wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


यहोशवा धडा 4
  • 1 सर्वजण नदी पार करून गेल्यानंतर परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
  • 2 “आता बाराजणांची निवड कर. प्रत्येक कुळातुन एकेक घे.
  • 3 याजक नदीत जेथे उभे होते त्या जागेवरचे बारा दगड त्यांना निवडायला सांग. ते बारा दगड उचलून, आज रात्री तुम्ही जेथे मुक्काम कराल तिथे ठेवा.”
  • 4 यहोशवाने मग प्रत्येक कुळातून एक याप्रमाणे बाराजण निवडले. त्यांना जवळ बोला बोलावून
  • 5 तो म्हाणाला, “तुमच्या परमेश्वर देवाच्या पवित्र करार कोशासमोर नदीच्या मध्यभागी जा. तेथून प्रत्येकाने एकएक दगड उचलून आणा. इस्राएल मधील आपापल्या कुळाचे प्रतीक म्हणून तो राहील. तेव्हा असा दगड खांद्यावर घेऊन या.
  • 6 हा दगड म्हाणजे एक चिन्ह होय. “या दगडांचा अर्थ काय?’ असे पुढे तुमची मुले तुम्हाला विचारतील.
  • 7 परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश वाहून नेत असताना नदी दुभंगली व परमेश्वराने यार्देनेचा प्रवाह रोखला ही गोष्ट इस्राएलांच्या कायम स्मरणात राहावी म्हणून हे दगड आहेत असे त्यांना सांगा.”
  • 8 इस्राएल लोकांनी यहोशवाचे ऐकले. त्यांनी नदीच्या प्रवाहातून इस्राएलाच्या प्रत्येक कुळासाठी एक याप्रमाणे बारा दगड उचलून आणले. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा केली त्याप्रमाणे ते वागले. ते दगड वाहून आणून त्यांनी आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन ठेवले.
  • 9 परमेश्वराच्या कराराचा पवित्र कोश घेऊन याजक ज्या ठिकाणी थांबले तेथे यहोशवाने बारा दगड ठेवले. ते आजही त्याठिकाणी आहेत.
  • 10 लोकांनी आता काय करावे हे सांगण्याची परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिली. मोशेनेही यहोशवाला याच गोष्टी सांगितल्या होत्या. हे सर्व होईपर्यंत परमेश्वराच्या कराराचा कोश घेऊन याजक नदीच्या मध्यभागी उभे राहिले. आणि लोकांनी भराभर नदी पार केली.
  • 11 लोक नदी ओलांडून गेल्यावर मग याजक पवित्र करारकोश घेऊन लोकांच्या पुढे गेले.
  • 12 रऊबेनी, गादी आणि मनश्शाचा अर्धा वंशातील लोक मोशेच्या सांगण्याप्रमाणे हत्यारबंद होऊन, नदी ओलांडून इतरांच्यापुढे गेले. परमेश्वराने द्यायचा कबूल केलेला प्रदेश मिळवून द्यायला ते उर्वरित इर्साएल लोकांना मदत करणार होते.
  • 13 सुमारे चाळीस हजार लोक युध्दाच्या तयारीने परमेश्वरासमोर यरीहोच्या मैदानाकडे चालून गेले.
  • 14 सर्व इस्राएल लोकांच्या मनात त्या दिवशी परमेश्वराने यहोशवाबद्दल थोर असे महत्व बिंबवले. तेव्हापासून पुढे त्याचे आयुष्य असेपर्यंत त्यांनी मोशे प्रमाणेच यहोशवाविषयी आदर बाळगला.
  • 15 याजक तो कोश घेऊन नदीच्या पात्रात उभे असताना परमेश्वर यहोशवाला म्हणाला,
  • 16 याजकांना नदीतून बाहेर यायला सांग.”
  • 17 त्याप्रमाणे यहोशवाने याजकांना यार्देनबाहेर येण्याची आज्ञा केली.
  • 18 यहोशवाचे ऐकून याजक करारकोश घेऊन नदीच्या पात्रातून बाहेर आले. याजकांचे पाय जमिनीला लागताच पाणी पुन्हा पूर्ववत वाहू लागले. नदी पुन्हा पहिल्यासारखी दुथडी भरून वाहू लागली.
  • 19 पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी नदी ओलांडून लोकांनी यरीहोच्या पूर्वेकडील गिलगाल येथे तळ दिला.
  • 20 नदीतून उचललेले बारा दगड त्यांनी आणले होतेच. ते यहोशवाने गिलगाल येथे रचून ठेवले.
  • 21 यहोशवा म्हणाला, ““या दगडांचे महत्व काय? ते येथे कशासाठी?’ असे उद्या तुमची मुले तुम्हाला
  • 22 विरतील.22तेव्हा त्यांना सांगा, “यार्देन नदीच्या कोरडचा पात्रातून इस्राएल लोक कसे आले त्याची ही आठवण आहे.
  • 23 ““तेव्हा तुमच्या परमेश्वर देवाने नदीचा प्रवाह रोखला होता. आम्ही तांबडा समुद्र ओलांडला त्यावेळी झाले तसेच येथेही लोकांनी नदी ओलांडेपर्यंत नदीचे पात्र कोरडे होते. तांबडा समुद्रही परमेश्वराने असाच आटवला होता.’
  • 24 आपला परमेश्वर अतिशय प्रतापी आहे हे जाणून येथील लोकांना त्याचा धाक वाटावा म्हणून तुमच्या परमेश्वर देवाने असे केले.”