wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


स्तोत्रसंहिता धडा 68
  • 1 देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
  • 2 तुझे वैरी वाऱ्यावर दूरवर जाणाऱ्या धुरासारखे दूरवर जावोत. आगीत वितळणाऱ्या मेणाप्रमाणे तुझ्या वैऱ्यांचा सर्वनाश होवो.
  • 3 परंतु चांगले लोक आनंदात आहेत. चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो. चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात.
  • 4 देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव यादे आहे. त्याच्या नावाची स्तुती करा.
  • 5 देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो. तो विधवांची काळजी घेतो.
  • 6 देव एकाकी लोकांना घर देतो, देव त्याच्यामाणसांना तुंरुगातून बाहेर काढतो, ते फार आनंदी आहेत. परंतु जे लोक देवाच्या विरुध्द जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहातील.
  • 7 देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस. तू वाळवंटातून चालत गेलास.
  • 8 आणि भूमी थरथरली. देव, इस्राएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले.
  • 9 देवा, थकलेल्या जीर्ण झालेल्या भूमीला पुन्हा शक्ती येण्यासाठी तू पाऊस पाठवलास.
  • 10 तुझे प्राणी पुन्हा त्या ठिकाणी आले. देवा, तू तिथल्या गरीब लोकांना बऱ्याच चांगल्या वस्तू दिल्यास.
  • 11 देवाने आज्ञा केली आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले.
  • 12 शक्तिमान राजांची सैन्ये पळून गेली. सैनिकांनी युध्दातून घरी आणलेल्या वस्तूंची विभागणी बायका घरी करतील. जे लोक घरीच राहिले होते ते ही संपत्तीत वाटा घेतील.
  • 13 त्यांना कबुतराचे चांदीने मढवलेले पंख मिळतील. त्यांना सोन्याने मढवलेले आणि चकाकणारे पंख मिळतील.
  • 14 देवाने साल्मोन डोंगरावर शत्रूंच्या राजाची दाणदाण उडवली त्यांची अवस्था पडणाऱ्या हिमासाखी झाली.
  • 15 बाशानचा पर्वत उंच सुळके असेलला मोठा पर्वत आहे.
  • 16 बाशान, तू सियोन पर्वताकडे तुच्छेतेने का पाहतोस? देवाला तो पर्वत (सियोन) आवडतो. परमेश्वराने कायमचे तिथेच राहाणे पसंत केले.
  • 17 परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.
  • 18 तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.
  • 19 परमेश्वराची स्तुती करा. तो रोज आपल्याला आपले ओझे वाहायला मदत करतो देव आपल्याला तारतो.
  • 20 तो आपला देव आहे आपल्याला तारणारा तोच तो देव आहे. परमेश्वर, आपला देव आपल्याला मरणापासून वाचवतो.
  • 21 देवाने त्याच्या शत्रूंचा पराभव केला हे तो दाखवून देईल.जे त्याविरुध्द लढले. त्यांना देव शिक्षा करील.
  • 22 माझा धनी म्हणाला, “मी शत्रूला बाशान पर्वतावरुन परत आणीन. मी शत्रूला पश्चिमेकडून परत आणीन.
  • 23 म्हणजे तुम्हाला त्यांच्या रक्तातून चालत जाता येईल. तुमच्या कुत्र्यांना त्यांचे रक्त चाटता येईल.”
  • 24 विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात. माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.
  • 25 गायक वाजत गाजत पुढे येतील. नंतर तरुण मुली खांजिऱ्या वाजवतील. त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील.
  • 26 मोठ्या मंडळात देवाचा जय जयकार करा. इस्राएलाच्या लोकांनो परमेश्वराची स्तुती करा.
  • 27 छोटा बन्यामीन त्यांचे नेतृत्व करीत आहे आणि तेथे यहूदाचे मोठे कुटुंब जबुलूनाचे नेते आणि नफतालीचे नेते आहेत.
  • 28 देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव. तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव.
  • 29 राजे त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणतील, तुझ्या यरुशलेममधील प्रासादात ती आणतील.
  • 30 त्या “प्राण्यानी” तुला हवे ते करावे म्हणून तू तुझ्या काठीचा उपयोग करत्या देशातील “बैलांना” आणि “गायींना” तुझ्या आज्ञेचे पालन करायला लाव. तू त्या देशांचा युध्दात पराभव केला आहेस आता त्यांना तुझ्यासाठी चांदी आणायला सांग.
  • 31 त्यांना मिसरमधून संपत्ती आणायला सांग देवा, इथिओपियातल्या लोकांना त्यांची संपत्ती तुझ्याकडे आणायला भाग पाड.
  • 32 पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतिगीत गा.
  • 33 देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो, त्याचा जोरदार आवाज ऐका.
  • 34 तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे. इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना अधिक शक्तिमान बनवतो.
  • 35 देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.