- 1 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव दुष्टांपासून माझे रक्षण कर.
- 2 ते लोक वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत आहेत. ते लोक नेहमी भांडणाला सुरुवात करतात.
- 3 त्यांच्या जिभा विषारी सापासारख्या आहेत. जणु काही त्यांच्या जिभेखाली सापाचे विष आहे.
- 4 परमेश्वरा, मला दुष्ट लोकांपासून वाचव. वाईट लोकांपासून माझे रक्षण कर. ते लोक माझा पाठलाग करतात, आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात.
- 5 त्या गर्विष्ठ लोकांनी माझ्यासाठी सापळा रचला. त्यांनी मला पकडण्यासाठी जाळे पसरले. त्यांनी माझ्या मार्गात सापळा लावला.
- 6 परमेश्वरा, तू माझा देव आहेस. परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.
- 7 परमेश्वरा, तू माझा बलदंड प्रभु आहेस. तू माझा रक्षणकर्ता आहेस. लढाईत माझे डोके वाचवणाऱ्या शिरस्त्राणासारखा तू आहेस.
- 8 परमेश्वरा, त्या दुष्ट लोकांच्या इच्छापूर्ण होऊ देऊ नकोस. त्यांच्या योजना यशस्वी होऊ देऊ नकोस.
- 9 परमेश्वरा, माझ्या शत्रूंना जिंकू देऊ नकोस. ते लोक वाईट योजना आखत आहेत. पण त्या वाईट गोष्टी त्यांच्याच बाबतीत घडू दे.
- 10 त्यांच्या डोक्यावर निखारे ओत. माझ्या शत्रूंना आगीत फेकून दे. त्यांना वर चढून पुन्हा कधीही बाहेर येता येणार नाही अशा खड्यात फेकून दे.
- 11 परमेश्वरा, त्या खोटारड्यांना जगू देऊ नकोस. त्या वाईट लोकांचे वाईट होऊ दे.
- 12 परमेश्वर गरीब लोकांचा योग्य तऱ्हेने न्याय करील हे मला माहीत आहे. देव असहाय्य लोकांना साहाय्य करील.
- 13 परमेश्वरा चांगले लोक तुझ्या नावाची स्तुती करतील. चांगले लोक तुझी उपासना करतील.
Psalms 140
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Psalms
स्तोत्रसंहिता धडा 140