- 1 परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात.
- 2 परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
- 3 अग्री परमेश्वराच्या पुढे जातो आणि शत्रूंचा नाश करतो.
- 4 त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घाबरतात.
- 5 परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात.
- 6 आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
- 7 लोक त्यांच्या मूर्तीची पूजा करतात. ते त्यांच्या “देवाला” नावजतात. परंतु त्या लोकांना लाज वाटेल. त्यांचे “देव” परमेश्वरापुढे झुकतील आणि त्याची प्रार्थना करतील.
- 8 सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.
- 9 परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
- 10 जे लोक परमेश्वरावर प्रेम करतात त्यांना वाईट गोष्टी आवडत नाहीत म्हणून देव त्याच्या लोकांना वाचवतो. देव त्याच्या भक्तांना दुष्टांपासून वाचवतो.
- 11 चांगल्या लोकांवर प्रकाश आणि सुख चमकते.
- 12 चांगल्या माणसांनो, परमेश्वरात आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला मान द्या.
Psalms 097
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 97