- 1 कोरेश पारसचा राजा असताना त्याच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी परमेश्वराने त्याला एक घोषण करायला उद्युक्त केले. कोरेशने राज्यभर या फर्मानाची दवंडी पिटवली तसेच ते लिहूनही काढले. यिर्मयाच्या तोंडून परमेश्वराने वदविलेले वचन प्रत्यक्षात यावे म्हणून देवाची ही प्रेरणा होती. घोषणा पुढीलप्रमाणे होती:
- 2 पारसचा राजा कोरेश म्हणतो:“स्वर्गातील देव परमेश्वर याने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत; यहूदातील यरुशलेम येथे त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले.
- 3 यरुशलेममध्ये असलेला देव हाच इस्राएलचा परमेश्वर आहे. तुमच्या पैकी देवाचे जे लोक असतील त्यांचे तो भले करो, अशी मी प्रार्थना करतो. त्यांना यहूदातील यरुशलेममध्ये जाऊन परमेश्वररासाठी मंदिर बांधू द्यावे.
- 4 आणि इस्राएलांपैकी जे कोणी शत्रूच्या तावडीतून बचावले असतील त्यांना ते असतील त्या ठिकाणच्या लोकांनी साहाय्य करावे. त्यांना चांदी, सोने, गायी-गुरे इत्यादी गोष्टी द्याव्यात. यरुशलेममधील मंदिरासाठी स्वखुशीने दाने द्यावीत.”
- 5 तेव्हा यहूदा व बन्यामीनच्या घराण्यातील वडीलधाऱ्यांनी यरुशलेमला निघायची तयारी केली; मंदिर बांधण्यासाठी ते यरुशलेमला चालले होते. ज्यांना ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती असे सगळेच यरुशलेमला जायला तयार झाले.
- 6 त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना उदारपणे अनेक भेटवस्तू दिल्या. चांदी, सोने, पशू अशा मौल्यवान ऐंवजाचा त्यात समावेश होता.
- 7 शिवाय नबुखद्नेस्सरने यरुशलेमच्या मंदिरातील वस्तू काढून ज्या ठिकाणी त्याने आपले खोटे देव ठेवले होते. अशा स्वत:च्या मंदिरात ठेवल्या होत्या, त्या राजा कोरेशने बाहेर काढल्या.
- 8 पारसच्या कोरेश राजाने आपला कोशाधिकारी मिथ्रदाथ याला हे काम सांगितले. त्याने त्या काढून शेशबस्सर या यहूदी प्रमुखाच्या स्वाधीन केल्या
- 9 मिथ्रदाथने काढून आणलेल्या मंदिरातील वस्तू पुढीलप्रमाणे:सोन्याची तबके 30चांदीची तबके 1,000सुऱ्या व 92
- 10 सोन्याचे कटोरे 30त्याच प्रकारचे चांदीचे कटोरे 410इतर पात्रे 1,000
- 11 चांदी -सोन्याच्या सर्व मिळून 5,400 वस्तू होत्या. बाबेलमधून कैदी यरुशलेमला परत आले त्यावेळी शेशबस्सराने या सर्व वस्तू आणल्या.
Ezra 01
- Details
- Parent Category: Old Testament
- Category: Ezra
एज्रा / Ezra धडा 1