wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 2
  • 1 रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
  • 2 दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर हे इस्राएलचे मुलगे होत.
  • 3 एर, ओनान व शेला, ही यहूदाची मुले. बथ - शूवा या कनानी स्रीपासून ही त्याला झाली. यहूदाचा पहिला मुलगा एर वाईट प्रवृत्तीचा आहे हे परमेश्वराने जाणले होते त्यामुळे एरला त्याने मारुन टाकले.
  • 4 यहूदाची सून तामार हिला पेरेस आणि जेरह हे मुलगे झाले. असे यहूदाचे हे पाच मुलगे.
  • 5 हेस्त्रोन आणि हामूल हे पेरेस चे मुलगे
  • 6 जेरहला पाच मुलगे होते. ते म्हणजे जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा (दारदा).
  • 7 जिम्रीचा मुलगा कर्मी. कर्मीचा मुलगा आखार, आखार ने युध्दात बळकावलेल्या वस्तू देवाला अर्पण करण्याऐवजी ती लूट स्वत:जवळच ठेवली. आणि इस्राएल लोकांवर पुष्कळ संकटे आणली.
  • 8 एथानाचा मुलगा अजऱ्या.
  • 9 यरहमेल, राम आणि कालेब हे हेस्रोनचे मुलगे.
  • 10 अम्मीनादाब हा रामचा मुलगा. अम्मीनादाब हा नहशोनचा पिता. नहशोन हा यहूदाच्या लोकांचा नेता होता.
  • 11 नहशोनचा मुलगा सल्मा. बवाज हा सल्माचा मुलगा.
  • 12 बवाजचा मुलगा ओबेद. आणि ओबेदचा मुलगा इशाय.
  • 13 इशायचा मुलगा अलीयाब. अलीयाब हा इशायचा पहिला पुत्र, दुसरा अबीनादाब आणि तिसरा शिमा.
  • 14 चवथा नथनेल, पाचवा रद्दाय.
  • 15 सहावा ओसेम, सातवा दावीदा.
  • 16 सरुवा आणि अबीगईल या त्यांच्या बहिणी अबीशय, यवाब आणि असाएल हे तिघे सरुवाचे मुलगे.
  • 17 अमासाची आई अबीगईल अमासाचे वडील येथेर हे इश्माएली होते.
  • 18 हेस्रोनचा मुलगा कालेब, यरियोथची मुलगी अजूबा ही कालेबची (बायको.)या दोघांना मुले झाली येशेर, शोबाब आणि अर्देान हे अजूबाचे मुलगे.
  • 19 अजूबा वारल्यानंतर कालेबने एफ्राथ हिच्याशी लग्र केले. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव हूर.
  • 20 हूरचा मुलगा उरी. ऊरीचा मुलगा बसलेल.
  • 21 पुढे, वयाच्या साठाव्या वर्षी हेस्रोनने माखीरच्या मुलीशी लग्न केले. माखीर म्हणजे गिलादचे वडील. हेस्रोन आणि माखीरची मुलगी यांच्या शरीरसंबंधातून तिने सगूब याला जन्म दिला.
  • 22 सगूबचा मुलगा याईर. याईरची गिलाद प्रांतात तेवीस नगरे होती.
  • 23 पण गशूर आणि अराम यांनी ती सर्व बळकावली. कनाथ आणि आसपासची खेडीपाडी ही त्यापैकीच. अशी एकंदर साठ खेडी होती. ती सर्व, गिलादचा बाप माखीर याच्या मुलांची होती.
  • 24 एफ्राथमधील कालेब येथे हेस्रोन मरण पावला. त्याची बायको अबीया हिला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून झालेला अशहूर हा मुलगा होता. हा अश्हूर म्हणजे तकोवाचा बाप.
  • 25 यरहमेल हा हेस्रोनचा पहिला मुलगा. राम, बुना, ओरेन, ओसेम व अहीया ही यरहमेलची मुले. राम हा त्यातला मोठा.
  • 26 यरहमेलला दुसरी बायको होती, तिचे नाव अटारा. ती ओनामची आई.
  • 27 यरहमेलाचा थोरला मुलगा राम याचे मुलगे मास, यामीन आणि एकर हे होत.
  • 28 शम्मय व यादा हे ओनामचे मुलगे. नादाब आणि अबीशूर हे शम्मयचे मुलगे.
  • 29 अबीशूराच्या बायकोचे नाव अबीहाईल. त्यांना दोन मुलगे झाले ते म्हणजे अहबान आणि मोलीद.
  • 30 सलेद आणि अप्पईम हे नादाबचे मुलगे. यापैकी सलेद निपुत्रिकच वारला.
  • 31 अप्पईमचा मुलगा इशी. इशीचा मुलगा शेशान. शेशानचा मुलगा अहलय.
  • 32 शम्मयचा भाऊ यादा याला येथेर आणि योनाथान हे दोन मुलगे होते. पैकी येथेर मुले बाळे न होताच वारला.
  • 33 पेलेथ आणि जाजा हे योनाथानचे मुलगे, ही झाली यरहमेलची वंशावळ.
  • 34 शेशानला मुलगे नव्हते, फक्त मुली होत्या. शेशानकडे मिसरचा एक नोकर होता. त्याचे नाव यरहा.
  • 35 त्याच्याशी शेशानने आपल्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव अत्ताय.
  • 36 अत्तायास नाथान नावाचा मुलगा झाला. त्याचा मुलगा जाबाद.
  • 37 जाबादचा मुलगा एफ्‌लाल, एफलाल हा ओबेदचा बाप.
  • 38 ओबेदचा मुलगा येहू, येहूचा मुलगा अजऱ्या.
  • 39 अजऱ्याने हेलसला जन्म दिला. आणि हेलसाने एलासा याला जन्म दिला.
  • 40 एलासाचा मुलगा सिस्माया, सिस्मायाचा मुलगा शल्लूम,
  • 41 शल्लूमचा मुलगा यकम्या, यकम्याचा मुलगा अलीशामा.
  • 42 कालेब हा यरहमेलचा भाऊ. कालेबलाही मुलगे झाले. त्यापैकी मेशा हा थोरला. मेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा जीफ. मारेशाचा मुलगा हेब्रोन.
  • 43 कोरह, तप्पूर, रेकेम आणि शमा हे हेब्रोनचे मुलगे.
  • 44 शमाने रहम याला जन्म दिला, रहमचा मुलगा यकर्ाम. रेकेमचा मुलगा शम्मय,
  • 45 शम्मयचा मुलगा मावोन. मावोन हा बेथसूरचा बाप.
  • 46 कालेबला एफा नावाची दासी होती. तिला हारान, मोसा, गाजेज ही मुले झाली. हारान हा गाजेजचा पिता.
  • 47 रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफा व शाफ हे यहदायचे मुलगे.
  • 48 माका ही कालेबची आणखी एक दासी. शेबेर आणि तिऱ्हना हे तिचे मुलगे.
  • 49 शाफ आणि शवा हे ही तिला झाले. शाफचा मुलगा मद्नान आणि शवाचे मुलगे मखबेना आणि गिबा. अखसा ही कालेबची मुलगी.
  • 50 कालेबची वंशावळ ही अशी आहे. होर हा कालेबचा थोरला मुलगा. हा एफ्राथला झाला. हूरचे मुलगे पुढीलप्रमाणे: किर्याथ-यारीमाचा संस्थापक शोबाल,
  • 51 बेथलहेमचा संस्थापक सल्मा आणि बेथ-गादेरचा संस्थापक हारेफ.
  • 52 किर्याथ-यारीमची मुहूर्त मेढ रोवणारा शोबाल याचे वंशज असे: हारोवे, मनुहोथमथील अर्धे लोक,
  • 53 आणि किर्याथ-यारीममधील घराणी (कुळे). इथ्री, पूथी, शमाथी आणि मिश्राई ही ती घराणी होत. त्यापैकी मिश्राईपासून सराथी आणि एष्टाबुली हे झाले.
  • 54 सल्माचे वंशज याप्रमाणे: बेथलेहेम व नटोपाथी, अटरोथ-बेथयवाब, अर्धे मानहतकर आणि सारी लोक.
  • 55 शिवाय तिराथी, शिमाथी, सुकाथी ही याबेसमध्ये राहणारी लेखनिकांची घराणी. हे नकलनवीस म्हणजे रेखाबचा संस्थापक हम्माथ याच्यापासून उत्पन्न झालेले केनी लोक होते.