wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


गणना धडा 3
  • 1 परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ अशी:
  • 2 अहरोनाला चार मुलगे होते. नादाब हा थोरला मुलगा, त्यानंतरचे अबीहू, एलाजार व इथामार.
  • 3 अहरोनाचे हे मुलगे याजक ह्यां नात्याने परमेश्वराची पवित्र सेवा करण्यासाठी निवडले होते व त्यांचा अभिषेक करण्यात आला होता;
  • 4 परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात मरण पावले. त्यांनी परमेश्वराकरिता यज्ञ अर्पण केला परंतु त्यासाठी त्यांनी परमेशवराला मान्य नसलेल्या प्रकारे अग्नीचा उपयोग केला. त्यांना मुलगे नव्हते म्हणून एलाजार व इथामर हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.
  • 5 परमेशवर मोशेला म्हणाला,
  • 6 “लेवी वंशातील सर्व लोकांना अहरोन याजकाकडे आण म्हणजे ते त्याचे मदतनीस होतील.
  • 7 अहरोन दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्याला मदत करतील आणि इस्राएल लोक परमेश्वराची सेवा करण्यास दर्शनमंडपात येतील तेव्हा त्या लोकांना मदत करतील.
  • 8 इस्राएल लोकांनी दर्शनमंडपातील सर्व वस्तूचे रक्षण करावे. ते त्यांचे काम आहे परंतु त्या वस्तूची निगा राखण्यामुळे लेवी लोक इस्राएल लोकांची मदत करतील. पवित्रनिवास मंडपात त्यांनी ह्याप्रकारे सेवा करावी.
  • 9 “लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या ताब्यात दे. त्यांना सर्व इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची मदत करण्यासाठी निवडले आहे.
  • 10 “अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी दुसरा पवित्र वस्तूच्याजवळ येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करु लागला तर त्याला जिवे मारावे.”
  • 11 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला,
  • 12 “इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील तेव्हा आता इतर इस्राएल लोकांना त्यांचे प्रथम जन्मलेले मुलगे मला द्यावे लागणार नाहीत.
  • 13 “जेव्हा तुम्ही मिसर देशात होता तेव्हा त्या मिसरच्या लोकांचे प्रथम जन्मलेले मुलगे मी मारुन टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी घेतले. ते माझेच आहेत. परंतु तुमची प्रथम जन्मलेली मुले तुमचीच राहातील व फकत लेवी माझे होतील. मी परमेश्वर आहे.”
  • 14 परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला,
  • 15 “लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.”
  • 16 म्हणून मोशेने देवाची आज्ञा मानून त्यांची गणती केली.
  • 17 लेवीला गेर्षोन, कहाथ व मरारी नांवाचे तीन मुलगे होते.
  • 18 प्रत्येक मुलगा अनेक कुळांचा पुढारी होता. गेर्षोनाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे; लिब्नी व शिमी.
  • 19 कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल.
  • 20 मरारीचे मुलगे त्यांच्या कुळाप्रमाणे हे: माहली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.
  • 21 गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे.
  • 22 ह्या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते.
  • 23 गेर्षोने कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासस्थानाच्या मागे आपले डेरे ठोकले.
  • 24 लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता.
  • 25 दर्शन मंडपातील पवित्र निवास मंडप, बाह्य मंडप आणि आच्छादन यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले. दर्शन मंडपाच्या प्रवेश द्वारावरील पडद्याचीही निगा त्यांच्यावर सोपवली होती.
  • 26 पवित्र निवास मंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान ह्यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
  • 27 कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उजीयेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
  • 28 हया कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले.
  • 29 त्यांना पवित्र निवास मंडपाचा दक्षिणेकडचा भाग देण्यात आला, तेव्हा तेथे त्यांनी आपली छावणी उभारली.
  • 30 उजीयेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता.
  • 31 पवित्र कराराचा कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या, पवित्र मंडपात सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व सामान ह्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
  • 32 अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपविले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.
  • 33 मरारीपासून माहली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे.
  • 34 ह्या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वचाये मुलगे व पुरुष सहा हजार दोनशें होते.
  • 35 अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. ह्या कुळांना पवित्र निवास मंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपल छावणी ठोकली.
  • 36 मरारीवंशातील लोकांना पवित्र निवास मंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
  • 37 तसेच पवित्र निवास मंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका-उथळ्या-मेखा आणि तणाव्याचे दोर ह्यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.
  • 38 मोशे, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवास मंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्याला जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.
  • 39 लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष ह्यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीयांची एकूण संख्या बावीस हजार भरली.
  • 40 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे मुलगे व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर;
  • 41 आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले मुलगे व पुरुष घेणार नाही, त्या ऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”
  • 42 तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली.
  • 43 मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल मुलगे व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती.
  • 44 परमेश्वर मोशेला आणखी म्हणाला,
  • 45 “मी परमेश्वर तुला अशी आज्ञा देतो की इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे; आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी मी लेवी लोकांचे पशू घेतो, कारण लेवी माझे लोक आहेत.
  • 46 लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर मुलगे अधिक शिल्लक राहातात.
  • 47 त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येककडून पवित्र स्थानातील अधिकृत चलणाप्रमाणे पाच शेकेल चांदी प्रत्येकी 273जणांसाठी घे. (एक शेकेल म्हणजे वीस गेरा) इस्राएल लोकांकडून ही चांदी घे,
  • 48 व ती अहरोन व त्याच्या मुलांना दे. इस्राएल लोकांनी सोडविलेल्या दोनशें त्र्याहत्तर प्रथम जन्मलेल्या लोकांनी दिलेले ते सोडवणुकीचे पैसे होत.”
  • 49 तेव्हा मोशेने त्या दोनशे त्र्याहत्तर लोकांकडून पैसे गोळा केले. ह्या दोनशेत्र्याहत्तर लोकांची जागा घेण्यास लेवी लोकाकडे कोणी उरले नव्हते.
  • 50 इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्या ह्या लोकांकडून अधिकृत पवित्र स्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशें पासष्ट शेकेल चांदी गोळा केली.
  • 51 परमेश्वराने सांगितलेले मोशेने ऐकले व त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याने ती चांदी-ते पैसे-अहरोन व त्याच्या मुलांना दिले.