- 1 आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा.
- 2 संगीताची सुरुवात करा. डफ वाजवा. सतार आणि वीणा वाजवा.
- 3 अमावास्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. याचवेळी आपला सण सुरु होतो.
- 4 हा इस्राएल देशाचा नियम आहे. देवाने याकोबाला हीच आज्ञा केली.
- 5 जेव्हा देवाने त्याला मिसरमधून दूर नेले तेव्हा त्याने योसेफाबरोबर हा करार केला. मिसरमध्येच आम्ही आम्हाला न समजणारी भाषा ऐकली.
- 6 देव म्हणतो, “मी तुमच्या खांद्यावरचे ओझे उचलले. तुमच्या खांद्यावरची कामगाराची टोपली तुम्हाला टाकायला लावली.
- 7 तुम्ही लोक संकटात होता. तुम्ही मदतीसाठी हाका मारल्या आणि मी तुमची मुक्तता केली. मी वादळी ढगात लपलो होतो आणि मी तुम्हाला उत्तर दिले. मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.”
- 8 “लोकहो! माझे ऐका, मी तुम्हाला माझा करार देईन इस्राएल कृपा करुन माझे ऐक.
- 9 परदेशी लोक ज्या चुकीच्या देवाची पूजा करतात त्यापैकी कुठल्याही देवाची पूजा करु नकोस.
- 10 मी, परमेश्वरच तुमचा देव आहे मी तुम्हाला मिसरच्या प्रदेशातून बाहेर आणले. इस्राएल, तुझे तोंड उघड मग मी तुला खायला घालीन.”
- 11 “परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही.
- 12 म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले. इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले.
- 13 जर माझ्या लोकांनी माझे ऐकले, जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला,
- 14 तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन. जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन.
- 15 परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील. त्यांना कायमची शिक्षा होईल.
- 16 देव त्याच्या माणसांना सगळ्यात चांगला गहू देईल. देव त्याच्या माणसांना त्यांचे समाधान होईपर्यंत मध देईल.”
Psalms 081
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 81