wheel

AJC Publications and Media Portal

 

But the Comforter, which is the Holy Ghost, whom the Father will send in my name, he shall teach you all things,
and bring all things to your remembrance, whatsoever I have said unto you. John 14:26


1 इतिहास धडा 27
  • 1 राजाच्या सैन्यात नोकरीला असलेल्या इस्राएल लोकांची गणना अशी: त्यांचा प्रत्येक गट दर वर्षी एक महिना कामावर असे. राजाकडे चाकरीला असलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या घराण्यांचे प्रमुख, सरदार, अधिकारी, सुरक्षा-अधिपती असे सर्वजण होते. प्रत्येक सैन्यगटात 24,000 माणसे होती.
  • 2 पहिल्या महिन्याच्या पहिल्या गटाचा प्रमुख याशबाम हा होता. याशबाम जब्दीएलचा मुलगा. याशबामच्या गटात 24,000 जण होते.
  • 3 तो पेरेसच्या वंशातला होता. पहिल्या महिन्याच्या सर्व सेनाधिकाऱ्याचा याशबाम प्रमुख होता.
  • 4 अहोह इथला दोदय दुसऱ्या महिन्याच्या सैन्याचा मुख्य असून त्याच्या गटात 24,000 माणसे होती.
  • 5 तिसऱ्या महिन्याचा तिसरा सेेनापती बनाया. हा यहोयादाया मुलगा. यहोयादा हा मुख्य याजक होता. बनायाच्या अधिपत्याखाली 24,000 माणसे होती.
  • 6 तीस प्रसिध्द शूरांमधला पराक्रमी सैनिक तो हाच. त्यांचा नायकही हाच होता. त्याचा पुत्र अम्मीजाबाद बनायाच्याच गटात प्रमुख होता.
  • 7 चौथ्या महिन्याचा चौथा सेनापती असाएल. हा यवाबचा भाऊ. असाएलचा मुलगा जबद्या हा पुढे आपल्या वडिलानंतर सेनापती झाला. असाएलचा तुकडीत 24,000 जण होते.
  • 8 शम्हूथ हा पाचवा सेनापती. पाचव्या महिन्याचा हा सेनापती इज्राही होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
  • 9 इरा हा सहाव्या महिन्याचा सहावा सेनापती. हाइक्के शचा मुलगा असून तको नगरातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
  • 10 सातव्या महिन्याचा सातवा सेनापती हेलेस पलोनी हा होता. हा एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
  • 11 आठव्या महिन्याचा आठवा सरदार जेरह वंशातला सिब्बखय हुशाथी हा होता. त्याच्या तुकडीत 24,000 जण होते.
  • 12 नवव्या महिन्याचा नववा सरदार बन्यामिनी वंशातला अबियेजेर अनाथोथी हा होता. त्याच्या गटात 24,000 सैनिक होते.
  • 13 दहाव्या महिन्याचा दहावा सेनापती महरय. हा जेरह कुळातला असून नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
  • 14 अकराव्या महिन्याचा अकरावा सेनापती बनाया. हा पिराथोनचा असून एफ्राइमच्या वंशातला होता. त्याच्या गटात 24,000 लोक होते.
  • 15 बाराव्या महिन्याचा बारावा प्रमुख हेल्दय. या अथनिएल कुळातला आणि नटोफा इथला होता. त्याच्या तुकडीत 24,000 लोक होते.
  • 16 इस्राएलाच्या घराण्यांचे प्रमुख असे:रऊबेन:जिख्रिचा मुलगा अलीयेजर. शिमोन: माकाचा मुलगा शफट्या.
  • 17 लेवी: कमुवेलचा मुलगा हशब्या. अहरोन: सादोक.
  • 18 यहूदा: अलीहू. (हा दावीदाचा एक भाऊ), इस्साखार: मीखाएलचा मुलगा अम्री.
  • 19 जबुलून: ओबद्याचा मुलगा इश्माया. नफताली: अज्रिएलचा मुलगा यरीमोथ.
  • 20 एफ्राईम: अजऱ्याचा मुलगा होशेथ. पश्र्चिम मनश्शे: पदायाचा मुलगा योएल.
  • 21 पूर्व मनश्शे: जखऱ्याचा मुलगा हद्दो. बन्यामीन: अबनेरचा मुलगा यासिएल.
  • 22 दान: यरोहामचा मुलगा अजरेल.हे झाले इस्राएलींच्या घराण्यांचे प्रमुख
  • 23 दावीदाने इस्राएलमधील पुरुषांची मोजदाद करायचे ठरवले. इस्राएलच लोकसंख्या आकाशातील ताऱ्यांएवढी करीन असे देवाने आश्वासन दिलेले असल्यामुळे इस्राएलमध्ये लोकासंख्या वाढली होती. तेव्हा दावीदाने वीस वर्षे वयाचे आणि त्या पुढच्या वयाचे पुरुष गणतीसाठी विचारात घ्यायचे ठरवले.
  • 24 सरुवेचा मुलगा यवाब याने मोजदाद करायला सुरुवात केली पण तो ते काम पूर्ण करु शकला नाही. देवाचा इस्राएलच्या लोकांवर कोप झाला. त्यामुळे ही गणती दावीद राजाच्या बखरीत नोंदलेली नाही.
  • 25 राजाच्या मालमत्तेची जपणूक करणारे आधिकारी पुढीलप्रमाणे:अदीएलचा मुलगा अज्मावेथ हा राजाच्या भांडारांचा प्रमुख होता. शेतीवाडी, नगरे, गावे आणि किल्ले इथे असलेल्या भांडारांचा प्रमुख योनाथान हा होता. हा उज्जीयाचा मुलगा.
  • 26 कलूबचा मुलगा एज्री हा शेतात राबणाऱ्यांवरचा प्रमुख होता.
  • 27 रामा येथील शीमी हा द्राक्षमळ्यांवरचा अधिकारी होता. शिफम येथील जब्दी हा द्राक्षमळ्यातून निघणारा द्राक्षारस आणि त्याची साठवण यावरचा अधिकारी होता.
  • 28 गेदेरचा बाल-हानान हा जैतूनची झाडे आणि पश्चिमे कडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
  • 29 शारोनचा शिमय हा शारोन भोवतालच्या गाईगुरांचा मुख्य होता. अदलयचा मुलगा शाफाट हा दऱ्याखोऱ्यातील गुरांवरचा मुख्य होता.
  • 30 इश्माएली ओबील हा उंटांवरचा प्रमुख होता. येहद्या मेरोनोथी गाढवांचा मुख्य होता.
  • 31 याजीज हाग्री मेंढरांचा मुख्या होता.राजा दावीदाच्या मालमत्तचे हे सर्व रक्षणकर्ते होते.
  • 32 योनाथान हा सूज्ञ मंत्री आणि लेखनिक होता. हा दावीदाचा काका. हखमोनी याचा मुलगा यहोएल याच्यावर राजपुत्रांच्या लालनपालनाची जबाबदारी होती.
  • 33 अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.
  • 34 अहीथोफेलची जागा पुढे यहोयादा आणि अब्याथार यांनी घेतली. यहोयादा हा बनायाचा मुलगा. यवाब हा राजाचा सेनापती होता.