wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 25
  • 1 दावीद आणि सैन्यातील अधिकारी यांनी मिळून आसाफच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती मुले. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरुप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी पुढीलप्रमाणे:
  • 2 आसाफाच्या कुटुंबातून जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला. दावीदाने आसाफला संदेश कथनासाठी निवडले आणि आसाफने आपल्या या मुलांना.
  • 3 यदूथूनच्या घराण्यातून गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण. यदूथूनने यांना आपल्या हाताखाली घेतले. यदूथून वीणा वाजवून संदेश देऊन, परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करत असे.
  • 4 सेवा करायला हेमानचे वंशज होते ते असे बुक्कीया: मत्तन्या, उज्जियेल, शबएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
  • 5 हे सर्व हेमानचे मुलगे. हेमान हा राजा दावीदाचा द्रष्टा होता. देवाने हेमानला वंशवृध्दीचे वचन दिले होते. त्यानुसार हेमानला भरपूर मुलेबाळे झाली. देवाने हेमानला चौदा मुलगे आणि तीन मुली दिल्या.
  • 6 परमेश्वराच्या मंदिरात गीते गाण्यासाठी हेमानने आपल्या सर्व मुलांना हाताशी धरले. ही मुले झांजा, सतारी आणि वीणा वाजवत, आणि देवाची सेवा करत. राजा दावीदाने यांना निवडले होते.
  • 7 लेवी घराण्यातील हे लोक आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत निपुण होते. परमेश्वराची स्तुती गीते गाणारी अशी 288 माणसे होती.
  • 8 प्रत्येकाने कोणते काम करायचे हे ठरवायला चिठ्ठया टाकल्या जात. त्यांना एकसारखीच वागणूक मिळे. लहान थोर, गुरु-शिष्य असा त्यांच्यात भेदभाव नव्हता.
  • 9 पहिली चिठ्ठी आसाफ (योसेफ) याची निघाली. त्यांची मुले आणि नातलग यांच्यातून बारा जणांची निवड झाली.दुसरी गादल्याची त्याची मुले आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
  • 10 जक्कूरचे मुलगे आणि भाऊबंद यांच्यामधून, तिसऱ्या चिठ्ठीनुसार बाराजण घेतले.
  • 11 चवथी चिठ्ठी इस्त्रीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांच्यामधून बारा.
  • 12 पाचवी नथन्याची. त्याच्या मुलां-नातलगामधून बारा.
  • 13 सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
  • 14 सातवी यशरेलाची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
  • 15 यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
  • 16 नववी मत्तन्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
  • 17 दहावी शिमोची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
  • 18 अकरावी अजरेलाची. त्याचे मुलगे आणि नातलाग यांमधून बारा.
  • 19 बारवी हशब्याची. त्याचे मुलगे आणि त्याचे नातलग यांमधून बारा.
  • 20 तेरावी शूबाएलाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
  • 21 चोदावी मतिथ्याची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
  • 22 पंधरावी यरेमोथची. त्याचे मुलगे आणि नातेवाईक यांमधून बारा.
  • 23 सोळावी हनन्याची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
  • 24 सतरावी याश्बाकाशाची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
  • 25 अठरावी हनानीची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
  • 26 एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
  • 27 विसावी अलीयाथची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
  • 28 एकविसावी होथीरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.
  • 29 बाविसाठी गिद्दल्तीची. त्याचे मुलगे आणि आप्त यांमधून बारा.
  • 30 तेविसावी महजियाथची. त्याचे मुलगे आणि भाऊबंद यांमधून बारा.
  • 31 चोविसावी रोममती एजेरची. त्याचे मुलगे आणि नातलग यांमधून बारा.