wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


मीखा धडा 6
  • 1 परमेश्वर काय म्हणतो, ते आता ऐका. पर्वतांसमोर तुमची बाजू मांडा. टेकड्यांना तुमची हकिगत ऐकूद्या.
  • 2 परमेश्वराची त्याच्या लोकांविरुध्द तक्रार आहे. पर्वतांनो, परमेश्वराची तक्रार ऐका! पृथ्वीचे पाये असलेल्यांनो, परमेश्वराचे ऐका! इस्राएल चूक आहे, हे तो सिध्द करुन दाखवील.
  • 3 परमेश्वर म्हणतो, “माझ्या माणसांनो, मी काय केले ते सांगा! मी तुमच्या विरुध्द काही चूक केली का? मी तुम्हाला जगणे अवघड केले का?
  • 4 मी केलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुमच्याकडे पाठविले. मिसर देशातून मी तुम्हाला आणले. दास्यातून मी तुमची मुक्तता केली.
  • 5 माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याचे दुष्ट कट आठवा. बौराचा मुलगा बलाम, बालाकला काय म्हणाला त्याची आठवण करा. शिट्टीमपासून गिल्गापर्यतकाय घडले त्याचे स्मरण करा. ह्या गोष्टींचे स्मरण केल्यावर तुमच्या लक्षात येऊल की परमेश्वर बरोबर होता.”
  • 6 परमेश्वराला भेटायला येताना मी काय आणले पाहिजे? स्वर्गातील परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मी काय केले पाहिजे? होमार्पणे व एक वर्षाचे वासरु घेऊन मी परमेश्वरापुढे यावे का?
  • 7 1,000 मेंढे व 10,000 तेलाच्या नद्या यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या पोटच्या पोराला माझ्या पापांची किंमत चुकती करण्याकरिता द्यावे का?
  • 8 हे माणसा, चांगुलपणा म्हणजे काय हे परमेश्वराने तुला सांगितले. परमेश्वर तुमच्याकडून पुढील गोष्टींची अपेक्षा करतो. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. दया व निष्ठा ह्यावर प्रेम करा. तुमच्या परमेश्वरापुढे नम्र होऊन राहा. भेटी देऊन त्याच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करु नता
  • 9 परमेश्वराची वाणी नगरात ओरडते. सुज्ञ परमेश्वराच्यानामाचा मान राखतात. म्हणून शिक्षेच्या दंडाकडे आणि ज्याने तो धरला आहे त्याच्याकडे लक्ष द्या.
  • 10 वाईट माणसे, त्यांनी चोरलेली संपत्ती, अजून लपवितात का? ज्यांच्या टोपल्या अतिशय लहान आहेत, त्यांना हे वाईट लोक अजूनही फसवितात का? होय या सर्व गोष्टी अजूनही होत आहेत.
  • 11 जे दुष्ट लोक अजूनही लोकांना फसवण्यासाठी वजन मापांचा उपयोग करतात त्यांना मी क्षमा करावी का? चुकीचे माप देणारी वजने असलेली थैली वापरणाऱ्यांना मी माफ करावे का?
  • 12 त्या नगरीतील श्रीमंत अजूनही क्रूर आहेत. तेथील लोक अजूनही खोटे बोलतात. होय, ते लोक त्यांच्या लबाड्या सांगतात.
  • 13 म्हणून मी तुम्हाला शिक्षा करायला सुरवात केली आहे. तुम्ही पाप केले म्हणून मी तुमचा नाश करीन.
  • 14 तुम्ही खाल, पण तृप्त होणार नाही. तुम्ही भुकेले आणि रिते राहाललोकांना सुरक्षितेत आणण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पण तुम्ही ज्यांना सोडविले त्यांना तलवारधारी लोक जीवे मारतील.
  • 15 तुम्ही बी पेराल. पण तुम्हाला धान्य मिळणार नाही. जैतुनांपासून तेल काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, पण तुम्हाला तेल मिळणार नाही. तुम्ही द्राक्षांचा चुराडा कराल पण तुम्हाला पुरेसा रस पिण्यास मिळणार नाही.
  • 16 का? कारण तुम्ही अम्रीचे नियम पाळता. अहाबचे घराणे करते त्या सर्व वाईट गोष्टी तुम्ही करता. तुम्ही त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागता. म्हणून मी तुमचा नाश होऊ देईन. तुमची नष्ट झालेली नगरी पाहून लोक विस्मयोदगार काढतील. माझे लाजिरवाणे लोक कैदी म्हणून नेले जातीलइतर राष्ट्रे तुम्हाला लाजिरवाणे करतील. ती लाज तुम्हाला बाळगावी लागेल.