- 1 देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो.
- 2 म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही.
- 3 समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हा ही आम्हाला भीती वाटत नाही.
- 4 एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्वशक्तिमान देवाच्या सर्वांत पवित्र शहरात सुख - समृध्दी आणतात.
- 5 देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल.
- 6 जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.
- 7 तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या बरोबर आहे. याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे.
- 8 परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ, तो पृथ्वीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ.
- 9 परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.
- 10 देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”
- 11 तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.
Psalms 046
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 46