wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 24
  • 1 अहरोनच्या मुलांची वर्गवारी अशी: नादाब, अबीहू एलजार व इथामार हे अहरोनचे मुलगे.
  • 2 पण नादाब आणि अबीहू हे दोघे आपल्या वडीलांच्या आधीच वारले. शिवाय त्यांना मुलेही झाली नव्हती. तेव्हा एलाजार आणि इथामार हेच याजक झाले.
  • 3 प्रत्येकाला नेमून दिलेली कर्तव्ये पार पाडता यावीत म्हणून दावीदाने एलाजार आणि इथामार यांच्या वंशजांची स्वतंत्र गटांत विभागणी करुन टाकली. त्यासाठी दावीदाने सादोक आणि अहीमलेख यांची मदत घेतली. सादोक हा एलाजारच्या वंशातला आणि अहीमलेख इथामारच्या
  • 4 इथामारपेक्षा एलाजारच्या घराण्यात वडीलधारी प्रमुख मंडळी अधिक निघाली. एलाजारच्या घराण्यात सोळा जण प्रमुख होते तर इथामारच्या घराण्यात आठ जण.
  • 5 दोन्ही घराण्यातील पुरुषांनी निवड चिठ्ठ्या टाकून केली गेली. काहीजणांना पवित्रस्थानाच्या देखभालीचे मुखत्यार म्हणून नेमले तर काहींना याजक म्हणून सेवेसाठी नेमले. हे सर्वजण एलाजार आणि इथामार यांच्या घराण्यातलेच होते.
  • 6 शमाया लेखनिक होता. हा नथनेलचा मुलगा. याचे घराणे लेवीचे होते सर्व वंशजांची नावे लिहिण्याचे काम शमायाने केले. राजा दावीद आणि इतर प्रमुख मंडळी-उदाहरणार्थ सादोक हा याजक, अहीमलेख, याजक आणि लेवी यांच्या घराण्यातील प्रमुख-यांच्यासमोर त्याने या नोंदी केल्या. अहीमलेख हा अब्याथारचा मुलगा. दावेळी चिठ्ठ्या टाकून त्यातून एकाची निवड करण्यात येई. आणि शमाया त्या माणसाचे नाव लिहून ठेवी. अशाप्रकारे एलाजार आणि इथामार यांच्या कुळातील लोकांमध्ये कामाची वाटणी करण्यात आली.
  • 7 यहोयारीबचा गट पहिला होता. दुसरा गट यदायाचा.
  • 8 हारीमचा गट तिसरा. सोरीमचा गट चौथा.
  • 9 मलकीयाचा पाचवा गट. सहावा गट मयामिनचा.
  • 10 0हक्कोसाचा सातवा गट. आठवा गट अबीयाचा.
  • 11 नववा गट येशूवाचा . दहावा गट शकन्याचा.
  • 12 अकरावा गट एल्याशिबाचा. बारावा गट याकीमचा.
  • 13 तेरावा गट हुप्पाचा. चवदावा गट येशेबाबाचा.
  • 14 पंधरावा गट बिल्गाचा. सोळावा गट इम्मेराचा.
  • 15 सतरावा गट हेजीराचा. अठरावा गट हप्पिसेसाचा.
  • 16 पथह्याचा गट एकोणिसावा. विसावा गट यहेजकेलाचा.
  • 17 एकविसावा गट याखीनचा. बाविसावा गट गामूलचा.
  • 18 तेविसावा गट दलायाचा. आणि चोविसावा गट माज्याचा.
  • 19 परमेश्वराच्या मंदिरात सेवा करण्यासाठी या सर्वांची क्रमाने नेमणूक करण्यात आली. इस्राएलचा परमेश्वर देव याने अहरोनला जे नियम घालून दिले त्याच नियमांचे पालन त्यांनी मंदिराच्या सेवेसाठी केले.
  • 20 लेवीच्या इतर वंशजांची नावे खालीलप्रमाणे:अम्रामच्या वंशातील मुलेबाळे: शूबाएल. शूबाएलचे वंशज: यहदाया.
  • 21 रहब्याचे वंशज: इशिया. (हा सर्वात थोरला.)
  • 22 इसहार घराण्यापैकी: शलोमोथ. शलोमोथच्या घराण्यातून: यहथ.
  • 23 हेब्रोनचा मोठा मुलगा यरीया. हेब्रोनचा दुसरा मुलगा अमऱ्या. यहजियेल तिसरा आणि चौथा यकमाम.
  • 24 उज्जियेलचा मुलगा मीखा. मीखाचा मुलगा शामीर.
  • 25 इश्शिया हा मीखाचा भाऊ. इश्शियाचा मुलगा जखऱ्या.
  • 26 मरारीचे वंशज: महली मूशी आणि याजीया.
  • 27 मरारीचा मुलगा याजीया याची मुले: शोहम व जक्कूर.
  • 28 एलजार हा महलीचा मुलगा. पण एलाजारला पुत्रसंतती नव्हती.
  • 29 कीशाचा मुलगा यरहमेल.
  • 30 महली, एदर आणि यरीमोथ हे मूशीचे मुलगे.लेवी घराण्यातील हे प्रमुख होत. आपापल्या घराण्याप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली.
  • 31 खास कामगिरीकरता त्यांची निवड करण्यात आली. अहरोनचे वंशज असलेले त्यांचे याजक नातलग यांच्याप्रमाणेच चिठ्ठ्या टाकून ही निवड झाली. राजा दावीदा, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. कामाच्या नेमणुकीमध्ये घराण्यातील श्रेष्ठ आणि कनिष्ठ बांधव असा भेदभाव नव्हता.