- 1 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
- 2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे. त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे. हे त्या महान राजाचे शहर आहे.
- 3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत देवाला किल्ला म्हणतात.
- 4 एकदा काही राजे भेटले. त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली ते सगळे चालून आले.
- 5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते घाबरले आणि पळत सुटले.
- 6 भयाने त्यांना घेरले, भीतीने त्यांचा यरकाप झाला.
- 7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
- 8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात, आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले. देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
- 9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
- 10 देवा तू प्रसिध्द आहेस. पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
- 11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
- 12 सियोन भोवती फिरा, शहर बघा, बुरुज मोजा.
- 13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवा्याचे कौतुक करा. नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
- 14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल. तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
Psalms 048
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 48