरीन.
  • 12 वेशीच्या भिंतीवरील दगड माणकांचे बसवीन. वेशीच्या दारासाठी मी चकाकणारी रत्ने वापरीन. वेशीसाठी मी हिरेमाणके वापरीन.
  • 13 तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.
  • 14 चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल. म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासूनही तुला इजा होणार नाही.
  • 15 माझे कोणतेही सैन्य तुझ्याविरूध्द लढणार नाही. आणि समजा कोणी तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाच तर तू त्याचा पराभव करशील.
  • 16 “बघ! मी लोहार निर्मिला. तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो. मग तापलेल्या लोखंडापासून त्याला पाहिजे तसे हत्यार तो बनवितो. त्याचप्रमाणे मी ‘नाश’ करणारा घडविला आहे.
  • 17 “लोक तुझ्याविरूध्द लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील. पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्याविरूध्द बोलतील पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल.”देव म्हणतो, “देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील.”