wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


मीखा धडा 1
  • 1 मीखाला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. योथाम, आहाज व हिज्कीया यांच्या काळात हे घडले. हे सर्व यहूदाचे राजे होते. मीखा मोरेशेथचा होता. मीखाने शोमरोन व यरुशलेम यांच्याविषयी पुढील दृष्टांन्त पाहिले.
  • 2 सर्व लोकांनो ऐका! जग आणि त्यावरील प्रत्येकाने, ऐका! माझा प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून येईल. तुमच्याविरुध्दचा साक्षीदार म्हणून तो येईल.
  • 3 पाहा परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. पृथ्वीवरील उच्चस्थाने तुडविण्यासाठी तो येत आहे.
  • 4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील. दऱ्या दुभंगतील आणि उंच टेकड्यावरुन वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहू लागतील.
  • 5 का? ह्याला कारण याकोबचे पाप, तसेच इस्राएल राष्ट्राची दुष्कर्मे आहेत.याकोबने पाप करण्याचे कारण काय? त्याला कारणीभूत आहे शोमरोन. यहूदात उच्चस्थान कोठे आहे? यरुशलेममध्ये.
  • 6 म्हणून मी शोमरोनला भूमीवरील खडकांच्या ढिगाप्रमाणे करीन. ती द्राक्ष लागवडीच्या जागेप्रमाणे होईल. शोमरोनचे चिरे मी दरीत ढकलून देईल. आणि तिथे पायांखेरीज काहीही शिल्लक ठेवणार नाही.
  • 7 तिच्या सर्व मूर्तीचे तुकडे तुकडे केले जातील. तिच्या वेश्येची संपत्ती (मूर्ती) आगीमध्ये भस्मसात होईल. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या पुतळ्यांचा मी नाश करीन. का? कारण शोमरोनने माझ्याशी विश्वासघात करुन सर्व धन मिळविले.म्हणून माझ्याशी एकनिष्ठ नसलेल्या लोकांमार्फत तिची संपत्ती घेतली जाईल
  • 8 घडणाऱ्या गोष्टींबद्दल मला फार दु:ख होईल. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन. आणि शहामृगाप्रमाणे ओरडीन.
  • 9 शोमरोनची जखम भरुन येऊ शकत नाही. तिचा आजार (पाप) यहूदापर्यंत पसरला आहे. तो माझ्या माणसांच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. तो पार यरुशलेमपर्यंत पसरला आहे.
  • 10 गथमध्ये हे सांगू नका. अंकोत ओरडू नका. बेथ-अफ्रामध्ये धुळीत लोळा.
  • 11 शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन आपल्या वाटेने फिरता. सअनानवासी बाहेर पडणार नाहीत. बेथ-एसलामधील लोक शोक करतील. आणि त्या शोकाचे कारण (आधार) तुम्ही असाल.
  • 12 मारोथमधील लोक सुवार्तेची वाट पाहता पाहता दुर्बल होतील. का? कारण संकट परमेश्वराकडून खाली यरुशलेमच्या वेशीपर्यंत आले आहे.
  • 13 लाखीशच्या महिले, गाडी चपळ घोडा जुंप. सियोनच्या पापाला लाखीशमध्ये सुरवात झाली. का? कारण तू इस्राएलच्या पापांत सामील झालीस.
  • 14 म्हणून तू गथांतल्या मोरेशथला निरोपाचे नजराणे दिले पाहिजेस. अकजीबची घरे इस्राएलच्या राजाला फसवतील.
  • 15 मोरेशमध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुमच्या विरुध्द एका व्यक्तीला मी आणीन. तो तुमच्या मालकीच्या वस्तू घेईल. इस्राएलचे वैभव (परमेश्वर) अदुल्लामला येईल.
  • 16 म्हणून केसा कापा, मुंडन करा.का? कारण तुम्हाला प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल. गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन कराल. गरुडा प्रमाण तुम्ही स्वत:चे डोक्याचे मुंडन करुन घ्या आणि दु:ख प्रगट करा. का? कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.