wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


नहेम्या धडा 7
  • 1 तेव्हा तटबंदीचे काम पुरे झाले मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले. वेशींवर पहारा करायला माणसे नेमली. मंदिरात गायनाला आणि याजकांना मदत करायला माणसे नेमून दिली.
  • 2 यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुशलेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गिढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले. हनानीची निवड मी केली कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे.
  • 3 नंतर हनानी आणि हनन्या यांना मी म्हणालो, “सूर्य चांगला वर येऊन ऊन तापल्यावरच तुम्ही रोज वेशीचे दरवाजे उघडा आणि सूर्यास्तापूर्वीच दरवाजे लावून घ्या. यरुशलेममध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”
  • 4 आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते. पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती.
  • 5 तेव्हा सर्व लोकांनी एकदा एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात आणले. सर्व वंशावळयांची यादी करावी म्हणून मी सर्व महत्वाची माणसे, अधिकारी, सामान्य लोक यांना एकत्र बोलावले. बंदिवासातून जे सगळयात आधी परत आले त्यांच्या वंशवळ्यांच्या याद्या मला सापडल्या त्यात मला जे लिहिलेले सापडले ते पुढीलप्रमाणे:
  • 6 बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने या लोकांना बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुशलेम आणि यहुदा येथे परतले. जो तो आपापल्या गावी गेला.
  • 7 जरुब्बाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशूवा, नहेम्या, अजऱ्या, राम्या, नहमानी, मर्दमानी, बिलशान, मिस्पेरेथ बिग्वई, नहूम आणि बाना. इस्राएलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढीलप्रमाणे:
  • 8 परोशचे वंशज2172
  • 9 शेफठ्याचे वंशज372
  • 10 आरहचे वंशज652
  • 11 येशूवा आणि यवाब यांच्यावंशावळीतील पहथमवाबचेवंशज2818
  • 12 एलामचे वंशज1254
  • 13 जत्तूचे वंशज 845
  • 14 जक्काईचे वंशज 760
  • 15 बिन्नुईचे वंशज 648
  • 16 बेबाईचे वंशज628
  • 17 आजगादचे वंशज2322
  • 18 अदोनीकामचे वंशज667
  • 19 बिग्वईचे वंशज
  • 20 6720 आदीनाचे वंशज 655
  • 21 हिज्कीयाच्या कुटुंबातीलओटेरचे वंशज98
  • 22 हाशुमाचे वंशज328
  • 23 बेसाईचे वंशज324
  • 24 हारिफाचे वंशज112
  • 25 गिबोनाचे वंशज95
  • 26 बेथलहेम आणि नटोफा यागावांमधली माणसे188
  • 27 अनाथोथ गावची माणसे128
  • 28 बेथ-अजमावेथ मधले लोक42
  • 29 किर्याथ-यारीम, कपीरा व बैरोथया गावातली743
  • 30 रामा आणि गेबा इथली621
  • 31 मिखमास या गावची 122
  • 32 बेथल आणि आय इथली123
  • 33 नबो या दुसऱ्या एका गावची 52
  • 34 एलाम या दुसऱ्या गावची1254
  • 35 हारिम या गावचे लोक320
  • 36 यरीहो या गावचे लोक345
  • 37 लोद, हादीद व ओनो या गावाचे721
  • 38 सनावाचे3930
  • 39 याजक पुढीलप्रमाणे:येशूवाच्या घराण्यातली यदायायाचे वंशज973
  • 40 इम्मेराचे वंशज1052
  • 41 पशहूराचे वंशज1247
  • 42 हारिमाचे वंशज1017
  • 43 लेवीच्या घराण्यातील माणसे पुढील प्रमाणे:होदयाच्या कुळातली कदमीएलच्याघराण्यातील येशूवाचे वंशज74
  • 44 गाणारे असे:आसाफाचे वंशज148
  • 45 द्वारपाल पुढील प्रमाणे:शल्लूम, आटेर, तल्मोन, अक्कूब, हतीता, शोबायांचे वंशज138
  • 46 हे मंदिराचे विशेष सेवेकरी:सीहा, हशूफा, तबायोथ, यांचे वंशज
  • 47 केरोस, सीया, पादोन
  • 48 लेबोना, हगाबा, सल्माई
  • 49 हानान, गिद्देल, गहार
  • 50 राया, रसीन, नकोदा
  • 51 गज्जाम, उज्जा. पासेहा
  • 52 बेसई, मऊनीम, नफूशेसीम
  • 53 बकबूक, हकूफ, हईराचे
  • 54 बसलीथ, महीद, हर्शा
  • 55 बकर्स, सीसरा, तामहा
  • 56 नसीहा आणि हतीफा
  • 57 शलमोनच्या सेवकांचे वंशज:सोताई, सोफेरेथ, परीदा
  • 58 याला, दकर्न, गिद्देल
  • 59 शफाठ्या, हत्तील, पोखेरेथ-हस्सबाईमआणि आमोन.
  • 60 मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनच्या सेवकांचे वंशज मिळून 392
  • 61 तेल मेलह, तेल-हर्षा, करुब, अद्दोन व इम्मेर या गावांमधून काही लोक यरुशलेमला आले होते पण आपली घराणी मूळ इस्राएलींमधलीच आहेत हे त्यांना खात्रीलायक सांगता येत नव्हते. ते लोक असे:
  • 62 दलाया, तोबीया आणि नकोदायांचे वंशज 642
  • 63 आणि याजकांच्या घराण्यातील वंशज असे:हबाया, हक्कोस, बर्जिल्लय (गिलादच्या बर्जिल्लयच्या मुलीशी लग्र करणाऱ्याची गणाना बर्जिल्लयच्या वंशजात होई)
  • 64 काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही. याजक म्हणून काम करता यावे यासाठी आपण याजकांचेच पूर्वज आहोत हे काही त्यांना सिध्द करता आले नाही. त्यामुळे त्यांना याजक म्हणून सेवा करता आली नाही. त्यांची नावे याजकांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली नाहीत.
  • 65 अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. ऊरीम व थुम्मीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत त्यांनी या अन्नातले काही खायचे नव्हते.
  • 66 परत आलेल्या जथ्थ्या मध्ये सगळे मिळून एकंदर 42360 लोक होते. यात 7337 स्त्री-पुरुष सेवकांची गणना केलेली नाही. शिवाय त्यांच्यामध्ये 245गायकगायिका होत्या.
  • 67
  • 68 त्यांच्याजवळ 736घोडे, 245खेचरे, 435उंट आणि 6720 गाढवे होती.
  • 69
  • 70 घराण्यांच्या काही प्रमुखानी कामाला हातभार म्हणून पैसे दिले. राज्यपालने एकोणिस पौंड सोने भांडाराला दिले. शिवाय पन्नास वाडगे आणि याजकांसाठी 530 वस्त्रे दिली.
  • 71 घराण्याच्या प्रमुखांनी कामाला साहाय्य म्हणून भांडाराला 375पौंड सोने दिले. याखेरीज 1 1/3 टन चांदी देखील दिली.
  • 72 इतर सर्व लोकांनी मिळून 375पौंड सोने, 1 1/3 टन चांदी आणि याजकांसाठी 67वस्त्रे दिली.
  • 73 अशाप्रकारे याजक, लेवींच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्राएल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले. आणि सातव्या महिन्यापर्यंत सर्व इस्राएल लोक स्वत:च्या गावांमध्ये स्थिरस्थावर झाले.