- 1 परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 2 देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 3 परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 4 देवाची, जो एकमेव अद्भुत चमत्कार करतो त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 5 ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 6 देवाने समुद्रावर शुष्क जमीन ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 7 देवाने मोठा प्रकाश निर्माण केला. त्याचे प्रेम सदैव असते.
- 8 दिवसावर राज्य करण्यासाठी देवाने सूर्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 9 देवाने रात्रीवर राज्य करण्यासाठी चंद्र आणि चांदण्यांची निर्मिती केली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 10 देवाने मिसरमध्ये जन्मलेल्या पहिल्या पुरुषांना आणि प्राण्यांना मारले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 11 देवाने इस्राएलला मिसरमधून बाहेर काढले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 12 देवाने त्याची महान शक्ती आणि बळ दाखविले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 13 देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 14 देवाने इस्राएलला समुद्रामधून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 15 देवाने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात बुडवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 16 देवाने त्याच्या माणसांना वाळवंटातून नेले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 17 देवाने शक्तिशाली राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 18 देवाने बलवान राजांचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 19 देवाने अमोऱ्यांच्या सिहोन राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 20 देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 21 देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 22 देवाने ती जमीन इस्राएलला नजराणा म्हणून दिली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 23 आमचा पराभव झाला तेव्हा देवाने आमची आठवण ठेवली. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 24 देवाने आम्हाला आमच्या शत्रूंपासून वाचवले. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 25 देव प्रत्येक माणसाला अन्न देतो. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
- 26 स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
Psalms 136
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 136