wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


गणना धडा 15
  • 1 परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 2 “इस्राएल लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग.” मी तुम्हाला एक प्रदेश वस्ती करण्यासाठी देत आहे. तुम्ही जेव्हा तिथे प्रवेश कराल तेव्हा
  • 3 तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्या. त्याच्या सुवासाने परमेश्वरास आनंद होईल. तुम्ही तुमच्या गायी, मेंढ्या आणि बकऱ्या यांचा उपयोग होमार्पण यज्ञ नवस स्वखुशीने द्यावयाच्या देणाग्या किंवा नेहमीच्या यज्ञातला भाग म्हणून उपयोग कराल.
  • 4 “एखादा माणूस जेव्हा त्याची अर्पणे आणतो तेव्हा त्याने परमेश्वराला धान्यसुध्दा अर्पण केले पाहिजे. हे धान्यार्पण आठ कपसपीठ 1/4 हिंनभरतेलात मिसळून केलेले असले पाहिजे.
  • 5 प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही छोटी बकरी/कोकरु अर्पण कराल तेव्हा त्याच्याबरोबर 1/4 कप द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे.
  • 6 “जर तुम्ही मेंढा अर्पण करणार असाल तर त्याच्या बरोबर धान्यार्पणही केले पाहिजे. हे धान्यार्पण सोळा कपसपीठ 1/3 हिनतेलात मिसळून दिले पाहिजे.
  • 7 आणि तुम्ही 1/4 कप द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे. त्याच्या सुवास परमेश्वराला आनंदित करेल.
  • 8 “जेव्हा तुम्ही लहान बैल होमार्पण म्हणून अर्पण कराल किंवा शांत्यार्पण म्हणून द्याल किंवा परमेश्वराला दिलेले खास वचन म्हणून अर्पण कराल.
  • 9 तेव्हा त्या गोऱ्ह्या बरोबर तुम्ही धान्यार्पणसुध्दा आणले पाहिजे. हे धान्यार्पण 24 कपसपीठ 2 कप तेलात मिसळलेले असले पाहिजे.
  • 10 त्याच्याबरोबर 2 कप 1/2 हिनद्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे. हे अर्पण होमार्पण असेल त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील.
  • 11 तुम्ही परमेश्वराला जो बैल, मेंढा, मेंढी किंवा बकरी यांचे अर्पण कराल ते याप्रमाणे तयार करायला पाहिजे.
  • 12 तुम्ही जो प्राणी अर्पण कराल त्या प्रत्येका बरोबर हे ही अर्पण करा.
  • 13 “अशाप्रकारे इस्राएलच्या प्रत्येक नागरिकाने परमेश्वराला आनंदित करण्यासाठी होमार्पण केले पाहिजे.
  • 14 परदेशी लोक तुमच्यातच राहतील. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी त्यांनीही या प्रमाणेच होमार्पण केले पाहिजे.
  • 15 हेच नियम सर्वाना लागू आहेत. इस्राएलचे लोक आणि परदेशी लोक तुमच्या देशात राहतात. त्यांना हे नियम सर्वकाळ लागू राहतील. तुम्ही आणि तुमच्याबरोबर राहणारे इतर लोक परमेश्वरापुढे समान आहात.
  • 16 याचा अर्थ असा की तुम्ही सारख्याच नियमाचे व विधींचे पालन केले पाहिजे. हे नियम व विधी इस्राएल लोकांसाठी आणि तुमच्यात राहणाऱ्या इतर लोकांसाठी आहेत.”
  • 17 परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 18 “इस्राएल लोकांना या गोष्टी सांग: मी तुम्हाला दुसऱ्या प्रदेशात नेत आहे.
  • 19 जेव्हा तुम्ही तेथे पिकणारे अन्न खाल तेव्हा त्यातला थोडा भाग परमेश्वराला अर्पण करा.
  • 20 तुम्ही धान्य गोळा करुन ते दळाल आणि त्याचे भाकरीसाठी पीठ कराल. त्या पिठाचा पहिला भाग तुम्ही नेहमी परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. हे मळणीच्या वेळी धान्यार्पण करतात त्याप्रमाणे हे अर्पण केले पाहिजे.
  • 21 हा नियम सर्वकाळ राहील. त्या पीठाचा पहिला भाग तुम्ही नेहमी परमेश्वराला अर्पण केला पाहिजे.
  • 22 “जर तुम्ही काही चूक केली आणि परमेश्वराने मोशेला दिलेल्या एखाद्या आज्ञेचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल?
  • 23 परमेश्वराने त्या आज्ञा तुम्हाला मोशे मार्फत दिल्या आहेत ज्या दिवसापासून त्या दिल्या तेव्हापासून त्या लागू आहेत. आणि त्या सदैव राहतील.
  • 24 तेव्हा जर तुम्ही चूक केलीत आणि या आज्ञांचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल? जर इस्राएलच्या सर्व लोकांनी मिळून चूक केली तर त्यानी सर्वांनी मिळून एक गोऱ्हा परमेश्वराला होमार्पण केला पाहिजे. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. गोऱ्ह्याबरोबर धान्यार्पण आणि पेयार्पण करायला पाहिजे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण केला पाहिजे.
  • 25 “म्हणून याजकाने लोकांना शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. त्याने या गोष्टी इस्राएलच्या सर्व लोकांसाठी केल्या पाहिजेत. ते पाप करीत आहेत हे लोकांना माहित नव्हते. पण जेव्हा ते त्यांना समजेल तेव्हा त्यांनी परमेश्वरासाठी भेट आणली. त्यांनी होमार्पण आणि पापार्पण आणले म्हणून लोकांना क्षमा केली जाईल.
  • 26 इस्राएलाच्या सर्व लोकांना आणि त्यांच्यात राहणाऱ्या इतर लोकांना क्षमा केली जाईल. त्यांना क्षमा करण्यात येईल. कारण आपण चूक करीत आहोत हे त्यांना माहीत नव्हते.
  • 27 “पण जर फकत एकाच माणसाने चूक केली तर त्याने एक वर्ष वयाची बकरी आणली पाहिजे. ती बकरी पापासाठी अर्पण केली जाईल.
  • 28 याजक त्या माणसाला शुद्ध करण्यासाठी काही गोष्टी करील. त्या माणसाने चूक केली आणि परमेश्वरापुढे पाप केले. पण याजकाने त्याला शुद्ध केले तर त्याला क्षमा केली जाईल.
  • 29 जो माणूस चूक करतो आणि पाप करतो त्याच्यासाठी हा नियम आहे. इस्राएलच्या कुटुंबात जन्मलेल्या लोकांसाठी व तुमच्या घरात राहणाऱ्या परदेशी लोकांसाठी सारखेच नियम आहेत.
  • 30 पण जर एखाद्याने पाप केले आणि आपण चूक करीत आहो हे त्याला कळत असले, तर तो माणूस परमेश्वराविरुद्ध आहे. त्या माणसाला त्याच्या लोकांपासून वेगळे काढून टाकले पाहिजे. इस्राएलाच्या वंशात जन्मलेल्या माणसासाठी किंवा तुमच्यात राहणाऱ्या परदेशी माणसासाठी सारखाच नियम आहे.
  • 31 परमेश्वराचा शब्द महत्वाचा आहे असा विचार त्या माणसाने केला नाही आणि त्याने परमेश्वराची आज्ञा मोडली. तर त्या माणसाला तुमच्या समूहापासून वेगळे केलेच पाहिजे. तो माणूस अपराधी आहे आणि त्याला शिक्षा झालीचपाहिजे.”
  • 32 या वेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात रहात होते. एका माणसाला जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथचा दिवस होता. इतरांनी त्याला ते करताना पाहिले.
  • 33 ज्या लोकांनी त्याला लाकडे गोळा करताना पाहिले त्यांनी त्याला मोशे व अहरोनाकडे आणले आणि सर्व लोक भोवती गोळा झाले.
  • 34 त्यांनी त्या माणसाला तिथेच ठेवले कारण त्याला काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.
  • 35 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तो माणूस मेला पाहिजे. तेव्हा सर्व लोकांनी त्याच्यावर छावणीबाहेर दगडमार करावा.”
  • 36 म्हणून लोक त्याला छावणीबाहेर घेऊन गेले आणि त्याला दगडमार करुन मारले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले.
  • 37 परमेश्वर मोशेला म्हणाला,
  • 38 “इस्राएल लोकांशी बोल. त्यांना या गोष्टी सांग: माझ्या आज्ञा तुमच्या लक्षात राहाण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी देईन. दोऱ्याचे खूपसे तुकडे एकत्र बांधा आणि ते तुमच्या कपड्याच्या एका टोकाला बांधून ठेवा. त्या प्रत्येक गोंड्याला एक निळा दोरा बांधा. या गोष्टी तुम्ही नेहमी अंगावर बाळगा.
  • 39 तुम्ही या गोंड्याकडे बघून परमेश्वराने दिलेल्या सगव्व्या आज्ञा लक्षात ठेवू शकाल. म्हणजे तुम्ही आज्ञा पाळाल. तुम्ही आज्ञा विसरुन काहीही चूक करणार नाही आणि तुमच्या शरीराला व डोव्व्यांना हव्या असलेल्या गोष्टी करणार नाही.
  • 40 माझ्या सगव्व्या आज्ञा पाळायच्या आहेत हे तुम्ही लक्षात ठेवाल. म्हणजे तुम्ही परमेश्वराचे खास लोक व्हाल.
  • 41 मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्हाला मिसर देशातून आणणारा मीच आहे. तुमचा देव होण्यासाठी मी हे केले. मीच तुमचा देव परमेश्वर आहे.”