wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


गणना धडा 27
  • 1 सलाफहाद हेफरचा मुलगा होता. हेफर गिलादचा मुलगा होता. गिलाद माखिरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. मनश्शे योसेफचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.
  • 2 या पाच स्त्रिया दर्शन मंडप प्रवेशद्वारापाशी गेल्या आणि मोशे, याजक एलाजार, पुढारी आणि इस्राएलचे लोक यांच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या.त्या पाच मुली म्हणाल्या,
  • 3 “आम्ही वाळवंटातून प्रवास करीत असताना आमचे वडील गेले. त्यांना नैसर्गिक मरण आले. ते कोरहाच्या समूहाला मिळण्यांपैकी नव्हते (कोरह हा परमेश्वराच्या विरुद्ध जाणाऱ्यापैकी होता.) पण आमच्या वडिलांना एकही मुलगा नव्हता.
  • 4 याचा अर्थ असा की आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही. आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही हे योग्य नाही. त्यांचे नाव संपून जाईन कारण त्यांना मुले नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की आमच्या वडिलांच्या भावांना जी जमीन मिळेल त्यातली थोडी आम्हाला द्या.”
  • 5 तेव्हा मोशेने परमेश्वराला त्याने काय करायला हवे ते विचारले.
  • 6 परमेश्वर त्याला म्हणाला,
  • 7 “सलाफहादच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या भावांना मिळणाऱ्या जमिनीत त्यांचाही वाटा असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या वडिलांना जी जमीन मिळाली असती ती त्यांना दे.”
  • 8 “इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: ‘जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो मेला तर त्याच्या मुलींना त्याचे सर्व काही मिळावे.
  • 9 जर त्याला मुलीही नसल्या तर त्याची मिळकत त्याच्या भावांना मिळावी.
  • 10 जर त्याला भाऊही नसला तर त्याच्या वस्तू त्याच्या वडिलांच्या भावाला मिळाव्या.
  • 11 जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याची सगळी मिळकत घरातल्या सगव्व्यात जवळच्या नातेवाईकाला मिळावी.”‘ इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेशवराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.
  • 12 नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “यार्देन नदीच्या पूर्वेकडच्या वाळवंटातील डोंगरावर जा. मी इस्राएल लोकांना जी जमीन देणार आहे ती तुला तेथे दिसेल.
  • 13 तू ही जागा बघितल्यानंतर तू तुझ्या भावाप्रमाणे. अहरोनाप्रमाणे मरशील.
  • 14 जेव्हा लोक त्सीनच्या वाळवंटात पाण्यासाठी रागावले होते तेव्हा तुम्ही दोघांनी. तू आणि अहरोनाने माझ्या आज्ञा पाळायला नकार दिला. तुम्ही मला मान दिला नाही आणि लोकांना मी पवित्र आहे असे दाखवले नाही.” (हे त्सीनच्या वाळवंटात कादेश जवळ मरिबाच्या पाण्याजवळ घडले.)
  • 15 मोशे परमेश्वराला म्हणाला,
  • 16 “लोक काय विचार करतात ते परमेश्वर देवाला कळते.
  • 17 परमेश्वरा, मी प्रार्थना करतो की तू या लोकांसाठीनेता निवडशील.”
  • 18 तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “नूनाचा मुलगा यहोशवा. तो खूप शहाणाआहे. त्याला नवीन नेता कर.
  • 19 त्याला याजक एलाजार आणि इतर लोकांसमोर उभे रहायला सांग आणि नंतर त्याला नेता कर.
  • 20 “लोकांना असे दाखव की तू त्याला नेता करीत आहेस. नंतर सर्व लोक त्याच्या आज्ञा पाळतील.
  • 21 जर यहोशवाला काही निर्णय घ्यायचे असतील तर तो याजक एलाजारकडे जाईल. एलाजार उरीमचा उपयोग करुन परमेशवराचे उत्तर माहीत करुन घेईल. नंतर यहोशवा आणि इस्राएलचे सर्व लोक देवाच्या सांगण्याप्रमाणे करतील. जर तो म्हणेल की, ‘युद्ध करा,’ तर ते युद्ध करतील. आणि त्याने सांगितले की ‘घरी जा’, तर ते घरी जातील.”
  • 22 मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली. त्याने यहोशवाला एलाजारच्या आणि लोकांच्या पुढे उभे राहाण्यास सांगितले.
  • 23 नंतर मोशेने तो नवीन नेता आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या डोक्यावर आपले हात ठेवले. परमेश्वराने त्याला जसे सांगितले होते तसेच त्याने केले.