wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 3
  • 1 दावीदाच्या काही मुलांचा जन्म हेब्रोन नगरात झाला. त्यांची यादी अशी: अम्रोन हा त्यातला थोरला. इज्रेल नगरातील अहीनवाम ही त्याची आई.दानीएल हा दुसरा. कर्मेल यहूदा येथील अबीगईल ही त्याची आई.
  • 2 तिसरा मुलगा अबशालोम. गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा हा मुलगा.हग्गीथचा मुलगा अदोनीया हा चवथा.
  • 3 अबीटलचा मुलगा शफाट्या हा पाचवा.दावीदाची पत्नी एग्ला हिचा इथ्रम हा सहावा.
  • 4 दावीदाच्या या सहा मुलांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले.यरुशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.
  • 5 तिथे जन्मलेली दावीदाची मुले खालीलप्रमाणे:बथशूवाला चार मुलगे झाले. बथशूवा अम्मीएलची मुलगी. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे मुलगे.
  • 6 इतर नऊ मुलगे असे: इभार, अलीशामा, एलीफलेट नोगा, नेफेग, याफीय, अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.
  • 7
  • 8
  • 9 ही सर्व दावीदाची मुले. दासीपासून झालेले आणखीही मुलगे त्याला होते. तामार ही दावीदाची मुलगी.
  • 10 शलमोनाचा मुलगा रहाबाम. त्याचा मुलगा अबीया, त्याचा मुलगा आसा. आसाचा मुलगा यहोशाफाट,
  • 11 त्याचा मुलगा योराम, योरामचा मुलगा अहज्या. अहज्याचा योवाश,
  • 12 योवाशचा मुलगा अमस्या, अमस्याचा मुलगा अजऱ्या, त्याचा मुलगा योथाम.
  • 13 योथामचा मुलगा आहाज, त्याचा मुलगा हिज्कीया, त्याचा मुलगा मनश्शे.
  • 14 मनश्शेचा मुलगा आमोन, आमोनचा योशीया.
  • 15 योशीयाचे मुलगे: थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चवथा शल्लूम.
  • 16 यहोयाकीमचे मुलगे: यखन्या आणि त्याचा मुलगा सिद्कीया.
  • 17 यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्याला झालेल्या मुलांची नावे: शलतीएल,
  • 18 मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.
  • 19 पदायाचे मुलगे याप्रमाणे: जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे मुलगे मशुल्लाम आणि हनन्या. या दोघांची बहीण शलोमीथ.
  • 20 जरुब्बाबेलाला आणखीही पाच मुले होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.
  • 21 पलट्या हा हनन्याचा मुलगा आणि पलट्याचा मुलगा यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा मुलगा ओबद्या. ओबद्याचा मुलगा शखन्या.
  • 22 शखन्याचे वंशज याप्रमाणे: शमाया, शमायाला सहा मुलगे: शमाया, हट्टूश, इगाल, बाहीहा, नाऱ्या आणि शाफाट.
  • 23 नाऱ्याला तीन मुलगे: एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.
  • 24 एल्योवेनयला सात मुलगे होते. त्यांची नावे अशी: होदव्या, एल्याशीब, पलाया, अक्कूब, योहानान, दलाया, अनानी.