wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


नीतिसूत्रे धडा 24
  • 1 वाईट लोकांचा मत्सर करु नका. त्यांच्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका.
  • 2 ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात.
  • 3 चांगली घरे शहाणपण आणि समजूतदारपणा यावर आधारलेली असतात.
  • 4 आणि सर्व मौल्यवान आणि प्रसन्न करणाऱ्या संपत्तीने खोल्या भरल्या जातात.
  • 5 शहाणपण माणसाला अधिक सामर्थ्यवान बनवते. ज्ञान माणसाला शक्ती देते.
  • 6 युध्द सुरु करण्याआधी तुम्ही काळजीपूर्वक योजना आखली पाहिजे. तुम्हाला जर (युध्द) जिंकायचे असेल तर तुम्हाला अनेक चांगले मार्गदर्शक हवेत.
  • 7 मूर्ख लोकांना शहाणपण कळू शकत नाही. आणि लोक जेव्हा महत्वाच्या गोष्टींची चर्चा करतात तेव्हा मूर्ख माणूस काहीही बोलू शकत नाही.
  • 8 जर तुम्ही नेहमी त्रास देण्याच्याच योजना आखत असाल तर लोकांना तुम्हीच त्रास देणारे आहात हे कळेल आणि ते तुमचे ऐकणार नाहीत.
  • 9 मूर्ख माणूस ज्या गोष्टी करायच्या ठरवतो ते पाप असते. जो स्वत: ला इतरांपेक्षा चांगला समजतो त्याचा लोक तिरस्कार करतात.
  • 10 जर तुम्ही संकटाच्या वेळी दुर्बल असाल तर तुम्ही खरोखरच दुर्बल आहात.
  • 11 जर लोक एखाद्याला ठार मारण्याचे ठरवीत असतील तर तुम्ही त्याला वाचवायला हवे.
  • 12 “माझा त्याच्याशी काही संबंध नाही” असे तुम्ही म्हणू शकत नाही. परमेश्वराला सर्व माहीत असते. आणि तुम्ही काही गोष्टी का करता ते त्याला माहीत असते. परमेश्वर तुमच्यावर लक्ष ठेवतो. त्याला सर्व कळते. आणि तुम्ही ज्या गोष्टी करता त्याबद्दल परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल.
  • 13 मुला, मध खा, तो चांगला असतो. मधाच्या पोळ्यामधला मध गोड असतो.
  • 14 त्याचप्रमाणे शहाणपण तुमच्या आत्म्यासाठी चांगले असते. तुमच्या जवळ शहाणपण असेल तर तुमच्या जवळ आशाही असेल आणि तुमची आशा कधीही मावळणार नाही.
  • 15 चांगल्या माणसाकडून काही चोरु पाहणाऱ्या किंवा त्याचे घर बळकावू पहाणाऱ्या चोरासारखे होऊ नका.
  • 16 चांगला माणूस जर सात वेळा पडला तर तो पुन्हा उभा राहतो. पण वाईट लोकांचा संकटात नेहमी पराभव होईल.
  • 17 तुमचा शत्रू संकटात असतो तेव्हा आनंद मानू नका. तो पडतो तेव्हा आनंदून जाऊ नका.
  • 18 जर तुम्ही तसे केलेत तर परमेश्वर ते बघेल आणि परमेश्वराला तुमच्याविषयी आनंद वाटणार नाही. नंतर परमेश्वर कदाचित् तुमच्या शत्रूला मदत करील.
  • 19 दुष्ट लोकांना तुम्हाला तुम्हाला काळजीत पडायला लावू देऊ नका आणि दुष्टांचा मत्सर करु नका.
  • 20 या दुष्ट लोकांना आशा नसते. त्यांचा प्रकाश काळोख होईल.
  • 21 मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस.
  • 22 का? कारण त्या प्रकारच्या माणसांचा लगेच नाश होऊ शकतो. देव आणि राजा त्यांच्या शत्रूंसाठी किती संकटे निर्माण करु शकतात हे तुम्हाला माहीत नाही.
  • 23 हे शहाण्या माणसाचे शब्द आहेत. न्यायाधीशाने अगदी न्यायी असले पाहिजे. एखादा माणूस त्याच्या माहितीतला आहे म्हणून त्याला त्याने पाठिंबा देऊ नये.
  • 24 जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला ‘तू जाऊ शकतोस’ असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील.
  • 25 पण जर न्यायाधीशाने अपराध्याला शासन केले तर सर्व लोक आनंदी होतील.
  • 26 खरे उत्तर सर्वांना आनंदी करते. ते ओठावरच्या चुंबनासारखे वाटते.
  • 27 शेतात पेरणी करण्याआधी तुमचे घर बांधू नका. धान्य पिकवण्याची तुमची तयारी आहे याची आधी खात्री करा. मग घर बांधा.
  • 28 काही चांगले कारण असल्याशिवाय कुणाच्याही विरुध्द बोलू नका. खोटे सांगू नका.
  • 29 “त्याने मला दु:ख दिले म्हणून मीही त्याला तसेच करीन. त्याने मला त्रास दिला म्हणून मी त्याला शिक्षा करीन.” असे म्हणू नका.
  • 30 मी आळशी माणसाच्या शेताजवळून जात होतो. मी शहाणा नसलेल्या माणसाच्या द्राक्षाच्या मळ्याजवळून जात होतो. त्या
  • 31 शेतात सगळीकडे तण माजले होते. क्षुल्लक वनस्पती तिथे वाढत होत्या. आणि शेताभोवतालची भिंत तुटली होती आणि पडायला आली होती.
  • 32 मी ते बघितले आणि त्याचा विचार करु लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.
  • 33 “थोडीशी झोप, थोडी विश्रांती, हाताची घडी आणि वामकुक्षी.”
  • 34 या गोष्टी तुम्हाला लवकरच गरीब करतील. तुमच्याकडे काहीही नसेल चोर घर फोडून घरात आला आणि सारे काही घेऊन गेल्यासारखे ते असेल.