wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


जखऱ्या धडा 12
  • 1 इस्राएलबद्दल परमेश्वराचा शोकसंदेश. परमेश्वराने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. माणसात आत्मा घातला. त्याने पुढील गोष्टी सांगितल्या:
  • 2 “पाहा! मी यरुशलेमला तिच्या भोवतालच्या राष्ट्रांचा विषाचा प्याला बनवीन. ती राष्ट्रे त्या नगरीवर चढाई करुन येतील. आणि सर्वच्या सर्व यहूदाला वेढा पडेल.
  • 3 पण मी यरुशलेमला प्रचडं खडकाप्रमाणे करीन - जो तिचा कब्जा घ्यायचा प्रयत्न करील, तो स्वत:च जखमी होईल. त्या लोकांना जखमा होतील आणि ओरखडे उठतील. पण जगातील सर्व राष्ट्रे यरुशलेमच्या विरुध्द लढण्यासाठी एकत्र येतील.
  • 4 पण, त्यावेळी, मी घोड्याला विथरवीन. त्यामुळे घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी शत्रूच्या घोड्यांना अंधळे करीन. माझे डोळे मात्र उघडे असतील. आणि माझी नजर यहूद्यांच्या लोकांवर असेल.
  • 5 यहूदाचे नेते लोकांना प्रोत्साहन देतील. ते म्हणतील, “सर्व शक्तिमान परमेश्वर तुमचा देव आहे. तो आपल्याला बळ देतो.”
  • 6 त्यावेळी मी यहूद्यांच्या नेत्यांना वणव्याप्रमाणे बनवीन. वणव्यात गवताची काडी जशी भस्मसात होते, तसे ते त्यांच्या शत्रूंचा नाश करतील. त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा ते नाश करतील. यरुशलेमवासी काळजीमुक्त होतील व आराम करतील.”
  • 7 परमेश्वर, प्रथम, यहूदाच्या लोकांना वाचवील म्हणजे युरशलेममधील लोकांना फारशा बढाया मारता येणार नाहीत. यहूदातील इतर लोकांपेक्षा आम्ही फार बरे अशा बढाया दावीदच्या घराण्यातील लोकांना आणि यरुशलेममधील अन्य लोकांना मारता येणार नाहीत.
  • 8 पण परमेश्वर यरुशलेमच्या लोकांना वाचवील. सर्वात जास्त दुर्बल माणूससुध्दा दावीदासारखा वीर बनेल. आणि दावीदाच्या घराण्यातील पुरुष देवतांप्रमाणे होतील. परमेश्वराच्या स्वत:च्या दूताप्रमाणे ते लोकांचे नेतृत्व करतील.
  • 9 परमेश्वर म्हणतो, “त्यावेळी, यरुशलेमशी युध्द करण्यास आलेल्या राष्ट्रांना नाश करण्याचा मी प्रयत्न करीन.
  • 10 मी दावीदाच्या घराण्यात आणि यरुशलेममध्ये राहाणाऱ्या लोकांत करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी “एका”ला टोचले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.
  • 11 त्यावेळी यरुशलेममध्ये भंयकर शोककळा पसरेल आणि आक्रोश होईल. तो आक्रोश, मगिद्दोनच्या दरीत हदाद्रिम्मोनाच्या मृत्यूसमची झालेल्या आक्रोशासारखा असेल.
  • 12 प्रत्येक कुटुंब आपापले दु:ख व्यक्त करील. दावीदाच्या कुळातील पुरुष, बायका दु:ख करतील. नाथानाचे घराणेही दु:ख करील. त्यांच्या बायकाही दु:ख करतील.
  • 13 लेवी घराण्यातील पुरुष व बायका आपापसात शोक करतील. शिमी घराण्यातील पुरुष व बायका आपापसात शोक करतील.
  • 14 आणि इतर कुळांतही असेच घडेल. पुरुष व स्त्रिया स्वतंत्रपणे शोक करतील.”