wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


गणना धडा 32
  • 1 रऊबेन आणि गाद या घराण्यांकडे खूप गायी होत्या. त्यांनी याजेर व गिलाद येथील जमिनी पाहिल्या. ही जमीन आपल्या गायींसाठी चांगली आहे असे त्यांना वाटले.
  • 2 म्हणून रऊबेन व गाद यांच्या घराण्यातील लोक मोशेकडे आले. ते मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी यांच्याशी बोलले.
  • 3 ते म्हणले, “आम्ही तुमचे गुलाम आहोत. आमच्याकडे खूप गायी आहेत आणि इस्राएलच्या लोकांसाठी देवाने जी जमीन जिंकली ती खूप चांगली आहे. या जमिनीत अटारोथ, दीबोन, याजेर, निम्रा, हेशबोन, एलाले, सबाम, नबो व बौन यांच्या आसपास असलेल्या प्रदेशाचा समावेश होतो.
  • 4
  • 5 जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तो प्रदेश आम्हाला देण्यात यावा असे आम्हाला वाटते. आम्हाला यार्देन नदीच्या पलिकडे नेऊ नका.”
  • 6 रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांना मोशे म्हणाला, “स्वत: इथे राहून तुम्ही तुमच्या भावाना लढायला पाठवाल का?
  • 7 तुम्ही इस्राएल लोकांना का निरूत्साहित करीत आहात? तुम्ही त्यांना नदी पार करण्याच्या इच्छेपासून परावृत कराल आणि परमेश्वराने त्यांना दिलेली जमीन तुम्ही घ्याल.
  • 8 तुमच्या वाडवडिलांनी हीच गोष्ट माझ्याबाबतीत केली होती. कादेश-बर्ण्याला मी काही हेरांना जमीन बघण्यासाठी पाठवले.
  • 9 ते लोक अष्कोल खोऱ्यापर्यंत गेले. त्यांनी जमीन बघितली आणि त्या लोकांनी इस्राएल लोकांना परमेश्वराने दिलेल्या प्रदेशात जाण्याच्या इच्छेपासून परावृत केले.
  • 10 परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. परमेश्वराने ही शपथ घेतली:
  • 11 ‘मिसर देशातून आलेल्या 20 वर्षांवरील कुठल्याही माणसाला हा प्रदेश बघू दिला जाणार नाही. मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांना वचन दिले होते. त्याना मी ही जमीन द्यायचे कबूल केले होते. परंतु त्यांनी मला मनापासून अनुसरले नाही. म्हणून त्यांना हा प्रदेश मिळणार नाही.
  • 12 फक्त यफुन्नेचा मुलगा कारेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा हे मनापासून परमेश्वराला अनुसरले.”
  • 13 “परमेश्वर इस्राएल लोकांवर खूप रागावला होता. म्हणून परमेशवराने त्यांना 40 वर्षे वाळवंटात ठेवले. ज्या लोकांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले त्या लोकांना परमेश्वराने मरण येईपर्यंत तिथे ठेवले.
  • 14 आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का?
  • 15 जर तुम्ही परमेश्वराची भक्ति करायचे सोडले तर परमेश्वर इस्राएल लोकांना अधिक काळ वाळवंटात ठेवील आणि नंतर तुम्ही त्या सर्व लोकांचा नाश कराल.”
  • 16 पण रऊबेनच्या आणि गादच्या घराण्यातील लोक मोशेकडे गेले. ते म्हणाले, “आम्ही या जागेवर आमच्या मुलांसाठी शहरे आणि आमच्या जनावरांसाठी गोठे उभारू.
  • 17 त्यामुळे आमची मुले या ठिकाणी राहाणाऱ्या इतर लोकांपासून सुरक्षित राहतील. पण आम्ही इस्राएलच्या इतर लोकांना मदत करण्यासाठी आनंदाने येऊ. आम्ही त्यांना त्यांच्या प्रदेशात आणू.
  • 18 इस्राएलमधल्या प्रत्येकाने त्याच्या वाट्याची जमीन घेतल्याशिवाय आम्ही परत येणार नाही.
  • 19 यार्देन नदीच्या पश्चिमेकडची कुठलीही जमीन आम्ही घेणार नाही. आमच्या वाट्याची जमीन यार्देन नदीच्या पूर्वेला आहे.”
  • 20 तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर हा प्रदेश तुमचा होईल. परंतु तुमच्या सैनिकांनी परमेश्वरासमोर लढाईत उतरले पाहिजे.
  • 21 तुमच्या सैन्याने यार्देन नदी पार करून शत्रु सैन्याला या प्रदेशातून हाकलले पाहीजे.
  • 22 सगळा प्रदेश घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मदत केली की तुम्ही घरी जाऊ शकता. नंतर परमेश्वराला आणि इस्राएलला तुम्ही पापी आहात असे वाटणार नाही. नंतर परमेश्वर तुम्हाला ही जमीन देईल.
  • 23 पण जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हाला शासन होईल याची खात्री बाळगा.
  • 24 तुमच्या मुलांसाठी शहरे बसवा आणि जनावरांसाठी गोठे बांधा. पण तुम्ही वचन दिल्याप्रमाणे सारे काही करा.”
  • 25 नंतर रऊबेन आणि गादच्या कुटुंबातील लोक मोशेला म्हणाले, “आम्ही तुझे नोकर आहोत. तू आमचा मालक आहेस म्हणून तू जे सांगतोस ते आम्ही करु.
  • 26 आमच्या बायका, मुले आणि आमची सर्व जनावरे गिलाद शहरात राहतील.
  • 27 पण आम्ही, तुझे नोकर यार्देन नदी पार करु. आम्ही परमेश्वरापुढे लढाईस जाऊ. जसे आमचा धनी सांगत आहे.”
  • 28 याप्रमाणे त्यांनी वचन दिले. ते मोशे, याजक एलाजार, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलचे सर्व कुटुंबप्रमुख या सर्वांनी ते ऐकले.
  • 29 मोशे त्यांना म्हणाला, “गाद आणि रऊबेनचे लोक यार्देन नदी पार करतील. ते लढाईत परमेश्वराच्या पुढे चालतील. ते तुम्हाला प्रदेश जिंकायला मदत करतील आणि तुम्ही गिलादचा प्रदेश त्यांच्या वाटेचा भाग म्हणून द्याल.
  • 30 पण ते तुमच्या सैन्याबरोबर जाण्यात अपयशी ठरले तर कनानमध्ये तुमच्यामध्ये त्यांना जमीन मिळेल.”
  • 31 गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले. “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.
  • 32 आम्ही यार्देन नदी पार करु आणि लढाईत परमेश्वरापुढे कनानच्या प्रदेशात जाऊ. आमच्या देशाचा प्रदेश यार्देन नदीच्या पूर्वेला आहे.”
  • 33 तेव्हा मोशेने ती जमीन गादच्या, रऊबेनच्या लोकांना आणि मनश्शेच्या कुटुंबातील अर्ध्या लोकांना दिली. (मनश्शे योसेफचा मुलगा होता.) त्या प्रदेशात अमोऱ्याचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्या राज्याचा त्या भूमीत समावेश होता. त्यांत आजुबाजूच्या प्रदेशातील शहरे होती.
  • 34 गादच्या लोकांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,
  • 35 अटारोथ-शोफान, याजेर यागबहा,
  • 36 बेथनिम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.
  • 37 रऊबेनच्या लोकांनी हेशबोन, एलाले, किर्याथाईम.
  • 38 नबो व बाल-मौन आणि सिबमाह ही शहरे वसवली. त्यांनी पुन्हा वसवलेल्या शहरांना जुनीच नावे दिली. पण नेबो आणि बाल-मोनचे नांव त्यांनी बदलले.
  • 39 माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादला गेले (माखीर मनश्शेचा मुलगा होता.) त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या आमोरी लोकांचा त्यांनी पराभव केला.
  • 40 मोशेने गिलाद मनश्शेच्या कुटुंबातील माखीरला दिले. म्हणून त्याचे कुटुंब तेथे राहिले.
  • 41 मनश्शेच्या कुटुंबातील याईर याने छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्यांना याईरची शहरे असे म्हटले.
  • 42 नोबहने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.